Tuesday, September 13, 2022

देशद्रोही लोकांचा हस्तक होण्यापेक्षा मोदी-शहांचे हस्तक होणे आम्हाला चालेल ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

वेध माझा ऑनलाइन - शिंदे गट हा नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा हस्तक असल्याची टीका शिवसेनेकडून केली जात आहे. पण याकुब मेमन आणि दाऊदचे हस्तक होण्यापेक्षा ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेले, कलम 370 रद्द केले त्या मोदी-शहांचे हस्तक होणे, केव्हाही बरे आहे. गद्दार आणि देशद्रोही लोकांचा हस्तक होण्यापेक्षा आम्ही मोदी-शहांचे हस्तक होणार असू, तर ते आम्हाला चालेल, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांनी केले. कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांच्या पैठण सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
दरम्यान बाळासाहेबांच्या विचारांची प्रतारणा कोणी केली? याचे आत्मपरिक्षण करा, असा सल्लाही शिंदे यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना दिला.

याकुब मेमनच्या कबरीच्या सुशोभीकरणावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. याकुब मेमन जो देशद्रोही होता, ज्याला फाशी देण्यात आली. त्याच्या कबरीचं उदात्तीकरण महाविकास आघाडी सरकारच्या काळात करण्यात आले, असा थेट आरोप एकनाथ शिंदे यांनी केला. तसेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून मतं मागितली. जनेतने भाजप-सेना युतीला मतदान केले. मात्र निवडणुकीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करुन मतदारांचा विश्वासघात कोणी केला? बाळासाहेबांच्या विचारांची प्रतारणा कोणी केली? याचे आत्मपरिक्षण करा, असा सल्ला शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना कोणती याचं उत्तर आजच्या या विराट सभेनं दिलं आहे.
आजच्या सभेला सच्चा शिवसैनिकांची गर्दी आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी मला शिकवण दिली आहे की जे होणार आहे तेच बोलायचं. त्यामुळे मी दिलेला शब्द पाळतो. एकदा शब्द दिला की मी स्वत:चंही ऐकत नाही, असे म्हणत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.

 




No comments:

Post a Comment