वेध माझा ऑनलाइन। शरद पवार यांची नजर आणि सावली ज्या विषयावर पडली, त्याची माती झालेली आहे, जो मराठा समाजाचा झाला नाही, तो तुमचा कसा होईल असा घणाघात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. सुप्रिया सुळे यांना जवळचं दिसत नाही, कारण असे महाराष्ट्रच्या विरोधात काम करणारा घरातला माणूस ताईंना दिसत नाही अशीही टीका पडळकर यांनी केली. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे धनगर जागर यात्रेमध्ये ते बोलत होते.
भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणासाठी राज्यभर धनगर जागर यात्रा सुरू केली आहे. अमरावतीमध्ये बोलताना ते म्हणाले की, आता तुम्ही जागा राहा. जर तुम्ही झोपला तर कायमचं झोपणार. एकबाजूने न्यायालयात लढू आणि दुसरीकडे रस्त्यावर लढू. म्हणून एकजूट करण्यासाठी सरकारवर दबाव टाकण्यासाठी मी फिरतोय. शासनाने धनगर आरक्षणाचा जीआर काढावा ही मागणी आहे. 21 तारखेला जी कमिटी स्थापन केली ती लवकर इतर राज्यात पाठवा. इतर राज्यांनी जीआर कसे काढले याचा त्यांनी अभ्यास करावा.
येत्या डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत न्यायालयाच्या माध्यमातून धनगरांना आरक्षण मिळेल अशी अपेक्षा आहे असं गोपीचंद पडळकर म्हणाले. ते म्हणाले की, जर न्यायालयाच्या माध्यमातून आरक्षण मिळाले नाही तर त्यासाठी प्लॅन बी म्हणून धनगर जागर यात्रा सुरू करणार. या यात्रेच्या माध्यमातून धनगरांना जागं करणार आणि धनगरी ताकद काय असते हे दाखवून देणार.
No comments:
Post a Comment