Thursday, July 11, 2024

काँग्रेस आमदारांच्या बैठकीला दोन आमदार अनुपस्थित : आज विधान परिषदेची निवडणूक ; महाआघाडीची धाकधूक वाढली-

 वेध माझा ऑनलाईन।
आज विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. विधीमंडळात मतदान प्रक्रिया पार पडेल. या निवडणुकीत आपला विजय व्हावा, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. गुप्त पद्धतीने मतदान असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्यामुळे कोणत्या उमेदवाराचा पराभव होणार याची राजकीय वर्तुळात अधिक उत्सुकता लागली आहे. याचदरम्यान काँग्रेस आमदारांच्या बैठकीला दोन आमदार अनुपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे. 

काल रात्री उशीरा (11 जून) काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक झाली. या बैठकीत महाविकास आघाडी प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन केले. काँग्रेसकडून रमेश चैनीथला, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण हे उपस्थित होते. तर ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकर, अनिल परब, अनिल देसाई, विनायक राऊत महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार गट) जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनीही आमदारांना मार्गदर्शन केले.

No comments:

Post a Comment