Tuesday, July 9, 2024

कृष्णा विश्व विद्यापीठ व लायन्स क्लब कराड मेन यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात ; प्रदूषणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर वृक्षारोपण हाच एकमेव उपाय :- डॉ. सौ नीलम मिश्रा

वेध माझा ऑनलाइन।
देशभरातील वाढत्या वृक्षतोडीमुळे प्रदूषणामध्ये मोठी वाढ झाली आहे यासाठी वृक्षारोपण हा एकमेव पर्याय आहे अशा परिस्थितीमध्ये वृक्षारोपण ही एक चळवळ निर्माण झाली पाहिजे अशी मत कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर सौ नीलम मिश्रा यांनी व्यक्त केले. त्या कृष्णा विश्व विद्यापीठ व लायन्स क्लब ऑफ कराड मेन यांच्या संयुक्त वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या.

कृष्णा वनसंवर्धन प्रकल्पांतर्गत कृष्ण विश्व विद्यापीठ व लायन्स क्लब ऑफ कराड मेन यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिपक्षीय करार अंतर्गत अवनत वनक्षेत्राचे पुनर्वनीकरण प्रकल्प येथे वृक्षारोपण करण्यात आले.
 यावेळी कृष्णा विश्व विद्यापीठ कराडच्या कुलगुरू डॉ.सौ.नीलम मिश्रा , लायन्स क्लब ऑफ कराड मेंनचे अध्यक्ष ला.संजय पवार,सचिव ला. मिलिंद भंडारे, खजिनदार ला. प्रसाद नाईक,आतरराष्ट्रीय व्यवहार, उपसंचालक कु.अर्चना कौलगेकर, कराड लायन्स चॅरिटेबल आय हॉस्पिटलचे चेअरमन ला.मावजी पटेल,फिजिओथेरपी अधिष्ठाता डॉ.श्री.जी.वरदराजुलू,
 नर्सिंग कॉलेज अधिष्ठाता डॉ.सौ. वैशाली मोहिते, फार्मसी कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ.श्री. एन.आर.जाधव,अलाईड सायन्स काॅलेजच्या अधिष्ठाता डॉ. श्री. जी.आर.पठाडे प्रशासन विभाग उपकुलसचिव श्री. एस.ए.माशाळकर,न्युरोसर्जरी विभाग सिनीयर कन्सल्टंट डॉ.कर्नल जी.व्ही.रामदास,इस्टर्न कमांड , कलकत्ता ब्रिगेडीअर डॉ . हिमाश्री रामदास,परचेस ऑफिसर आर.एस. संदे,अलाईड सायन्सचे असोसिएट प्रोफेसर डॉ. श्री. कैलास दातखिळे, विद्यापीठ NCC विभागाचे छत्र
यांचेसह अनेक लायन्स सदस्य उपस्थित होते.
दरम्यान कराड मेन क्लब च्या वतीने डॉ. रमेश थोरात म्हणाले की लायन्स इंटरनॅशनल जगभरामध्ये पर्यावरणावर मोठे काम करत आहे. या अंतर्गत आजचे वृक्षारोपण या चळवळीचे बीज आज खऱ्या अर्थाने रोवले गेले असून ही चळवळ प्रचंड मोठी होईल यात शंका नाही. ही मोहीम कृष्णा विश्व विद्यापीठासोबत पुढील काळात अशीच सुरू राहणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

No comments:

Post a Comment