वेध माझा ऑनलाइन । आज विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे एका उमेदवाराचा पराभव होणं निश्चित आहे. महायुतीचे 9 उमेदवार रिंगणात आहेत, तर महा विकास आघाडीचे 3 उमेदवार रिंगणात आहेत. अशातच विधानपरिषद निवडणुकीपूर्वी राजकीय वर्तुळातून सर्वात खळबळजनक बातमी समोर येत आहे. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे आमदार क्रॉस व्होटिंग करणार असल्याचं बोललं जात आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने काँग्रेसचे 4 आमदार फोडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसेच, भाजपनंही काँग्रेसचे 4 आमदार फोडल्याची चर्चा रंगली आहे.
विधानपरिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. काँग्रेसच्या 8 आमदारांचं राष्ट्रवादी आणि भाजप उमेदवारांना मतदान करणार असल्याचं बोललं सुरू झालं आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार पहिल्या पसंतीतच निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उमेदवारांना निवडून येण्यासाठी आवश्यक असणाऱ्या 46 मतांचं गणित जुळवण्यासाठी राष्ट्रवादीला काँग्रेसमधूनच 4 मतांची रसद पुरवली जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
विधान परिषद निवडणुकीपूर्वी गुरुवारी रात्री राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडल्या. रात्रीतल्या रात्री घोडेबाजार झाला असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं चार आमदार फोडले आहेत, तर भाजपनंही काँग्रेसचे चार आमदार फोडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच, काँग्रेसचे आठ आमदार फोडल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनिय सूत्रांनी दिली आहे. काल रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक सुरू होती. तर दुसरीकडे भाजपचीही ताज प्रेसिडंट कुलाबा येथे उशिरापर्यंत बैठक सुरू होती.
No comments:
Post a Comment