Saturday, December 31, 2022

रोटरी क्लब ऑफ कराड तर्फे रोटरी यूथ एक्स्चेंज योजने अंतर्गत ब्राझीलच्या विद्यार्थ्याचे स्वागत

वेध माझा ऑनलाइन - रोटरी क्लबतर्फे रोटरी यूथ एक्स्चेंज योजना राबवली जाते. याअंतर्गत मुला-मुलींना परदेशातील कुटुंबात एक महिना ते एक वर्ष राहण तसेच शिकण्याची व सांस्कृतिक दूत बनण्याची संधी दिली जाते. दोन देशांतील सामंजस्य वृद्धिंगत करणे, परस्परांच्या संस्कृतीची ओळख नव्या पिढीला होणे, ही या योजनेची उद्दिष्टे आहेत याच विषयांतर्गत रोटरी क्लब ऑफ अहमदनगर चे सदस्य अभय राजे यांचेकडे ब्राझील वरून दोन महिन्यांकरिता हेनरिके कॅम्पाना हा विद्यार्थी आला आहे. या विद्यार्थ्याला दोन दिवस होस्ट करण्याची संधी रोटरी क्लब ऑफ कराड ला मिळाली. त्याची राहण्याची सोय डॉ राहुल फासे यांच्या घरी करण्यात आली होती
दरम्यान हेनरिके कॅम्पाना हा कराडमध्ये आला असता त्याचे येथील रोटरी क्लब च्या वतीने संगम हॉटेल येथे फेटा, हार व पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. 

यावेळी रोटरी क्लब ऑफ कराड चे प्रेसिडेंट प्रबोध पुरोहित, सेक्रेटरी चंद्रशेखर पाटील, राजेंद्र कुंडले, राजेश खराटे, डॉ भाग्यश्री पाटील, पल्लवी यादव, जगदीश वाघ, सौ सीमा पुरोहित, सौ अनुराधा  टकले, रोटरॅक्ट क्लब ऑफ कराड सिटी च्या प्रेसिडेंट आकांक्षा तिवारी, सेक्रेटरी धीरज निकम, अमित भोसले, अक्षय चव्हाण, नील देशपांडे, स्नेहल भोसले, सुधीर पाटील, प्रशांत माने, प्रांजली सूर्यवंशी हे उपस्थित होते. 

छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अजितदादांचे वादग्रस्त विधान ; अजित पवार यांनी माफी मागावी,राजीनामा द्यावा ; भाजप शिंदे गटाची मागणी...

वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले. या अधिवेशनात अनेकविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. विधिमंडळाच्या पायऱ्यांवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या एका विधानावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावरून भाजप नेतेही आक्रमक झाले असून, अजित पवार यांनी माफी मागावी आणि तत्काळी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. 

आपण महाराष्ट्रामध्ये राहत असून इथे अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात नाही. तसेच 'बाल शौर्य पुरस्कार' हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. यावरून आता शिंदे गट आणि भाजप आक्रमक झाले असून, अजित पवारांवर टीका करण्यात येत आहे. 
भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे हिंदू समाजाचे स्वाभिमान, अस्मिता आहेत. अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केल्यामुळे या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. असे बोलण्याचा अधिकार अजित पवार यांना कुणी दिला? अजित पवार यांनी तातडीने माफी मागावी आणि राजीनामा द्यावा, असे तुषार भोसले यांनी म्हटले आहे. 
दरम्यान, शिंदे गटाचे नेते आणि सरकारमधील मंत्री शंभुराज देसाई यांनीही अजित पवारांच्या या विधानाचा समाचार घेतला असून, अजित पवारांचे वक्तव्य लोकां सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वत: कोरडे पाषाण अशा पद्धतीचे आहे. याची निंदा करावी तेवढी थोडी आहे. दादांनी छत्रपती संभाजी महाराजांचा धर्मवीर म्हणून नका असे सांगणे निषेधार्ह आहे. महाराष्ट्रामध्ये या वक्तव्यावरून मोठ्या प्रमाणावर उद्रेक होईल. आपण बोललो हे चुकीचे आहे हे अजित पवारांच्या लक्षात येईल. छत्रपती संभाजी महाराज हे कालही धर्मवीर, धर्मरक्षक होते आजही आहेत आणि इतिहासाच्या अखेरीपर्यंत ते धर्मवीर धर्मरक्षकच राहतील, असे शंभुराज देसाई यांनी सांगितले. 





 

Friday, December 30, 2022

कराड पालिका अधिकाऱ्यांची "चार आण्याच्या कोंबडीला बाराण्याचा मसाला आणून पार्टी करण्याची तयारी सुरू ? "त्या' जागेवर " अक्षरे' बसत नाहीत म्हणून स्टेडियम बाहेरील कमानच पाडणार?

वेध माझा ऑनलाइन - कराड पालिकेकडून येथील स्टेडियम बाहेर असणारी कमान केवळ त्याठिकाणी अक्षरे बसावता येत नाहीत म्हणून काढून टाकण्यात येत असल्याची चर्चा आहे याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील यांनी फोनवरून पालिकेचे अभियंता ए आर पवार यांना विचारले असता पवारांनी हेच कारण सांगितले आहे...याबाबतचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे... यानिमित्ताने येथील पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या परस्पर सुरू असलेल्या शहरातील भानगडी आता चर्चेतही आल्या आहेत

वारंवार पालिका अभियंता म्हणून विविध चर्चा येथील काही पालिका अधिकारी वर्गाच्या भोवती फिरताना नेहमीच दिसतात...ड्रेनेज मध्ये पडून पालिका कर्मचाऱ्याचा झालेला मृत्यू असो... पालिकेच्या जवळ असलेल्या नगरपालिका शाळेच्या आवारात  बेजबाबदारीने त्या ठिकाणी खड्डे काढून ते न बुजवता तसेच विना कम्पोउंड ठेवल्याने त्यात पडून एका चिमुकल्याचा झालेला मृत्यू असो...कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान मुलांचा जीव गेल्याची घटना असो...कशाचीच फिकीर नसलेले हे अधिकारी आता या कमानीच्या विषयाने नवीन वादात अडकले आहेत...
येथील स्टेडियम बाहेरील कमानिवर अक्षरे बसत नाहीत म्हणून ती कमानच काढून टाकण्याचा शहाणपणा हे अधिकारी करणार असल्याने चार आण्याच्या कोंबडीसाठी...बारा आण्याचा मसाला आणून या अधिकाऱ्यांची पार्टीची तयारी सुरू असल्याची चर्चाही सध्या सुरू आहे ...शहरांतून या प्रकाराबाबत संताप देखील व्यक्त होत आहे...लोक याविषयी अनेक प्रश्न विचारत आहेत...
सदरची कमान पाडल्यानंतर याठिकाणी नविन कमान उभारण्यात येणार आहे. तेव्हा जुनी कमान पाडण्याचे पैसे वाया जाणार नाहीत का? या गोष्टींना जबाबदार कोण? पालिकेच्या या कारभाराविरोधात लोकप्रतिनिधी बोलणार की हे सगळं होताना उघड्या डोळ्यानी पाहणार ? ज्यावेळी कमान उभारणी सुरू होती तेव्हा अधिका- यांचे त्याकडे लक्ष नव्हते का? कमान पाडल्यानंतर आधी केलेल्या खर्चाची भरपाई कोण देणार?असे अनेक रास्त प्रश्न लोकांना पडले आहेत त्यांची उत्तरे कोण देणार ? हाही सध्या प्रश्न आहेच !
याबाबत फोनवर विचारणा केली. तेव्हा अधिकारी ए. आर. पवार म्हणाले, कमानीवरील केवळ वरचा गोलभाग काढण्यात येणार आहे. नविन डीझाईन केले असून नांव टाकता येत नसल्याने कमानीचे बांधकाम काढण्यात येत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार : प्रमोद पाटील 
जी कमान पालिकेने पुर्वी उभारली आहे, ती कमान चुकली असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले. कराडकरांच्या पैशाला कसलीच किमंत नाही, असा याचा अर्थ घ्यायचा का? या सर्व प्रकाराबाबत जिल्हाधिका-यांकडे तक्रार करणार आहे. तसेच अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात काही लागेबंध आहेत काय असा सवाल सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, सी ओ डांगे यांच्या काळात शहरातील व्यापाऱ्यांच्या दुकानांना भकास करण्याच्या डांगेच्या मन्सूब्याला येथील काही पालिका अधिकाऱ्यांचे खतपाणी होते... डांगे त्यांना शाबासकी देत होते...असे करत करत डांगे यांनी शहरातील तोंडे बघून काही अतिक्रमणे काढली खरी ! पण, त्यात अनेक व्यापारी डांगेच्या त्रासदायक कामाच्या पद्धतीने अक्षरशः बेजार झालेले दिसले...त्यानंतर डांगेची उचलबांगडी झाली...पण हे सगळं व्यापाऱ्यांबद्दल घडत असताना पुढे होते ते हेच पालिका अधिकारी...आणि, आता हेच अधिकारी नवीन शहाणपणा करत  स्टेडियमची कमान परस्पर काढन्याचा निर्णय घेऊन गावाचे मालक बनू पाहत आहेत  ? अशी चर्चा आहे...आणि हा विषय जिल्हाधिकाऱ्यांसमोर तक्रार म्हणून गेल्यास तो दाट चिघळण्याची  शक्यताही आहे...त्यामुळे आता पाहूया पुढे काय होतय ते !

Thursday, December 29, 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक

वेध माझा ऑनलाइन -  पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या आई  हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. त्या 100 शंभर वर्षांच्या होत्या.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईची तब्येत बिघडली होती, त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान, त्यांची प्राणज्योत मालवली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत 18 जून रोजी आपला 100 वा वाढदिवस साजरा केला. गुजरात निवडणुकीआधी मार्च 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये आपल्या घरी जाऊन आईचे आशीर्वाद घेतले होते. हिराबेन यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आईच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. आईमध्ये नेहमीच एका त्रिमूर्तीचा भास व्हायचा असं मोदींनी म्हटलं आहे.
शानदार शताब्दीचं देवाच्या चरणी विश्रांती असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आईच्या निधनानंतर शोक व्यक्त केला. पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, आईमध्ये मला नेहमीच एक त्रिमूर्ती दिसली. ज्यात एका तपस्वीचा प्रवास, निष्काम कर्मयोगीचं प्रतिक आणि मूल्यांबद्दल कटिबद्ध जीवन होतं.मी जेव्हा १०० व्या जन्मदिनी आईला भेटलो तेव्हा तिने एक गोष्ट सांगितली ती नेहमीच लक्षात राहते. काम करा बुद्धीने आणि जीवन जगा शुद्धीने असं आईने म्हटल्याची आठवणही मोदींनी सांगितली.


पुणे विमानतळावर एक प्रवासी आढळला कोरोना पॉझिटिव्ह ; यंत्रणा अलर्ट ;

वेध माझा ऑनलाइन - पुणे विमानतळार करण्यात आलेल्या चाचणीत एक प्रवासी करोना पॉझिटिव्ह आढळला आहे. हा प्रवासी सिंगापूरहून आल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रवाशाचे नमुने घेण्यात आले असून जनुकीय क्रमनिर्धारणासाठी (जिनोम सिक्वेन्सिंग) पाठवण्यात येणार असल्याचं वृत्त एका वृत्त वाहिनीने दिलं आहे. चीनमध्ये करोनाने थैमान घातलं असलयाची चर्चा असताना संपूर्ण जगभरासह भारतातही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने विमानतळांवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांची चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर चाचणी करण्यात आला असता एक प्रवासी पॉझिटिव्ह आढळला आहे.

“चिंता करण्याची गरज नाही. गेल्या ८ ते १० दिवसांपासून आपण विदेशातून येणाऱ्या नागरिकांची चाचणी करण्यास सुरुवात केली आहे,” अशी माहिती पुणे महापालिकेतील सहाय्यक आरोग्य अधिकारी संजीव वावरे यांनी दिली आहे.पॉझिटिव्ह आढळलेल्या प्रवाशासंबंधी माहिती देताना त्यांनी सांगितलं की “ती ३२ वर्षीय महिला आहे. त्यांना कोणतंही लक्षण जाणवत नाही आहे. त्यांना सध्या घऱातच विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे”.




केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' सहा देशांतून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी केली सक्तीची

वेध माझा ऑनलाइन - कोरोना महामारीचे गांभीर्य ओळखून भारत सरकारने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. भारताशेजारील देशांमधून येणाऱ्या सहा देशांतील प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी सक्तीची करण्यात आली आहे.  जगभरातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोना झपाट्याने पसरत आहे. चीनमध्ये तर परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. त्यामुळे सर्वच देशांमधील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. भारतात अजून तरी कोरोनाची चौथी लाट आलेली नाही. परंतु, कोरोना महामारीचे गांभीर्य ओळखून भारतात देखील महत्वाचे निर्णय घेतले आहेत. भारताशेजारील देशांमधून येणाऱ्या सहा देशांतील प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. 

 कोणत्या देशातून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर आहे सक्तीची?
चीन, हाँगकाँग,जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड या देशांमधून भारतात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची आरटीपीसीआर  चाचणी होणार आहे. 1 जानेवारी 2023 पासून हा नियम लागू करण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारीपासून या देशातून येणाऱ्या प्रवाशांनी आपली आरटीपीसीआर चाचणी करून त्याचा निगेटिव्ह अहवाल हवाई सुविधा पोर्टलवर अपलोड करायचा आहे. 

तीन प्रवाशांचे नमुने तपासणीसाठी पाठवले
आरोग्या विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या कोविड संदर्भातील आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या सूचनेनुसार 24 डिसेंबर 2022 पासून राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे सर्वेक्षण  सुरु करण्यात आले आहे.  यामध्ये सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत होते. यासाठी दोन टक्के प्रवाशांचे नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात येत होते. यापैकी कोविड बाधित आलेला प्रत्येक नमुना जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात येत आहे. परंतु, केंद्र सरकारच्या निर्णयामुळे आता या सहा देशांमधून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी करावी लागणार आहे. आतापर्यंत परदेशातून येणाऱ्या 79688 प्रवाशी परदेशातून भारतात आले आहेत यातील 1466 प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. त्यातील तीन प्रवाशांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.   


 

केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठा निर्णय घेण्याची तयारी ; . आता देशातील कुठल्याही भागातून मतदाराला मतदान करता येणार;

वेध माझा ऑनलाइन -  सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणून आपल्या भारताचा उल्लेख केला जातो. गेल्या ७० वर्षांपासून आपल्या देशामध्ये निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे सुरू आहे. तसेच ग्रामपंचातीपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुका नियोजित वेळी होत असतात. या निवडणुकीत मतदान करण्याचा हक्क १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक नागरिकाला देण्यात आला आहे. ज्या मतदारसंघात नाव नोंदवलेले असते तेथील मतदान केंद्रात मतदाराला आपल्या मतदानाचा हक्क बजावता येतो. मात्र बदलत्या काळात अनेक जण नोकरी, व्यवसायानिमित्त आपल्या गाव, शहरापासून दूर राहत असतात. निवडणुकीवेळी बऱ्याचदा त्यांना मतदानासाठी जाता येत नाही. त्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागते.अशा मतदारांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. आता देशातील कुठल्याही भागातून मतदाराला मतदान करता येणार आहे. त्यासाठी निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठे बदल करण्याची तयारी सुरू आहे. 

निवडणूक आयोगाकडून त्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. तसेच त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यांकडून अभिप्राय मागवले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदारांच्या सुविधेसाठी वेळोवेळी अनेक सुधारणा करण्यात येत असतात. कोरोनाकाळातही मतदारांच्या सुविधेसाठी निवडणूक आयोगाने अनेक तरतुदी केल्या होत्या. 



















 

Wednesday, December 28, 2022

लवासा’ प्रकरणी शरद पवार, सुप्रिया सुळेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता ; सीबीआय चौकशीचे आदेश देण्याची याचिकाकर्त्यांची विनंती ;

वेफह माझा ऑनलाईन - लवासा सीटी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान या याचिकेला नंबर मिळाला असून याविरोधात लवकरच सुनावणी होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान फौजदारी स्वरुपाची जनहित याचिका वकील नानासाहेब जाधव यांनी दाखल केली आहे. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, अजित गुलाबचंद यांच्यासह ज्या अधिकाऱ्यांनी लवासाला परवानगी दिली यांच्यावर ही कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान याप्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश देण्याची याचिकाकर्त्यांने  विनंती केली आहे

शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, अजित गुलाबचंद यांच्यासह ज्या अधिकाऱ्यांनी लवासाला परवानगी दिली त्या सर्वांवर सीबीआय ने गुन्हा दाखल करावा आणि त्याचा तपास करावा अशी मागणी करणारी फौजदारी स्वरूपाची जनहित याचिका ॲड. नानासाहेब जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलीय. याचिकेला नंबर मिळाला असून लवकरच सुनावणीला येण्याची शक्यता आहे.लवासा’ प्रकरण पुन्हा उच्च न्यायालयात शरद पवार, सुळेंची डोके दुखी वाढण्याची शक्यता आहे. याबाबत सीबीआय चौकशीचे आदेश देण्याची विनंती करण्यात आली आहे. नाशिकचे वकील नानासाहेब जाधव यांनी ही याचिका दाखल केली आहे.प्रकरणाची सुनावणी नवीन वर्षात होण्याची शक्यता आहे. पूर्णपणे व्यावसायिक असलेल्या या प्रकल्पात महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाची सार्वजनिक जमीन कमी किंमतीत ३० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर देण्यात आली आहे. 
भाडेकरार दरम्यान नियमबाह्य कामे करण्यात आले असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचा आदेश द्यावा’, अशा विनंतीची फौजदारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.

Tuesday, December 27, 2022

वेध माझा ऑनलाइन - कराड नगरपालिकेतील अधिकारी-कर्मचार्‍यांविरोधात सबळ पुरावे देवूनही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई न झाल्यास दि. 30 रोजी आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे.

या उपोषणामध्ये राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष इम्रान मुल्ला, कराड तालुकाध्यक्ष सचिन भिसे, पाटण तालुकाध्यक्ष योगेश धुपटे यांनी सहभाग घेतला आहे.यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कराड पालिकेतील मुख्याधिकारी, आरोग्य कर्मचारी, बांधकाम विभाग, लेखा विभागातील कर्मचारी यांच्याविरोधात कागदोपत्री पुरावे, नियमानुसार चौकशीला दिले होते. तरीही प्रशासन अधिकारी अभिजित बापट यांनी पुराव्यांकडे दुर्लक्ष करून संबंधितांना कायदेशीर कारवाईपासून वाचवले आहे. कराड येथील शाळा  क्रमांक 3 चे मुख्याध्यापक अर्जुन कोळी आणि नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी नितीन जगताप यांच्या शाळेतील कारभाराबाबत यापूर्वी वेळोवेळी निवेदने देवून कारवाई केली नाही. कराड पालिकेचे मुख्य अधिकारी रमाकांत डाके व जिल्हा प्रशासन अधिकारी बापट यानी त्याना वाचवल्याचे दिसत आहे. अकाउंट विभागाचे रवी ढोणे यांच्या कामाच्या चौकशीचे निवेदन, स्वच्छ सर्वेक्षणात बालकामगारांचा वापर यासाठीचे तक्रार अर्ज, बांधकाम अभियंता एम. एच. पाटील यांच्या कारभाराबाबतचे पत्र यावरही कराडच्या मुख्याधिकारी यांनी कारवाई केलेली नाही. याबाबत जिल्हा प्रशासन अधिकारी अभिजित बापट यांना पत्र दिले तरी त्यांनीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे पुरावे देवूनही कारवाईस टाळाटाळ करणार्‍यांची चौकशी करून त्यांचे खातेनिहाय निलंबन करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई न झाल्यास दि. 30 रोजी आत्मदहनाचा इशारा देण्यात आला असून याबाबतची सर्व जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

नाकावाटे देण्यात येणाऱ्या करोना प्रतिबंधात्मक नेझल लसीची किंमत अखेर जाहीर ; पहा किती आहे किंमत ?कोण घेवू शकतात ही लस ?

वेध माझा ऑनलाइन - भारत बायोटेकच्या नाकावाटे देण्यात येणाऱ्या करोना प्रतिबंधात्मक नेझल लसीची किंमत अखेर जाहीर करण्यात आली आहे  या लसीला काही दिवसांपूर्वीच मंजुरी मिळाली होती. भारत बायोटेकने एका प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, या लसीची किंमत खाजगी रुग्णालयासाठी ८०० रुपये ठरली असून त्यावर ५ टक्के जीएसटी आकारू शकतात. तसंच सरकारी रुग्णालयात या लसीची किंमत ३२५ आकारण्यात येणार आहे.

जागतिक पातळीवर करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना भारताने कोणत्याही परिस्थितीत तोंड देण्याची तयारी सुरू केली आहे. भारत सरकारने याच अनुषंगाने करोनाच्या नेझल लसीला परवानगी दिली. ही लस जानेवारी महिन्याच्या अखेरीस उपलब्ध होईल. तसंच ही लस सर्वप्रथम खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध केली जाईल. रिपोर्ट्सनुसार, ज्या व्यक्तींनी दोन डोस घेतले आहेत त्यांना ही लस उपलब्ध होईल.

नेझल लसीसाठी कुठे आणि कशी नोंदणी कराल?
नेझल लस आजपासून CoWIN ॲपवर उपलब्ध झाली आहे. तुम्ही CoWIN अकाऊंटमध्ये साइन इन करून नेझल लसीसाठी नोंदणी करू शकता. ही लस सर्वात आधी खाजगी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असेल आणि जानेवारी महिन्यापासून या लसीला सुरुवात होईल.

ही लस कोण घेऊ शकतात?
रिपोर्ट्सनुसार ज्या व्यक्तींचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त आहे ती लोक INCOVACC ही लस घेऊ शकतात. या लसीचा वापर बुस्टर डोस म्हणून केला जाईल. नाकावाटे दिल्या जाणाऱ्या या लसीचे भरपूर फायदे आहेत. करोनाचा विषाणू नाकाद्वारे शरीरात प्रवेश करतो त्यामुळे ही लस नाक आणि श्वसन मार्गाचे रक्षण करते.




आईच्या अंगावर दूध पिताना श्वसन नलिकेत दूध अडकून अडीच महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू ; कराड तालुक्यातील घटना ;

वेध माझा ऑनलाइन - कराड तालुक्यातील कवठे येथे आईच्या अंगावर दूध पिताना श्वसन नलिकेत दूध अडकून अडीच महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे कालच साताऱ्यात एका चिमुकलीच्या घशात चाॅकलेट अडकल्याने दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती तर आज ही जिल्ह्यात दुसरी घटना घडली आहे या मन हेलवणार्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत उंब्रज पोलिसांनी दिलेली माहिती अशी  स्वाती कृष्णत यादव रा. कवठे, ता. कराड यांनी अडीच महिन्यांपूर्वी मुलीला जन्म दिला. रात्री नेहमीप्रमाणे मुलीला त्या अंगावरील दूध पाजत होत्या. या दरम्यान, मुलीच्या श्वसन नलिकेत दूध गेल्याने तिला ठसका लागला. यातच तिला उलटी झाल्याने ती बेशुद्ध पडली त्यानंतर लगेचच या चिमुकलीला घरातल्यांनी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अडीच महिन्याच्या या चिमुकलीचं बारसंही अद्याप झालं नव्हतं. या घटनेची नोंद उंब्रज पोलिस ठाण्यात झाली आहे. 

सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई अडचणीत येण्याची शक्यता आहे. मंत्री देसाई यांनी बेकायदेशीर बांधकाम केल्याचा ठाकरे गटाचा आरोप ; देसाई यांची आमदारकी रद्द करा ; ठाकरे गटाची मागणी ;

वेध माझा ऑनलाइन - नागपूर येथे सुरू असलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर महाआघाडीकडून एनआयटी भूखंड विक्री प्रकरणी आरोप करण्यात आला आणि आता सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई अडचणीत येण्याची शक्यता आहे. शंभूराज देसाई यांनी बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. महाबळेश्वर जवळील नावली येथील गट क्रमांक- 24 मधील शेत जमिनीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अवैध बांधकाम केले असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या निवडणूक शपथपत्रात सदर जागेवर घराचे बांधकाम असल्याचा उल्लेख केला आहे. मात्र,  सातबारा उताऱ्यावर घराच्या बांधकामाचा उल्लेख नाही. कोणतीही परवानगी न घेता घराचे अवैध बांधकाम केल्याचा आरोप ठाकरे गटाने शंभूराज देसाई यांच्यावर केला आहे.

निवडणूक शपथपत्रात या जमिनीचा शेतजमीन म्हणून उल्लेख आहे, परंतु प्रत्यक्षात या जमिनीवर निवासी बांधकाम केलेले आहे. सदरील जमीन ही इकोसेन्सेटिव्ह झोन मध्ये येत असल्यामुळे बांधकामास परवानगी नाही, ही बाब ठाकरे गटाने समोर आणली आहे. विशेष म्हणजे ही जमीन ही स्वतः शंभूराज देसाई यांच्या नावावर आहे. स्वतः लोकप्रतिनिधी असल्याने त्यांनीच अतिक्रमण तथा अवैध बांधकाम केल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे. त्यामुळे आता पुढे काय होतंय याकडे सातारा जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.


तासवडे टोलनाका परिसरातील 10 गावांचे आंदोलन - टोल देणार नाही,पास घेणार नाही ...च्या दिल्या घोषणा...

वेध माझा ऑनलाइन - तासवडे टोलनाका परिसरातील 10 गावांना टोल देणार नाही अन् पास घेणार नाही, अशा घोषणा स्थानिकांनी आज टोलनाक्यावर दिल्या. यावेळी मोठ्या प्रमाणावर स्थानिक जमा होवून त्यांनी निदर्शने केली. तसेच पूर्वीप्रमाणे आरसीबुकवरून गाड्यांना सोडावे व स्थानिक नागरिकांसाठी सेपरेट लेन राखीव ठेवावी अशी मागणी लोकांनी केली.

पुणे- बेंगलोर महामार्गावर असलेल्या तासवडे टोलनाक्यावर आज स्थानिकांनी आंदोलन केले. यामध्ये तासवडे, वराडे, बेलवडे, शिरवडे, वहागांव, घोणशी, तळबीड, नडशी, हनुमानवाडी व उंब्रज या 10 गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. टोल नाका प्रशासनाकडून यापूर्वी या गावातील लोकांना टोल आकारला जात नव्हता. परंतु आता मासिक पास घ्यावा, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिकांना अर्थिक भुर्दंड बसणार आहे. या प्रकाराचा आज परिसरातील स्थानिकांनी रस्त्यावर उतरत विरोध केला

Monday, December 26, 2022

नाकावाटे देण्यात येणारी कोविड लस आता कोविन ॲपवर उपलब्ध ; भारत बायोटेकच्या इंट्रानेझल कोविड-19 लसीचा पर्याय शनिवार पासून कोविन ॲपवर उपलब्ध...

वेध माझा ऑनलाइन - भारत बायोटेकची  नाकावाटे देण्यात येणारी लस आता कोविन ॲपवर उपलब्ध आहे. भारत बायोटेकची या इंट्रानेझल कोविड-19 लसीचा पर्याय शनिवारी संध्याकाळीपासून कोविन ॲपवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. दरम्यान कंपनीकडून अद्याप लसीची किंमत आणि वापरासाठी उपलब्धता जाहीर करण्यात आलेली नाही. सुत्रांच्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात या संदर्भात निर्णय अपेक्षित आहे. भारत बायोटेकच्या नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीला बूस्टर डोस म्हणून वापराला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीच्या नेझल कोरोना वॅक्सिन म्हणजेच नाकावाटे घेण्यात येणाऱ्या लसीच्या आपात्कालीन वापराला आरोग्य तज्ज्ञांच्या समितीने मंजुरी दिली. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी संसदेत दिली होती. त्याआधी DGCI ने ही लसीच्या वापराला मंजुरी दिली होती.

 भारत बायोटेक कंपनीच्या नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीला बूस्टर डोस म्हणून मान्यता देण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी दिली. भारत बायोटेकची इंट्रानेझल कोविड लसीचा पर्याय कोविन ॲपवरही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच ही नेझल कोरोनो वॅक्सिन खाजगी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असेल. या लसीचा बूस्टर डोस म्हणून वापर करण्यात येईल. 18 वर्ष आणि त्यावरील वयोगटातील लोकांना नेझल कोरोना वॅक्सिनचा बूस्टर डोस घेता येईल. आधी ही लस खाजगी लसीकरण केंद्रवर उपलब्ध होईल.

नेझल कोरोना वॅक्सिन म्हणजे काय?
नेझल कोरोना वॅक्सिन म्हणजे नाकावाटे देण्यात येणारी कोरोना लस आहे. यासाठी तुम्हाला इंजेक्शन घेण्याची गरज नाही. नाकाद्वारे या लसीचा डोस दिला जातो. ही लस त्वचेतून शरीरात प्रवेश करते आणि विषाणूविरोधात रोगप्रतिकार शक्ती निर्माण करते. या लसीला इंट्रानेझल वॅक्सिन असेही म्हणतात. नाकावाटे देण्यात येणारी ही लस इंजेक्शनला पर्याय म्हणून वापरली जाणार आहे. विशेषत: लहान मुले किंवा वृद्ध ज्यांना ट्रायपॅनाफोबिया आहे, म्हणजेच सुयांची भीती वाटते. अशा लोकांसाठी नेझल कोरोना वॅक्सिन उत्तम पर्याय आहे.



साताऱ्यात चॉकलेट घशात अडकल्याने चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू

वेध माझा ऑनलाइन - सातारा शहरात चॉकलेट घशात अडकल्याने एक वर्षाच्या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. मुलीच्या आईने चिमुकलीला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच चिमुकलीने आपला जीव सोडला. शर्वरी सुधीर जाधव रा. कर्मवीरनगर, कोडोली सातारा असे मृत चिमुकलीचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,  शर्वरीला तिच्या शेजारी राहणाऱ्या एका लहान मुलीने जेली चॉकलेट खाण्यास दिले. हे चॉकलेट तिने स्वत: गिळले. परंतु चॉकलेट तिच्या घशात अडकल्याने ती खोकू लागली. यानंतर ती बेशुद्ध पडली. तिच्या आईच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी घराशेजारी राहणारे देवबा जाधव यांना बोलावून घेतले. त्यांनी तातडीने शर्वरीला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.डॉक्टरांनी तिला तपासले असता ती मृत झाल्याचे समजले. चिमुलकलीच्या घशात चॉकलेट अडकून मृत्यू झाल्याने तिच्या आईने आक्रोश केला. या मातेचा आक्रोश अक्षरश: काळीज पिळवटून टाकणारा होता. 

Sunday, December 25, 2022

वेध माझा ऑनलाईन - देशात २०१ नवे रुग्ण देशात २४ तासांत कोरानाचे २०१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढून ३,३९७ झाली आहे. राज्यातील रुग्णांमध्ये अद्याप तरी मोठी वाढ झालेली नाही. मात्र सतर्कता म्हणून केंद्र सरकारने राज्यांना ऑक्सिजन सिलिंडर, व्हेंटिलेटर आणि इतर आवश्यक तयारी करुन ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. 

चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंडमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य असेल, असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी शनिवारी सांगितले. मांडविया यांनी सांगितले की, या देशातून येणाऱ्या कोणत्याही प्रवाशामध्ये कोरोना संसर्गाचे लक्षण दिसून आल्यास त्यांना विलगीकरणात ठेवण्यात येईल.
भारतात ओमायक्रॉनच्या एक्सबीबी आणि बीएफ.७ प्रकाराचे काही रुग्ण समोर आले आहेत. पण, यात वेगाने वाढ दिसत नाही. त्यामुळे कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता नाही. सध्या भारताची स्थिती ठीक आहे. 
















  

Saturday, December 24, 2022

राष्ट्रवादीचे आमदार अजितदादांवर नाराज ! ; शरद पवारांकडे व्यक्त करणार नाराजी?

वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं हिवाळी अधिवेशनातून निलंबन झालं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे जयंत पाटील यांना या अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आलं आहे. निलंबनाच्या या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार विरोधी पक्षनेते अजित पवारांवरच नाराज झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शरद पवारांच्या या नाराजीपाठोपाठ आता राष्ट्रवादीचे आमदारही अजित पवारांवर नाराज झाल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांकडे अजित पवारांबाबत नाराजी व्यक्त करणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.
जयंत पाटील यांच्याविषयी अजित पवार यांची सभागृहातील भूमिका अनेक आमदारांना आवडलेली नाही. अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त करून पक्षाच्या नेत्याची चूक असल्याचा भास करून दिला. जयंत पाटील यांच्या निलंबनावर अजित पवार यांनी आक्रमक भूमिका घ्यायला हवी होती, असं अनेक आमदार खासगीमध्ये बोलत आहेत.

शरद पवारांचा फोन
शरद पवार हे सध्या संसदेच्या अधिवेशनानिमित्त दिल्लीमध्ये आहेत, त्यामुळे दिल्लीमधून शरद पवारांनी अजित पवारांना फोन केला आणि नाराजी व्यक्त केली, अशी माहिती समोर येत आहे. जयंत पाटील यांच्या निलंबनावर अजित पवार यांनी आक्रमक भूमिका घ्यायला हवी होती. अजित पवार यांनी सभागृहात माफी मागण्यापेक्षा कठोर भूमिका घ्यायला हवी होती. मात्र तसं न झाल्यानं शरद पवार हे अजित पवारांवर नाराज असल्याचं बोललं जातंय.

तळीरामांसाठी खुशखबर ; नववर्षानिमित्त पहाटे पाच वाजेपर्यंत दारूची दुकानं सुरू राहणार ; वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन - तळीरामांसाठी खुशखबर आहे. नवीन वर्षच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. या काळात दारू पार्ट्यांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन होत असल्यानं यंदा ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त पहाटे पाच वाजेपर्यंत दारूची दुकानं सुरू राहणार आहेत. दारूची दुकानं पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार असल्यानं मद्यपींसाठी ही पर्वणी ठरणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून या निर्णयाची घोषणा करण्यात आली आहे.

तीन दिवस पहाटे पाचपर्यंत दुकानं सुरू राहणार   
राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या घोषणेनुसार राज्यातील दारूची दुकानं यंदा 24 डिसेंबर, 25 डिसेंबर आणि 31 डिसेंबर असे तीन दिवस पहाटे पाचवाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. यंदा नवीन वर्ष आणि ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर दारूची दुकानं पहाटे पाचपर्यंत सुरू राहणार असल्यानं मद्यपींसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे. या काळात मोठ्या प्रमाणात दारू विक्री होण्याची शक्यता असून, महसुलात देखील वाढ होणार आहे.

आ गोरेंच्या वडिलांनी अपघाताबाबत व्यक्त केली शंका ; काय म्हणाले... ?

वेध माझा ऑनलाइन - भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा आज पहाटे अपघात झाला. फलटण परिसरातील पुणे- पंढरपूर रस्त्यावर मलठणमध्ये ही घटना घडली. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे चालकाचे वाहानावरील नियंत्रण सुटल्यानं गाडी पुलावरून तीस फूट खोल खड्ड्यात कोसळली. ज्या वाहनाचा अपघात झाला त्या वाहनामध्ये भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यासह चार जण प्रवास करत होते. या घटनेमध्ये जयकुमार गोरे हे किरकोळ जखमी झाले तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मात्र या अपघाताबाबत जयकुमार गोरे यांच्या वडिलांनी शंका उपस्थित केली आहे. त्यांनी जयकुमार गोरे यांच्या तब्यतीची पत्रकारांना पुण्यात माहिती देताना अपघाताबाबत शंका वाटत असल्याचं म्हटलं आहे हा अपघात म्हणजे घातपाताचा प्रकार असावा अशी शंका येत असल्याचं त्यांच्या वडिलांनी म्हटलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

'अपघाताबाबत शंका'
आमदार साहेबांची तब्येत आता चांगली आहे. माझं त्यांच्यांशी बोलणं झालं. मात्र मला अपघाताबाबत थोडी शंका येते. अपघात होऊ शकतो एवढं रस्त्याने ट्राफिक नव्हतं. तो रस्ता अपघात होण्यासारखा देखील नाही. त्यामुळे मला या अपघाताबद्दल शंका येते. जयकुमार गोरे हा अपघात म्हणजे घातपाताचा प्रकार असावा अशी शंका येत असल्याचं त्यांच्या वडिलांनी म्हटलं आहे.

दहिवडीला जात असताना अपघात  
आमदार जयकुमार गोरे हे पुण्याहून गावी दहिवडीकडे जात असताना हा अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचं समोर येत आहे. जयकुमार गोरे यांच्यावर सध्या पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुन्हा कोविड प्रोटोकॉल पाळा ; चाचण्या वाढवा ; लसीकरण तसेच बूस्टर डोसची व्याप्ती वाढवा ; केंद्राच्या राज्यांना सूचना

वेध माझा ऑनलाइन - चीनमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, चीनमध्ये काही शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमिवर केंद्र सरकाराने राज्यांना सूचना दिल्या आहेत. शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कोरोना प्रतिबंधासाठीच्या तयारीबाबत चर्चा केली. बैठकीत मनसुख मांडविया यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आगामी सण आणि नवीन वर्षाचे उत्सव लक्षात घेऊन 'टेस्ट-ट्रॅक-ट्रीट आणि लसीकरण' वर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. याशिवाय मास्क लावणे, हात स्वच्छ ठेवणे आणि सामाजिक अंतर राखणे यासारख्या कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. 

केंद्राने इन्फ्लूएंझा सारखे आजार आणि तीव्र श्वसन आजाराच्या प्रकरणांचे नियमित जिल्हानिहाय निरीक्षण आणि अहवाल देण्यास सांगितले आहे.
आरोग्या मंत्र्यांनी सर्व राज्यांना सतर्क राहण्याचा आणि कोविड-19 व्यवस्थापनासाठी पूर्णपणे तयार राहण्याचा सल्ला दिला आहे. केंद्र आणि राज्यांनी सहकार्याच्या भावनेने काम करणे आवश्यक आहे, मागच्या वेळी आलेल्या दोन लाटेत जसे काम केले तसंच यावेळीही काम करण्याचा सल्ला आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे.
केंद्राने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, राज्यांना कोविड नियमांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात RT-PCR चाचण्या वाढवण्यास सांगण्यात आले आहे. नवे व्हेरियंट या काळात शोधली जाऊ शकतात, त्यामुळे जास्तीत जास्त केसेसचे चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लसीकरण वाढवण्यासाठी राज्यांना जनजागृती मोहीम राबवण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय बूस्टर डोसची व्याप्ती वाढवण्यासही सांगण्यात आले आहे.

Wednesday, December 21, 2022

राज्यात पुन्हा कोरोना वाढण्याची भीती ? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा...

वेध माझा ऑनलाइन - देशासह जगात अनेक ठिकाणी कारोना व्हायरस ने पुन्हा थैमान घातले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ व्हायला लागली होती. रुग्णालय पुन्हा एकदा कोविड रुग्णांनी खचाखच भरायला लागली असून, मृत्यूच्या संख्येमध्ये पुन्हा वाढ व्हायला लागली आहे. तर राज्यात देखील कोरोना विषाणू उफाळून आला आहे. अशा परिस्थितीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

देशासह राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोविड रुग्णसंखेत वाढ होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी टास्क फोर्स नेमण्यात येणार आहे. ही टास्क फोर्स राज्यातल्या कोरोना स्थितीबद्दल सरकारला सूचना देत राहील. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे. दरम्यान, पुन्हा निर्बंध, पुन्हा मास्क, पुन्हा लॉकडाऊन का? असा प्रश्न जनतेसमोर उपस्थित झाला आहे.

 अजित पवार यांनी विधानसभेत कोरोना संबंधित चिंता व्यक्त केली.
विधानसभेत बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, कोरोनाच्या काळात मार्च महिन्यात विदेशातून आलेल्या लोकांमुळं महाराष्ट्रात या विषाणूचा संसर्ग वाढला. त्यामुळं आता इतर देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडत असल्यानं अभ्यास करण्यासाठी आपण समिती नेमणार आहात का?कोरोना पसरू नये म्हणून लॉकडाऊन लावणार आहात का?शिंदे-फडणवीस सरकार कोरोनाबाबत कोणत्या उपाययोजना करणार आहे?असा सवाल अजित पवारांनी सरकारला विचारला.त्यानंतर विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या प्रश्नांना उत्तर देताना कोरोना महामारीबाबत उपाययोजना करण्यासाठी टास्क फोर्स किंवा एक समिती गठीत करणार असल्याची घोषणा केली. त्यासाठी केंद्रातील मोदी सरकारशी समन्वय साधण्यात येणार असून बदलत असलेल्या स्थितीवर सरकार लक्ष ठेवून असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री फडणवीसांनी अजित पवारांच्या प्रश्नांना उत्तर दिलं.

श्री सिद्धक्षेत्र सम्मेद शिखरजीला या जैन समाजाच्या धार्मिक क्षेत्राचे पावित्र्य व स्वातंत्र्य अबाधित रहावे या मागणीसाठी आज जैन संघाच्या वतीने कराडात मूक मोर्चा ; तहसीलदाराना दिले निवेदन ---


वेध माझा ऑनलाइन - 
श्री सिद्धक्षेत्र सम्मेद शिखरजीला या जैन समाजाच्या धार्मिक क्षेत्रास झारखंड सरकारने पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याबाबत परिपत्रक काढले आहे ते रद्द करण्यात यावे आणि या क्षेत्राचे पावित्र्य व स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यात यावे या मागणीसाठी आज समस्त जैन संघाच्या वतीने कराडात मूक मोर्चा काढण्यात आला यावेळी तहसीलदारांना निवेदनही देण्यात आले.

दरम्यान, या  निवेदनात म्हटले आहे...
जैन धर्म हा पुरातन आणि स्वतंत्र आहे या धर्मातील वर्तमान चोवीस तीर्थंकरापैकी वीस तीर्थंकर ज्या सिद्धक्षेत्रावरून मोक्षाला गेले, ते झारखंड मधील श्री सिद्धक्षेत्र सम्मेद शिखरजी अत्यंत पवित्र क्षेत्र आहे. या क्षेत्रावर जैन समाजातील सर्वांची श्रद्धा आहे या क्षेत्राच्या दर्शनासाठी लाखो श्रावक- श्राविका दरवर्षी यात्रा करीत असतात. झारखंड सरकारने या जैन धर्माच्या श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धक्षेत्र शिखरजिला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याबाबतचे परिपत्रक काढले आहे यामुळे जैन समाज  दुखावलेला आहे या क्षेत्राचे पूर्वीप्रमाणेच पावित्र्य आणि स्वातंत्र्य अबाधित राहावे यासाठी आम्ही सर्वजण अहिंसक आणि शांततामय मार्गाने आंदोलन करीत आहोत.तसेच आज रोजी बंदच्या आवाहनाद्वारे निवेदन करीत आहोत. तरी या आमच्या निवेदनाचा गांभीर्याने विचार व्हावा असेही दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे
दरम्यान हा मुकमोर्चा रविवार पेठेतील जैन मंदिरापासून चावडी चौक, नेहरू चौक, आझाद चौक, दत्त चौक ते तहसीलदार कचेरी याठिकाणी आला त्यानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले

Tuesday, December 20, 2022

कराडात दिनांक 24 ,25 ,26 रोजी यशवंत महोत्सवाचे आयोजन ; यशवंत बँकेचा उपक्रम ; बँकेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांची माहिती ...


वेध माझा ऑनलाइन - 
प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षी येथील यशवंत बँकेच्या वतीने ‘यशवंत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे येत्या २४, २५ व २६ डिसेंबर रोजी हा महोत्सव साजरा होणार आहे. यावेळी भागवत भूषण, ज्योतिषाचार्य पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी हे ‘महिमा साडेतीन शक्तीपिठांचा’ या विषयावर  संगीतमय कथा सादर करणार आहेत. अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मा.शेखर चरेगांवकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

दिनांक 24, 25, 26 डिसेंबर रोजी  सायंकाळी ६ वाजता श्री कृष्णामाई घाट येथे हा महोत्सव साजरा होणार आहे. यावेळी प्रत्येक सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते महाआरतीदेखील होणार आहे. लोकवर्गणीतून व प्रायोजकांच्या आर्थिक सहकार्यातून हा महोत्सव साजरा केला जातो. सर्वांनी मोठ्या संख्येने या महोत्सवास उपस्थित रहावे असे आवाहन बँकेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांनी केले आहे.

कराड तालुक्यातील 44 ग्रामपंचायत निवडणूक निकाल जाहीर ; कोणत्या गटाकडे किती ग्रामपंचायती ? ... वाचा सविस्तर...

वेध माझा ऑनलाइन - कराड तालुक्यात 
एकूण 44 ग्रामपंचायतिचे निकाल जाहीर झाले...
त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस- 13 
राष्ट्रीय काँग्रेस-15
भाजपा -8 
शिवसेना शिंदे गट-0 
शिवसेना ठाकरे गट-0 
आणि इतर तटस्थ- 8 असा निकाल जाहीर झाला आहे

Breaking

कासारशिरंबे ग्रामपंचायतीत काँग्रेसची बाजी ; सरपंचपदही पटकावले...

वेध माझा ऑनलाइन - कासारशिरंबे ग्रामपंचायतीत आमदार पृथ्वीराज चव्हाण व अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांच्या गटाने सरपंच पदासह सहा जागांवर विजय मिळवून सत्ता कायम ठेवली तर विरोधी डॉ. अतुल भोसले गटाला पाच जागा मिळाल्या.

Breaking

विजयनगर ग्रामपंचायतीत... माजी आमदार आनंदराव पाटील यांची सत्ता कायम

वेध माझा ऑनलाइन - विजयनगर ग्रामपंचायतीत माजी आमदार आनंदराव पाटील यांची सत्ता कायम राहिली. येथे यापूर्वी पाच सदस्य बिनविरोध निवडून आले होते. दोन सदस्य व सरपंच अशा तीन जागांसाठी निवडणूक लागली होती. या तीनही जागांवर माजी आमदार आनंदराव पाटील यांच्या नेतृत्वाखलील महाकाली पॅनेलने विजय मिळवला.

Breaking


वनवासमाची-खोडशी ग्रामपंचायतीत अ‍ॅड. उदयसिंहपाटील उंडाळकर व डॉ. अतुल भोसले यांच्या गटाची सत्ता

वेध माझा ऑनलाइन - वनवासमाची-खोडशी ग्रामपंचायतीत अ‍ॅड. उदयसिंहपाटील उंडाळकर व डॉ. अतुल भोसले यांच्या गटाची सत्ता आली आहे. त्यांच्या पॅनेलला सहा जागा मिळाल्या असून विरोधी पॅनेलला मतदारांनी तीन जागांवर रोखले.

Breaking...

तळबीड तसेच सुपने गावात झाले सत्तांतर ;

वेध माझा ऑनलाइन - तळबीड ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले आहे  त्याठिकाणी राष्ट्रवादीला धक्का बसला आहे राष्ट्रीय कॉग्रेसची सत्ता त्याठिकाणी आल्याचे चित्र आहे तर  सुपनेत देखील सत्तांतर झाले आहे त्याठिकाणी पालकमंत्री देसाई व व उंडाळकर गटाला धक्का बसला आहे

Breaking

किवळ तसेच अंतवडी ग्रामपंचायतीत सत्तांतर ;

वेध माझा ऑनलाइन - किवळ ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले आहे  राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झाली आहे 12/0 अशी मजल मारत विरोधी भाजपा आणि शिंदे गट पराभूत झाल्याचे चित्र आहे
तसेच अंतवडी ग्रामपंचायतीत  सत्तांतर झाले असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला धक्का बसला आहे तर माजी मंत्री आ. बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलचा दणदणीत विजय झाला आहे

Breakibg

चरेगावात राष्ट्रवादीची सत्ता ...

वेध माझा ऑनलाइन - चरेगाव ग्रामपंचायतीत
राष्ट्रवादीची सत्ता कायम राहिली आहे पतंगराव माने गटाचे 10, तर सुरेश माने गटाचे 3 उमेदवार निवडून आले आहेत

ब्रेकिंग.....

Monday, December 19, 2022

वडगाव हवेली ग्रामपंचायतीत सत्तांतर ...जगदीश दादा जगताप गटाचे सरपंचपदासह 11 सदस्य विजयी

वेध माझा ऑनलाइन - वडगाव हवेली ग्रामपंचायत सत्तांतर काँग्रेसला धक्का भाजपा विजयी जगदीश दादा जगताप यांच्या गटाचे सरपंचपदासह 11 सदस्य विजयी महाविकास आघाडीचे पाच उमेदवार विजयी

ब्रेकिंग.....

कराडात परीट समाजाचा रविवारी वधू-वर पालक मेळावा

वेध माझा ऑनलाईन -  संत गाडगेबाबा यांच्या 66 व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून कराड तालुका परीट समाज सेवा मंडळाच्यावतीने रविवार दि.25 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कराड येथील शुक्रवार पेठेतील नामदेव मंदिरात परीट समाजाचा 28 वा वधू-वर पालक मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.मधुकर कोथमिरे (बारामती) हे उपस्थित राहणार आहेत. तसेच परीट समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष शामराव सोनटक्के,माजी अध्यक्ष भिकू राक्षे, माजी उपाध्यक्ष बबनराव शिंदे (आप्पा), सातारा जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव (मेहरबान) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या मेळाव्यात वधू-वर नोंदणी, संत गाडगेबाबा पुण्यतिथी कार्यक्रम, व्याख्यान व समाजाच्या नवनियुक्त सदस्यांचा सत्कार असे कार्यक्रम होणार आहेत. या मेळाव्यास कराडसह सातारा जिल्ह्यातील परीट समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन परीट समाजसेवा मंडळाचे सातारा जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव (मेहरबान) यांनी केले आहे.

कुसूर ग्रामपंचायत निवडणुक ; शेतकरी ग्रामविकास पॅनलचा सरपंचपदासह ऐतिहासिक विजय ...

वेध माझा ऑनलाइन - कुसूर ग्रामपंचायत निवडणुकीत शेतकरी ग्रामविकास पॅनलने सरपंचपदासह ऐतिहासिक विजय प्राप्त करत 10 पैकी 10 जागी विजय मिळवला आहे. उदयसिंह आनंदराव कदय यांना सरपंचपदासाठी बहुमत प्राप्त झाले आहे. कदम, मोरे, देशमुख यांच्या गटाने खाडे-पाटील गटाचा दारुन पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. रयत शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष दानशूर बंडो गोपाळा कदम यांचे नातू उदयसिंह कदम यांना सरपंच पदी बहुमत मिळाले आहे 

ब्रेकिंग...

आटके गावात सत्तांतर ; सर्वपक्षीय आघाडी परिवर्तन पॅनल विजयी ; लोकनियुक्त सरपंचपदी देखील मिळवला विजय

वेध माझा ऑनलाइन - कराड तालुक्यातील आटके येथे तब्बल तीस वर्षानंतर सत्तांतर झाले. पैलवान धनाजी पाटील यांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांनी ८ जागांवर विजय मिळवत लोकनियुक्त सरपंचपद काबीज केले. सरपंच पदाच्या उमेदवार रोहिणी नितीन पाटील यांनी प्रचंड मतांनी या ठिकाणी विजय मिळवला आहे. तर ग्रामविकास पॅनेल यांना ५ जागांवर समाधान मानावे लागले.वार्ड क्रमांक १ मध्ये सर्व उमेदवार पैलवान धनाजी पाटील यांच्या गटाचे विजयी झाले तर वार्ड क्रमांक २ व ४ मध्ये परिवर्तन पॅनेलने बाजी मारली. वार्ड क्रमांक ३ मध्ये १ जागा परिवर्तन पॅनेलला तर १ जागा धनाजी पाटील यांच्या पॅनलला मिळाली. वार्ड क्रमांक ५ मध्ये २ जागा परिवर्तन पॅनेलला तर १ जागा धनाजी पाटील यांच्या पॅनलला मिळाली.

रेठरे खुर्द निवडणुकीत काँग्रेस सरपंच पदाच्या उमेदवार सुनीता बापुसो साळुंखे विजयी

वेध माझा ऑनलाइन - रेठरे खुर्द येथील काँग्रेस सरपंच पदाच्या उमेदवार सुनीता बापुसो साळुंखे विजयी झाल्या आहेत आमदार पृथ्वीराज चव्हाण गटाच्या म्हणुन या निवडणुकीत त्या उभ्या होत्या

Breaking...

तारुख ग्रामपंचायत अपक्ष सरपंच विजयी भाजपा कॉग्रेस ला धक्का ; इतर काही ग्रामपंचायत निवडणूक निकालही वाचा...

वेध माझा ऑनलाइन - तारुख ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा कॉग्रेस ला धक्का बसला आहे त्याठिकाणीअपक्ष सरपंच उमेदवार सचिन कुराडे  विजयी झाला आहे
तसेच अंतवडी ग्रामपंचायतीत  सत्तांतर झाले असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला धक्का बसला आहे तर याठिकाणी आमदार बाळासाहेब पाटील यांचा पॅनेलचा दणदणीत विजय झाला आहे
मनवं येळगाव येथे उदयसिंह पाटील उंडाळकर यांची सत्ता कायम राहिली तर हिंगनोळी /हेळगाव पाडळी/अंतवडी येथे राष्ट्रवादी बाळासाहेब पाटील यांची सत्ता कायम राहिली आहे 
वनवासमाची ग्रामपंचायत स्थानिक आघाडीच्या ताब्यात गेली आहे  

दुशेरे ग्रामपंचायत निकाल ; भाजपचा झाला सरपंच ; 6 जागा भाजपला तर 3 जागा महाविकास आघाडीला

वेध माझा ऑनलाइन - दुशेरे तालुका कराड च्या सरपंचपदी भाजपाचे डॉ. अतुल भोसले गटाचे *आनंदा गायकवाड यांनी विजय मिळवला आहे तर सदस्यपदी भाजपाच्या सहा जागा तर महाविकास आघाडीला  तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे 

Breaking......

पश्चिम सुपने ग्रामपंचायत निकाल ; पालकमंत्री शंभूराज देसाई आणि ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या गटांचा 4 जागांवर विजय तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा सरपंच पदावर विजय

वेध माझा ऑनलाइन - कराड तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीच्या मतमोजणीस सुरुवात झाली असून कराड तालुक्यातील पश्चिम सुपने ग्रामपंचायत निकाल पहिला हाती आला आहे. यामध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई आणि ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या गटांनी 4 जागांवर विजय मिळवला आहे. तर विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने सरपंच पदावर विजय मिळवला. कराड तालुक्यात सुपने ग्रामपंचायत निवडणुकीत गड आला पण सिह गेला आहे.
पश्चिम सुपने ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रावण कोळी यांनी केवळ 2 मतांनी विजय मिळवला आहे. या ठिकाणी वार्ड क्रमांक एक मधून भिकाजी गायकवाड 187 मते, लता थोरात 191 मते, तात्यासो गायकवाड 138 मते, संगीता चव्हाण 168 मते हे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाचे उमेदवार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार जयश्री गायकवाड यांना 184 तर विशाल उत्तम कळंबे 97 मते मिळालेली आहेत. तसेच प्रियंका विशाल चव्हाण व सुजाता रमेश चव्हाण यांना वार्ड क्रमांक तीन मध्ये 106 समसमान मते पडल्याने त्यांचा निकाल चिट्टीवर ठरणार आहे.

ग्रामपंचायत निवडणूक ; आज मतमोजणी 2 टप्प्यात होणार ; मतमोजणीमुळे कराड शहरातील वाहतुक व्यवस्थेत बदल….

वेध माझा ऑनलाइन - अनेक ग्रामपंचायत निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे. सातारा जिल्ह्यातील भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटाच्या सेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सातारा जिल्ह्यातील 259 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुरळा उडाला असून रविवारी सर्वत्र चुरशीने मतदान झाले. आता प्रत्यक्ष मतमोजणी होणार आहे त्यानंतर गुलाल कोणाचा हे स्पष्ट होणार आहे
सातारा जिल्ह्यात शांततेत मतदान पार पडले आहे आज मतमोजणीस सुरुवात होत असून कराड तालुक्याची मतमोजणी 2 टप्प्यात होणार आहे

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतमोजणी केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात हनुमानवाडी, वनवासमाची, ओंडोशी, चोरजवाडी, तारुख, दुशेरे, हिंगगोळे ,घोलपवाडी, अंतवडी, वडगाव हवेली, आणे, पाडळी हेळगाव, मनू, कासारशिरंबे, पश्चिम सुपने, किवळ, येळगाव, आटके,चरेगाव, तळबीड या 20 गावांची मतमोजणी होणार आहे. तर दुसर्या टप्प्यात जुने कवठे, विजयनगर ,डेळेवाडी, धावरवाडी, वानरवाडी ,जुळेवाडी, गणेशवाडी, शामगाव ,कुसुर, कालगाव, रेठरे खुर्द, कोरेगाव, सुपने या 13 गावांची मतमोजणी होणार आहे.

मतमोजणीमुळे कराड शहरातील वाहतुक व्यवस्थेत बदल….
कराड तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीची मतमोजणीस येथील प्रशासकीय मध्यवर्ती कार्यालयात सकाळी सुरुवात झाली असून या पार्श्वभूमीवर शहरात येणारी व बाहेर जाणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. नवीन प्रशासकीय इमारतीकडे जाणारा मार्ग– भेदा चौक ते शाहू चौक कडे जाणारा रोड, दत्त चौक ते शाहू चौक जाणारा रोड, दत्त चौक ते भेदा चौक जाणारा रोड- पोपटभाई पेट्रोल पंप ते दत्त चौक जाणारी वाहतूक बंद असणार आहे.

भेदा चौका कडून दत्त चौकाकडे जाणारी वाहने ही भेदा चौक- विजय दिवस चौक या मार्गाने कराड शहरात जातील.कोल्हापूर बाजूकडून येणारी वाहतूक व दत्त चौकाकडे जाणारी वाहने ही कोल्हापूर नाका- पोपटभाई पेट्रोल पंप- भेदा चौक विजय दिवस चौक मार्गे जातील. दत्त चौक ते शाहू चौक, भेदा चौक बाजूकडे जाणारी वाहने ही दत्त चौक-कर्मवीर पुतळा-विजय दिवस चौक भेदा चौक मार्गे जातील. वारूंजी कडून जुन्या कोयना पुलावरून कराड शहरात येणारी वाहने ही दैत्यनिवारणी चौक- अंजठा चौक पोपटभाई पेट्रोल पंप- भेदा चौक- विजय दिवस चौक मार्गे जातील मात्र शाहू चौकात येण्यास मनाई करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत निवडणूक ; मतमोजणीकरिता सातारा जिल्हा प्रशासन सज्ज ....मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत बदल ; वाचा सविस्तर...

वेध माझा ऑनलाइन - ग्रामपंचायतिच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीकरिता सातारा जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे...कराड तालुक्यात पहिल्या फेरीत टेबल क्रमांक 1 ते 20 वर हनुमानवाडी, वनवासमाची, ओंडोशी, चोरजवाडी, तारुख, दुशेरे, हिंगणोळे, घोलपवाडी, अंतवडी, आणे, पाडळी (हेळगाव), मनु, कासारशिरंबे, पश्चिम सुपने, किवळ, येळगाव, आटके, चरेगाव, तळबीड, वडगाव हवेली या गावांचा समावेश आहे दुसऱ्या फेरीत टेबल क्रमांक 1 ते 14 वर जुने कवठे, विजयनगर, डेळेवाडी, धावरवाडी, वानरवाडी, जुळेवाडी, गणेशवाडी, शामगाव, कुसुर, कालगाव, रेठरे खुर्द, कोरेगाव, सुपने या गावांचा समावेश असुन मतमोजणी नऊ वाजता सूरू होणार आहे.

कराड तालुका  मतमोजणी करिता ठिकाण व  व्यवस्था -
नवीन प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय कराड, टेबल-20, RO- 26, ARO- 33, शिपाई व कोतवाल - 40, पर्यवेक्षक, सहायक - 28 इतर अधिकारी व कर्मचारी -20

वाहतूक मार्गात बदल...
नवीन प्रशासकीय इमारतीकडे जाणारा मार्ग-- भेदा चौक ते शाहू चौक कडे जाणारा रोड, दत्त चौक ते शाहू चौक जाणारा रोड, दत्त चौक ते भेदा चौक जाणारा रोड- पोपटभाई पेट्रोल पंप ते दत्त चौक जाणारी वाहतूक बंद असणार आहे.
भेदा चौका कडून दत्त चौकाकडे जाणारी वाहने  भेदा चौक- विजय दिवस चौक या मार्गाने कराड शहरात जातील.
कोल्हापूर बाजूकडून येणारी वाहतूक व दत्त चौकाकडे जाणारी वाहने ही कोल्हापूर नाका- पोपटभाई पेट्रोल पंप- भेदा चौक विजय दिवस चौक मार्गे जातील.
दत्त चौक ते शाहू चौक, भेदा चौक बाजूकडे जाणारी वाहने ही दत्त चौक-कर्मवीर पुतळा-विजय दिवस चौक भेदा चौक मार्गे जातील.
वारंजी कडून जुन्या कोयना पुलावरून कराड शहरात येणारी वाहने ही दैत्यनिवारणी चौक- अजिंठा चौक पोपटभाई पेट्रोल पंप- भेदा चौक- विजय दिवस चौक मार्गे जातील मात्र शाहू चौकात येण्यास मनाई करण्यात आली आहे.
 पार्किंग व्यवस्था-
ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी अनुषंगाने येणारी शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांच्या वाहनांसाठी कराड तालुका पोलीस ठाण्याच्या पाठीमागील मैदानात पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे.ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी अनुषंगाने येणाऱ्या नागरिकांच्या सर्व प्रकारच्या वाहनासाठी भेदा चौक, दैत्यनिवारणी मंदिर परिसर, साईबाबा मंदिर परिसर दत्त चौक या ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे अशी माहिती कराड वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सरोजिनी पाटील यांनी दिली


चारचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू ; कराड जवळ घडली घटना ;

वेध माझा ऑनलाइन - मलकापूर ता. कराड येथे चारचाकीने पादचाऱ्यास धडक दिली. या अपघातात पादचारी जखमी झाले होते, त्यास उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. परंतु सदरील जखमी व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. शंकर आनंदा कुंभार वय- 71 वर्षे रा. कुंभारगाव ता. पाटण असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी निखिल बलराम पोपटानी वय- 33 वर्षे, रा. मलकापूर, ता. कराड यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत कराड शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बेंगलोर- पुणे जाणारे हायवेवर कराड बाजुकडे जाताना मलकापुर हद्दीत एन. पी. मोटर्स दुकानाचे समोर सांयकाळी चारचाकीने पादचाऱ्यास धडक दिली. एक पांढऱ्या रंगाची कार पुणे बाजुकडे जात होती, त्या कारने पायी चालणाऱ्या शंकर कुंभार यांना धडक दिली. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून निघून गेला होता. तेव्हा फिर्यादी निखिल पोपटानी यांनी कारचा पाठलाग केला. सदरची कार क्रमांक MH-09-DA-4706कोल्हापुर नाका येथे थांबवली. तेव्हा कार चालकाने अनिल नारायणदास नोतानी रा. रुईकर काॅलनी, कोल्हापुर असे नांव सांगितले.
अपघातातील जखमी शंकर कुंभार यांना उपचारासाठी काॅटेज हाॅस्पीटल कराड येथे नेण्यात आले होते. परंतु उपचारापुर्वीच ते मयत झाले होते. कार चालक अनिल नोतानी यांच्यावर भरधाव वेगाने निष्काळजी पणे कार चालवून, गंभीर दुखापत व मृत्यूस कारणीभूत प्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Sunday, December 18, 2022

एकनाथ खडसेंचा फोटो केबिन मधून काढून टाकला ; जिवंतपणी कोणी फोटो लावत का?गिरीश महाजनांचा खडसेना टोला ;

वेध माझा ऑनलाइन - जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत भाजप शिंदे गटाने राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना सातवे आस्मान दाखवत पराभूत केलं. त्यानंतर आज चेअरमनपदीची निवडणूक झाली. यावेळी, एकनाथ खडसे यांचा फोटो हो केबिनमधून काढून टाकण्यात आला आहे. 'जिवंतपणी कुणी कसं काय फोटो लावतो' असं म्हणत गिरीश महाजनांनी खडसेंना टोला लगावला'

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाने एकनाथ खडसेंची सत्ता संपुष्टात आणत विजय मिळवला आणि या विजयानंतर आज चेअरमनपदाची निवड करण्यात आली. यात आमदार मंगेश चव्हाण यांची मंत्री गिरीश महाजन व मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत चेअरमनपदी निवड करण्यात आली. मात्र या निवडीनंतर दूध संघातील चेअरमन केबिनमध्ये असलेला एकनाथ खडसे यांचा फोटो हटवण्यात आला.
गिरीश महाजनांसमोर हा फोटो हटवण्यात आला असून 'आम्ही मंत्री असलो तरी आमचे फोटो आम्ही लावत नाही मात्र जिवंतपणी कोण कसं काय फोटो लावतो? असा टोला यावेळेस गिरीश महाजनांनी खडसेंना लगावला आहे.

Saturday, December 17, 2022

शाइफेकीचा चंद्रकांतदादाना धसका ? सुरक्षा व्यवस्था वाढवली तरी कार्यक्रमाला येताना चेहऱ्यावर घातले फेसशिल्ड ...

वेध माझा ऑनलाइन - महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवड येथील एका कार्यक्रमात शाईफेक झाली होती. असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी पाटील यांची सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. मात्र, आज सकाळी त्यांना सोशल मीडियावरुन पुन्हा एकदा शाईफेकीची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे हा प्रकार टाळण्यासाठी चंद्रकांत पाटील फेसशिल्ड घालून आले होते. पुणे येथील पवनाथडी जत्रेच्या उद्घाटनप्रसंगी ते उपस्थित होते. याचे फोटो आता चर्चेचा विषय ठरत आहे.

चंद्रकांत पाटील यांना पुन्हा शाईफेकीची धमकी 
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना दोन व्यक्तींनी फेसबुक पोस्ट करत ही धमकी दिली होती. त्यांच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं नसल्याने शाईफेक होण्याची शक्यता होती. यामुळे चंद्रकांत पाटील यांनी खबरदारी म्हणून फेसशिल्ड लावत उद्घाटन केलं. 'आज पुन्हा शाईची मुक्त उधळण होणार? मुक्काम पोस्ट सांगवी.' पत्रकार मित्रांनो आज पण चांगला अँगल घ्या. पवना थडी जत्रा, अशा आशयाची फेसबुक पोस्ट टाकण्यात आलेली होती. ही फेसबुक पोस्ट करणाऱ्या विकास लोले आणि दशरथ पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे माजी नगरसेवक हर्षल ढोरे यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. विकास लोले हा चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियाचा अध्यक्ष असल्याचा दावा ढोरे यांनी केला आहे.


तर...महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, शरद पवार यांनी सत्ताधार्यांना दिला परखड इशारा...महाविकास आघाडीच्या महामोर्चाला लाखोंचा समुदाय उपस्थित ;

वेध माझा ऑनलाइन - राज्यपालांसह भाजपाच्या नेत्यांकडून झालेल्या महापुरुषांच्या अपमानाविरोधात आज महाविकास आघाडीने काढलेल्या महामोर्चाला जोरदार प्रतिसाद मिळाला. या मोर्चात नेत्यांसह लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्य़ान, या मोर्चाला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली. तसेच महापुरुषांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना परखड शब्दात इशारा दिला. दरम्यान राज्यपाल यांची वेळीच हकालपट्टी केली नाही तर महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही शरद पवार यांनी यावेळी दिला.

शरद पवार सभेला संबोधित करताना म्हणाले की, आज हे लाखोंच्या संख्येने शक्ती एकत्र का आली. त्याचं कारण आहे महाराष्ट्राच्या सन्मानासाठी. महाराष्ट्राच्या सन्मानावर हल्ले होत आहे. आज सत्तेवर बसलेले लोक महाराष्ट्राच्या नेतृत्वाविषय, महाराष्ट्राच्या युगपुरुषांविषयी एक वेगळ्या प्रकारची भाषा वापरत आहेत. संपूर्ण भारताला आत्मविश्वास देण्याचं ऐतिहासिक काम शिवछत्रपतींनी केलं आहे. या देशात अनेक राजे होऊन गेले. अनेकांची संस्थानं झाली. मात्र साडेतीनशे वर्षांनंतर जनतेच्या सामान्य लोकांच्या ओठावर एक नाव कायम आहे ते म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज होय. त्या शिवछत्रपतींचा उल्लेख राज्यातील एकादा मंत्री करतो. अन्य कुणी सत्ताधारी पक्षाचे घटक करतात. हे महाराष्ट्र सहन करणार नाही. यासंबंधीची तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी लाखोंच्या संख्येने तुम्ही येथे आला आहे. आज तुम्ही इशारा दिला. त्यातून राज्यकर्त्यांनी बोध घेतला नाही तर लोकशाहीच्या माध्यमातून काय धडा शिकवायचा हे दाखवल्याशिवाय महाराष्ट्र स्वस्त बसरणार नाही, असा इशारा शरद पवार यांनी दिला. 

शरद पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्राची काही वैशिष्ट्ये आहेत, काही सन्मानचिन्हे आहेत. महात्मा फुले असोत, शाहू महाराज असो, डॉ. आंबेडकर असोत, कर्मवीर भाऊराव पाटील असोत, ही आमची सन्मानाची, आदराची स्थाने आहोत. आजचे राज्यकर्ते याबाबत काय बोलतात. महाराष्ट्राच्या इतिहासात असे राज्यपाल कधी पाहिले नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेत जाऊन मला ५५ वर्षे झाली. या काळात अनेक राज्यपाल पाहिलेत. त्यांनी महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवण्याचं काम त्यांनी केलं. मात्र यावेळी एक अशी व्यक्ती या ठिकाणी आणली जी महाराष्ट्राच्या विचारधारेला संकटात आणण्याचं काम करत आहे. महात्मा फुले असो, सावित्रिबाई असोत. त्यांच्याबाबत अनुदगार काढतेय, त्यांना लाज वाटली पाहिजे. अशा व्यक्तींची टिंगल टवाळी करत असतील, तर राज्यपालांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे या मोर्चाच्या माध्यमातून मी केंद्राला आवाहन करतो की, यांची हकालपट्टी लवकरात लवकर करा. जर वेळीच हकालपट्टी केली नाही तर महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शरद पवार यांनी दिला.

यावेळी वादग्रस्त विधानांच्या मुद्द्यावरून भाजपाच्या अन्य नेत्यांवरही टीका केली. ते म्हणाले की, मला गंमत वाटते या राज्यकर्त्यांमध्ये एक स्पर्धा सुरू झालीय. ती स्पर्धा कर्तृत्वाची नाही, महाराष्ट्राच्या विकासाची नाही तर महाराष्ट्राच्या बदनामीची स्पर्धा सुरू आहे. याठिकाणी एका मंत्र्याने उल्लेख केला की, कुणीतरी शिक्षण संस्था चालवायची असेल तर तुम्ही भीक मागा म्हणून, यावेळी त्यांनी नावं घेतली कुणाची तर महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांची. कर्मवीरांनी लाखो विद्यार्थ्यांना शिकवले. वसतीगृहे काढली. अशा व्यक्तींविरोधात कुणीतरी गलिच्छ शब्द वापरत असेल, तर त्यांना धडा शिकवण्याचं काम तुम्हाला करावं लागेल, असे आवाहन शरद पवार यांनी केलं.

महाराष्ट्रातील तरुणांनी सैन्यदलात अधिकारी व्हावे; कर्नल संभाजीराव पाटील

वेध माझा ऑनलाइन -  सैन्यदलातील जवानांचा समाजात आदर हा झालाच पाहिजे. माजी सैनिकांनी देशाचा आदर्श नागरीक बनुन समाज सुधारणेसाठी प्रयत्न करावा. आपल्याबरोबर आपल्या कुटुंबातील सर्वांना शिस्त लावुन प्रत्येक घरातील एकतरी तरुन सैन्यदलात भरती होवुन तो अधिकारी व्हावा यासाठी प्रयत्न करावे. त्यासाठी लागेल ती मदत दिली जाईल. माजी सैनिकांना आपसातील, भावकीतील मतभेद मिटवुन एकोप्याने रहावे, असे आवाहन कर्नल संभाजीराव पाटील यांनी केले. 

माजी सैनिकांच्या प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी आयोजीत माजी सैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. कर्नल डी. के झा, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार विजय पवार, भुमि अभिलेख उपाधिक्षक बाळासाहेब भोसले, अॅड. संभाजीराव मोहिते, स्टेट बॅंकेचे अधिकारी यादव, लेष्टनंट कमांडर दिग्वीजय जाधव, कॅप्टन इंद्रजीत जाधव, मोहिते प्रतिष्ठानचे विक्रम मोहिते, महावितरणचे कार्यकारी अभियंता रविंद्र बुंदेले, जिल्हा सैनिक कार्यालयातील संघटक रामचंद्र जाधव यांच्यासह वीर माता, विर पिता, वीर पत्नी, त्यांचे कुटुंबीय, मिल्ट्री बॉईज अॅकेडमीचे विद्यार्थी, एसजीएम एनसीसीची सर्व विद्यार्थी उपस्थित होते. 

प्रांताधिकारी दिघे म्हणाले, भारतमातेचे रक्षण करणाऱ्या सैन्यदलातील जवानांची आणि माजी सैनिकांची संख्या सातारा जिल्ह्यात मोठी आहे. माजी सैनिक निवृत्त होवुन गावी आल्यावर त्यांचे अनेक प्रश्न असतात. त्या प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी प्रशासन सदैव तत्पर राहील. आवश्यकता असल्यात मला आणि तहसीलदारांना थेट भेटावे. 
तहसीलदार पवार म्हणाले, अमृत वीर जवान अभियान शासनाकडुन सुरु आहे. त्याअंतर्गत सर्व सैनिकांच्या सर्व प्रश्नांची सोडवणुक करण्याची कार्यवाही केली जाते. ज्यांचे अजुनही प्रश्न प्रलंबीत आहेत, त्यांनी थेट मला भेटुन त्या समस्या मांडाव्या. त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील. कर्नल झा यांनी सैन्यदलात, प्रशासकीय सेवेत विद्यार्थी अधिकारी व्हावे यासाठी मी मार्गदर्शन करत असल्याचे सांगीतले. श्री. मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले.     
यावेळी वीर माता, विर पिता, वीर पत्नी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थित माजी सैनिकांचा प्रमाणपत्र देवुन गौरवण्यात आले. देशभक्तीपर गिते मिनल ढापरे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आली. कॅप्टन इंद्रजीत मोहिते यांनी प्रास्तविक केले. डॉ. स्नेहल राजहंस यांनी सुत्रसंचालन केले. सुभेदार मगरे यांनी आभार मानले. 


पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याच्या निषेधार्थ कराडच्या दत्त चौकात भाजपची तीव्र निदर्शने ; आंदोलकांना अटक ;

वेध माझा ऑनलाईन -  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल घृणास्पद टीका करणारे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्यावतीने कराड येथील दत्त चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले व प्रदेश सचिव विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात संतप्त कार्यकर्त्यांनी भुट्टो यांच्या प्रतिमेला जोडे मारत, आपला निषेध व्यक्त केला. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल घृणास्पद वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याच्या निषेधार्थ आज भाजपाच्यावतीने देशभर जोरदार आंदोलन करण्यात आले. याचाच भाग म्हणून कराड येथे भाजपाच्यावतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘बिलावल माफी मांगो’ अशा घोषणा देत भुट्टो यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करुन आपला संताप व्यक्त केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली. 

यावेळी माध्यमांशी बोलताना भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले म्हणाले, जगात सर्वांत मोठा लोकशाही देश असलेल्या भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अश्लाघ्य विधान करणाऱ्या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचा सर्वस्तरातून आम्ही निषेध करत आहोत. आपल्या अपरिपक्व मताने भुट्टो यांनी त्यांच्या देशाची लाज वेशीवर टांगली आहे. स्वत:च्या देशातील समस्या सोडविता येत नसल्याने अशी विधाने करुन ते खळबळ माजविण्याचा प्रयत्न करत असून, याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. 

मोदींच्या माध्यमातून जगात सर्वत्र भारताचे नाव उंचावत असताना, दहशतवाद्यांचा अड्डा असणाऱ्या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याने केलेले विधान निंदनीय आहे. भविष्यात अशी कुरघोडी करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला भारताकडून जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा भाजपाचे प्रदेश सचिव विक्रम पावसकर यांनी यावेळी दिला. 

आंदोलनात भाजपाचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी, महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सारिका गावडे, तालुकाध्यक्ष सौ. श्मामबाला घोडके, स्वाती पिसाळ, भाजयुमोचे सुदर्शन पाटसकर, उमेश शिंदे, मुकुंद चरेगावकर, घनश्याम पेंढारकर, सुनील शिंदे, सुनील नाकोड, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष आबा गावडे, राजू मुल्ला, बाळासाहेब घाडगे, सुरज शेवाळे, तानाजी देशमुख, संतोष हिंगसे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 


रौप्यमहोत्सवी विजय दिवस समारोहाची चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी मोठ्या उत्साहात सांगता...

वेध माझा ऑनलाइन -  बांग्लामुक्ती लढय़ातील भारतीय सेनेच्या विजयाप्रित्यर्थ कराडमध्ये गेल्या 24 वर्षांपासून साजऱ्या होणाऱ्या विजय दिवस समारोहाचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष होते. शुक्रवार दि. १६ रोजी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर या रौप्यमहोत्सवी विजय दिवस समारोहाची चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी मोठ्या उत्साहात सांगता झाली.

बांग्लामुक्ती संग्रामात भारतीय सैन्याने मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या पुढाकारातून येथे प्रतीवर्षी विजय दिवस समारोहाचे आयोजन केले जाते. यंदा रौप्यमहोत्सव वर्ष असल्याने विजय दिवस समारोह समितीने कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले. महेंद्र भोसले, राष्ट्रीय खेळाडू पौर्णिमा कुंभार, पूर्वा लिबे, योगिनी कोकरे, रोशनी पाटणकर, अदिती चव्हाण, अनुष्का जगताप यांनी आणलेल्या विजय ज्योतीचे माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार, माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, विठ्ठल मिणीयार, लेफ्टनंट जनरल पी. जे. एस पन्नू, डिंपल पन्नू, ए. एस. पाटील, विजय दिवस समितीचे उपाध्यक्ष अरुण जाधव, समीतीचे सचीव अॅड. संभाजीराव मोहिते, सहसचीव विलासराव जाधव, विनायक विभुते, दिपक अरबुणे, संगीता साळुंखे, श्रीमती शारदा जाधव, कर्नल झा, माजी सैनिक सेलचे अध्यक्ष गणपतराव शिर्के आदींसह मान्यवरांनी स्वागत केले. दरम्यान मिनल ढापरे यांच्या नेतृत्वाखाली महिलांची तिरंगा बाईक रॅलीचे आगमन झाले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांना संचलनाने मानवंदना देण्यात आली. त्यात सैन्यदल, पोलिस, खेळाडू, पोलिसांचे बॅण्ड पथक, एनसीचीचे विद्यार्थी-विद्यार्थीनी, स्थानिक कलाकार, विजय दिवसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले. त्यानंतर सातारा पोलिस, २४ मराठा लाईट इंन्फंट्रीच्या बॅन्ड पथकाने धून वाजवून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. शहरातील मिनल ढापरे आणि वसीम शेख यांच्या मी अॅण्ड सी, डी, टु डी च्या बालचिमुकल्यांनी सादर केलेल्या देशभक्तिमपर नृत्यास उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. दरम्यान पॅराग्लायडींग करणारे वाई येथील गोवींद येवलेंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. काही अंतरावरील ते मैदानावर उतरेपर्यंत उपस्थितांच्या नजरा त्यांच्यावर खिळून होत्या. मैदानात उतरताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचे स्वागत केले. यावेळी ऍरो मॉडेलिंगचे प्रात्यक्षिकही झाले. विमानाची प्रतिकृती हवेत झेपावण्याचे प्रात्यक्षिकांनीही उपस्थित मंत्रमुग्ध झाले. यावेळी मल्लखांब प्रात्यक्षिक २३, २४ मराठा लाईट इंन्फंट्री पुणे आणि केरळ - सुभेदार गणपत बेळगावकर, नायब सुभेदार रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी सादर केली. यावेळी त्यांच्या चपळाईचे उपस्थितांनी कौतुक केले. मल्लखांबाच्या कसरती करून जवानांनी उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. त्यानंतर सैन्यदलाच्या श्वान पथकाचा डॉ शो झाला. तो पुणे येथील सैन्यदलानी हवालदार एन. एस. तोमर यांच्या मार्गदर्शनाखाली कसरती सादर केला. त्यांनी आज्ञा पाळणे, शस्त्रुवर हल्ला करणे, बॉम्बशोधने यासह अन्य कौशल्ये दाखवुन बाळगोपाळांचे लक्ष वेधले. अरुणाचाल प्रदेश त्यांच्या संस्कृतीतील देशभक्तीपर गीत व नृत्य सादर केली. त्याच्या संस्कृतीचे दर्शन त्यांनी कऱ्हाडकरांना घडवले. त्यानंतर  आत्माराम विद्यामंदीर ओगलेवाडीच्या पथकाने लेझीम, जगबंद ढोलताशा पथकाने वादन करुन दांडपट्ट्याचे प्रात्यक्षिके सादर केली. होली फॅमिलीच्या विदयार्थ्यांनी बॅण्डचे सुंदर वादन केले. भरत कदम यांनी सुत्रसंचालन केले. सातारा पोलिस बॅण्डच्या राष्ट्रगिताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

Friday, December 16, 2022

विजय दिवस पुरस्कार सोहळा की राष्ट्रवादीचा इव्हेंट ; कराडात चर्चा;

वेध माझा ऑनलाइन - विजय दिवस समारोह समितीतर्फे दिला जाणारा यंदाचा जीवन गौरव यशवंत पुरस्कार माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील यांना माजी गृहमंत्री आमदार दिलीप वळसे- पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्यक्रमात एका राष्ट्रवादीच्या नेत्याच्या हस्ते राष्ट्रवादीच्याच दुसऱ्या नेत्यांला हा पुरस्कार देण्यात आला..दरम्यान हा पुरस्कार स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या एखाद्या वीर सैनिकाला देण्यात येईल अशी कराडकरांना अपेक्षा होती...कर्तव्यदक्ष खासदार श्रीनिवास पाटील याना हा पुरस्कार देण्यात आला याचेही समाधान कराडकराना नक्कीच आहे...दरम्यान या कार्यक्रमात एक गोष्ट मात्र आवर्जुन लक्षात आली ती म्हणजे...पुरस्कार ज्यांच्या हस्ते दिला ते राष्ट्रवादीचे...ज्यांना दिला तेही राष्ट्रवादीचे...आणि ज्यांच्या उपस्थितीत दिला तेही सर्व राष्ट्रवादीचेच नेते होते...मग हा सोहळा म्हणजे राष्ट्रवादीचा इव्हेंट होता का?असा प्रश्न कराडकरांना यानिमित्ताने पडला...

कारण विद्यमान सरकारचे कोणीही मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्रीही या कार्यक्रमास उपस्थित दिसले नाहीत कराडचे आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि इतर कोणी काँग्रेस नेतेही यावेळी दिसले नाहीत एकूणच या सर्व नेत्यापैकी कोणी आयोजकांना उपलब्ध झाले नसतील कदाचित... तरी दुसरे इतर कोणीही राज्याचे नेते किंवा पदाधिकारी  नक्कीच उपलब्ध झाले असते... आणि हा कार्यक्रम सर्वसमावेशक झाला असता पण तसे झाले नाही...हा कार्यक्रम एकाच राजकीय पक्षाचा इव्हेंट वाटला अशी चर्चा आहे !.  


यावेळी ब्रिगेडीयर जेम्स थॉमस यांच्यावतीने मेजर मिश्रा यांनी तर साताऱ्याचे पोलिस अधिक्षक समीर शेख यांच्यावतीने पोलिस उपाधिक्षक डॉ. रणजीत पाटील यांनी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, वीर माता श्रीमती यशोदाबाई चव्हाण, तळबीड (ता. कराड), आदर्श माता बाळुताई ढेबे, (कापील), आदर्श विद्यार्थीनी अमृता पाटील (लाहोटी कन्याप्रशाला कराड) तर आदर्श विद्यार्थी सोहेल मुलाणी (वेणुताई चव्हाण कॉलेज, कराड) यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात करण्यात आला.
आमदार बाळासाहेब पाटील, विजय दिवस समितीचे प्रमुख कर्नल संभाजीराव पाटील, सचीव अॅड. संभाजीराव मोहिते यांच्यासह समितीचे पदाधिकारी, सदस्य यावेळी उपस्थित होते. 
आ. दिलीप वळसे- पाटील म्हणाले, जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचा वारसा लाभलेल्या भुमीत कर्नल संभाजीराव पाटील यांच्या माध्यमातुन खासदार श्रीनिवास पाटील यांनी देण्यात आलेला पुरस्कार हा मोठा आहे. या पुरस्काराला साजेश काम खासदार पाटील यांनी केले आहे. कर्नल पाटील यांनी सामान्य लोकांनी मिल्ट्रीचे वातावरण कसे असते, त्यांचे जीवन कसे असते हे जवळुन दाखवण्याचे काम केले आहे. त्यांचे समाजासाठीचे, तरुण पिढीसाठीचे योगदान मोठे आहे. 
खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या सानिध्यात मी वाढलो.  भारतीय सैन्यदलाची शिस्त कराडकरांना लावण्यात कर्नल संभाजीराव पाटील यांचे मोलाचे योगदान आहे. मी पुण्याचा कलेक्टर, नागपुरचा आयुक्त म्हणुन काम करुन लोकांची सेवा केली. कर्नल संभाजीराव पाटील यांनी कराडला सैन्यदलाची माहिती व्हावी, यासाठी विजय दिवस समारोह साजरा केला. त्यांचे योगदान मोठे आहे. जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण, पी. डी. पाटील यांच्या भुमीत मला विजय दिवस समारोह समितीने यशवंतराव यांच्या नावाने देण्यात आलेला जीवन गौरव पुरस्कार हे मी माझे भाग्य समजतो.

उदयनराजेंची भूमिका चांगली ; शरद पवार यांचे कराडमध्ये वक्तव्य;

वेध माझा ऑनलाइन- छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कारवाई न करता, केंद्र आणि राज्य सरकारने केवळ बघ्याची भूमिका घेतली असा आरोप शरद पवारांनी केला.ते कराडमध्ये एका वृत्त वाहिनीशी बोलत होते. राज्यपाल यांनी ज्या पद्धतीचे उद्गार शिवछत्रपतींबद्दल काढले ते चुकीचे होते. मला खात्री आहे आज ना उद्या केंद्र सरकारला निर्णय घ्यावा लागेल. तो बदल झालेला कदाचित आपल्याला पाहायला मिळेल, असं शरद पवार म्हणाले.  

उदयनराजेंची भूमिका चांगली 
उदयनराजेंनी भूमिका चांगली घेतली. त्याबाबत समाधान आहे. पण राज्य सरकार आणि केंद्र सरकारने जी काळजी घ्यायला हवी होती ती घेतली नाही. त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. त्याबाबत लोकांमध्ये संताप आहे, असं शरद पवार म्हणाले. 

भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता ; "ते' वक्तव्य भोवणार ? न्यायालयात हजर रहावे लागणार :

वेध माझा ऑनलाइन - भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी चित्रा वाघ यांना बीडच्या शिरूर कासार न्यायालनाने समन्स बजावले आहे.  9 डिसेंबर रोजी हे समन्स बजावण्यात आले आहे. त्यामुळे आता चित्रा वाघ यांना शिरूर कासार न्यायालयात हजर रहावे लागणार आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 
चित्रा वाघ या शिरूर कासार दौऱ्यावर असताना त्यांनी 18 जुलै 2021 रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. या प्रकरणी महेबूब शेख यांनी 2 ऑगस्ट 2021 रोजी शिरूर कासार पोलीस ठाण्यात वाघ यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. महेबूब शेख यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चित्रा वाघ यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता.
महेबूब शेख यांनी शिरूर कासार येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी झाली असता न्यायालयाने शिरूर कासार पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी सादर केलेला चौकशी अहवाल न्यायालयाने स्विकारला आहे.  सुनावणीदरम्यान महेबूब शेख यांचा शपथेवर जवाब नोंदविला असून, प्रथम वर्ग न्यायाधीश ए. टी. मनगिरे यांनी दि.9 डिसेंबर 2022 रोजी चित्रा वाघ यांच्याविरोधात भादंवी 500, 499 अन्वये समन्स जारी केले आहे. या समन्सनुसार आता चित्रा वाघ यांना 8 फेब्रुवारी 2023 ला शिरूर कासार न्यायालयात हजर रहावे लागणार आहे.

Thursday, December 15, 2022

भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ कराडात आल्या...आणि पत्रकारांना उद्दामपणे म्हणाल्या...मी तुम्हाला इथे माझी वाट बघत बसायला सांगितलेच नव्हते...

वेध माझा ऑनलाइन - राजकारणामध्ये नम्रतेने वागणारे नेते जरूर असतात तसेच उद्दामपणे सत्तेच्या मस्तीला डोक्यावर घेत उद्धट व फटकळपणे व्यक्त होणारेही नेते असतात... आज भाजपच्या राज्याच्या महिला आघाडी अध्यक्ष चित्राताई वाघ कराडात आल्या होत्या मोजून 5 मिनिटे थांबून  त्यांनी आपल्या उद्दाम बोलण्याने त्यांचे स्वागत करायला आलेल्या कार्यकर्त्यासह त्याठिकाणी पत्रकारांनाही आपल्या फटकळ स्वभावाचा प्रत्यय दिला आणि त्या पुढे सातारला निघून गेल्या... तब्बल 2 तास त्यांची वाट पाहत त्याठिकाणी  ताटकळत थांबलेल्या  कार्यकर्ते व पत्रकारांना त्या म्हणाल्या... मी तुम्हाला इथे माझी वाट बघायला सांगितलेच नव्हते...

त्याचे असे झाले..
आज सांगली येथील कार्यक्रम आटोपून भाजप महिला आघाडीच्या राज्याच्या अध्यक्ष चित्राताई वाघ या सातारला जाताना कराडला थांबणार आहेत असे भाजप च्या येथील काही नेते मंडळींकडून  पत्रकारांना सांगण्यात आले...त्यानुसार कोल्हापूर नाका येथे भाजप महिला कार्यकर्त्यांसह भाजपचे काही नेते कार्यकर्तेही उपस्थित राहिले... त्याठिकाणी पत्रकार देखील हजर झाले... दुपारी 4 वाजता येणाऱ्या भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ आल्या 5,30 ला... आणि आल्या- आल्या...मला सातारला जायचं आहे... पटपट सत्कार आवरा असे म्हणु लागल्या...त्यानंतर येथील भाजप च्या महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांचा गुलाबाचा हार घालून यथोचित सत्कार केला... त्याचवेळी पत्रकारांनी त्यांना बोला असे म्हटले... त्यावर मी इथे बोलणार नाही...सातारला लवकर पोहोचायच आहे असे सांगलीहून स्वतः उशिरा येऊन उगीचच काळजी दाखवणारे वक्तव्य त्यांनी केले... पत्रकारांनी त्याकडे दुर्लक्ष करून त्यांना पाटणमधील महिला अत्याचाराच्या घटनेविषयी आपले मत मांडण्यास सांगितले तेव्हा मला त्याबद्दल माहितीच नाही असे  बोलून त्यांनी त्याठिकाणी प्रतिक्रिया देणे टाळले...त्यावेळी त्यांना पत्रकारांनी सांगितले की आम्ही इथे दुपारपासून गेले 2 तास तुमची वाट बघत थांबलो आहोत...थोडावेळ तरी माध्यमांशी बोला... त्यावेळी त्या उद्दामपणे फटकन म्हणाल्या... मी तुम्हाला इथे माझी वाट बघायला सांगितले नव्हते...सत्कार करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही मी इथे थांबायला सांगितले नव्हते... असे उद्दामपणे बोलून त्या मोजून पाच मिनिटात कोल्हापूर नाक्यावरून पुढे निघून गेल्या...दरम्यान आपण हे काय बोलून गेलो हे थोड्या वेळाने लक्षात आल्यावर औपचारिक दिलगिरी व्यक्त करायला देखील त्या विसरल्या नाहीत...

दरम्यान, अनेक महिन्यापासून राज्यातील महिलांवरील अत्याचारामध्ये प्रचंड वाढ झाली आहे बलात्कार खून अशा घटनां राजरोस घडताना दिसत आहेत अशातच महिलांच्या राज्याच्या नेत्या या नात्याने चित्राताई वाघ यांनी आज दोन शब्द बोलून महिला अत्याचाराविषयी निषेध नोंदवणे येथे गरजेचे होते...मात्र याउलट त्या म्हणाल्या...पाटणमधील महिला अत्याचाराबद्दल मला माहितीच नाही...राज्याच्या नेत्यानी असे बोलणे म्हणजे बेजबाबदारपणाचे बोलणे नाही का? महिला नेत्या म्हणून आपण ज्या जिल्ह्यात कार्यक्रमासाठी चाललो आहोत त्याच जिल्ह्यातील घटनेची माहिती न घेता त्या ठिकाणी जाणे म्हणजे आपल्याच अकलेचे तारे आपणच तोडण्यासारखे नाही का? असे अनेक प्रश्न त्यांच्याबद्दल यानिमित्ताने निर्माण झाले असतानाच आज पत्रकारांना त्यांचे येथे आल्यापासूनचे उद्दामपणे बोललेल सगळंच  खटकल...शिवाय त्यांचे स्वागत करायला आलेल्या कार्यकर्त्याना देखील त्यांनी दिलेली फटकळ वागणूक खटकली हेच याठिकाणी दिसून आले !

Tuesday, December 13, 2022

वेध माझा ऑनलाइन - राज्यातील काही पाेलिस निरीक्षक हे आजही महाविकास आघाडीचे सरकार असल्यासारख वागत आहेत. काही पाेलिस अधिकारी हे हिंदु विराेधी भुमिका घेत असल्याची तक्रार आमच्यापर्यंत आली आहे. त्या सर्वांची नावे आम्ही गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यापर्यंत पाेहचविणार आहाेत. सातारा जिल्ह्यातील फलटण, महाबळेश्वर, सातारा, पाचगणी येथील पोलीस निरीक्षक हिंदू विरोधी भूमिका घेत आहेत. तेव्हा त्या सर्व पाेलिस निरीक्षकांचा सांगून कार्यक्रम करणार असे भाजप आमदार नितेश राणे यांनी आज सातारा येथील पत्रकार परिषदेत जाहीरपणे सांगितले.नितेश राणेंच्या या वक्तव्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आले आहे.

नितेश राणे म्हणाले, महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी कायदा कसा आणता येईल. यावर आम्ही काम करत आहे. हिवाळी अधिवेशनात तो विषय कदाचित मांडला जाईल. पोलिसांना कोणत्या कायद्यांतर्गंत शिक्षा द्यावी, याबाबत स्पष्टता नाही. परंतु धर्मांतर विरोधी कायदा आणल्यानंतर त्यात स्पष्टता येईल. पोलिस अधिकारी हिंदू विरोधी भूमिका घेत आहेत. त्यांचा बंदोबस्त केला जाईल.

नितेश राणेंच्या अडचणी वाढणार ; नांदगाव ग्रामस्थांना धमकी देणे भोवणार!

वेध माझा ऑनलाइन- राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी माझ्या अधिकाराखाली आहेत. त्यामुळे, जर आम्हाला मतदान केले नाही, तर सरकारचा एकही रुपयाचा निधी नांदगाव गावाला दिला जाणार नाही, असे वक्तव्य आमदार नीतेश राणे यांनी नांदगाव येथे प्रचार सभेत केले होते. त्यानंतर नीतेश राणेंच्या विरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी व नांदगाव ग्रामस्थांना धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

आम्हाला मतदान केले नाही तर निधी देणार नाही, अशी धमकी देणाऱ्या आमदार नीतेश राणे  यांच्याविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नांदगाव शाखाप्रमुख राजा म्हसकर यांनी केली आहे. या संदर्भातील राजा म्हसकर यांनी एक निवेदन कणकवली पोलीस निरीक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दिले आहे. तसेच नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल न झाल्यास नांदगाव ग्रामस्थांसमवेत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने दिला आहे.

राज्यातील शाळांना 1100 कोटी अनुदान ; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाला मोठा निर्णय

वेध माझा ऑनलाइन - राज्यातील शाळांना 1100 कोटी अनुदान देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे. या  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 6 हजार 10 प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना तसेच 14 हजार 862 तुकड्यांना अनुदान मिळेल. या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे 63,338 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना होणार आहे.

राज्य सरकाराच्या या निर्णयाची माहिती देताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले आहेत की, आज मंत्रिमंडळाने सर्व शाळा आणि तुकड्याने 20 टक्क्यांप्रमाणे अनुदान, यातच ज्यांना अनुदान नाही त्यांना 20 टक्के, तसेच जे 20 टक्क्यांच्या टप्प्यात आहे, त्यांना 40 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. तसेच 40 टक्के असणाऱ्यांना 60 टक्के अनुदान देण्यास मान्यता देण्यात येणार आहे. यामुळे 63,338 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना लाभ मिळणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.  
राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, त्रुटींच्या पुर्ततेनंतर 20 टक्के अनुदानासाठी 367 शाळा पात्र असून 40 टक्के अनुदानासाठी 284 शाळा पात्र आहेत. 20 टक्के अनुदान घेत असलेल्या 228 शाळांना 40 टक्के अनुदान देण्यात येईल.  तर 40 टक्के अनुदान घेत असलेल्या 2009 शाळांना 60 टक्के अनुदान देण्यात येईल.
मुल्यांकनानुसार अनुदानास पात्र परंतु शासनाच्या स्तरावर अद्याप घोषित न केलेल्या 3122 शाळांना 20 टक्के अनुदान देण्यात येईल. अनुदानासाठी पात्र घोषित करण्यात आलेल्या शाळांना अटी व शर्ती लागू राहतील. त्याच प्रमाणे त्रुटींची पुर्तता करण्यासाठी शेवटची संधी म्हणून एक महिन्याची मुदत देण्यात येत आहे. अन्यथा, पुढील एक महिन्यात अशा शाळा व तुकड्यांना स्वयं अर्थसाहाय्यित म्हणून मान्यता देण्यात येईल. ज्या शाळा यासाठी तयार होणार नाहीत, त्यांची मान्यता रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

स्व. जयमाला जयवंतराव भोसले यांची ९० वी जयंती साजरी...

वेध माझा ऑनलाइन -  आयुष्यात माणूस म्हणून जन्माला येणे ही सर्वात मोठी आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे. अशावेळी दुसऱ्यांच्या जीवनात आनंद पसरविण्यासाठी आणि त्यातून स्वतःचा आनंद मिळविण्यासाठी हे आयुष्य सार्थकी लावले, तर जीवन नक्कीच सुखकारक बनविता येईल, असे प्रतिपादन जळगाव येथील दीपस्तंभ फौंडेशनचे संचालक यजुर्वेन्द्र महाजन यांनी केले. कृष्णा उद्योग समूहाच्या आधारवड स्व. जयमाला जयवंतराव भोसले (आईसाहेब) यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त आयोजित 'आई' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. दरम्यान डॉ अतुल भोसले यांनी यावेळी आपल्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला या भावपूर्ण कार्यक्रमात आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत त्यांनी काही आठवणी जाग्या केल्या भोसले कुटुंबात जन्म झाला हे आपले भाग्य असल्याचे सूतोवाच त्यांनी यावेळी केले 

व्यासपीठावर कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कृष्णा महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले, कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, सौ. गौरवी भोसले व श्री. विनायक भोसले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते आईसाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

दरम्यान, व्याख्यानात बोलताना श्री.  महाजन म्हणाले, सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) आणि  स्व. जयमाला भोसले (आईसाहेब) यांच्यासारख्या व्यक्ती या परिसराला लाभल्या हे या भागातील लोकांचे भाग्य म्हणावे लागेल. इथे राहणाऱ्या प्रत्येकाला त्यांचे प्रेम आणि आशीर्वाद लाभले आहेत. त्यांनी जी संस्कारांची पेरणी केली, तेच सामाजिक कार्याचे संस्कार त्यांच्या पुढच्या पिढीतही परावर्तित झाल्याचे या संपूर्ण कुटुंबाला पाहिल्यावर दिसून येते. ग्रामीम भागात आप्पासाहेबांनी शिक्षण, सहकार आणि आरोग्य क्षेत्रात जे काम उभे केले आणि डॉ. सुरेशबाबांनी ज्याप्रकारे या कामाचा विस्तार केला, ते पाहून त्यांच्या कार्याला सलाम करावासा वाटतो

प्रत्येकाच्या जीवनात आई ही सर्वात जवळची व्यक्ती असते. आई प्रचंड त्याग करते, प्रेम करते, कष्ट करणे आणि माफ़ही करते. प्रेम, त्याग, कष्ट आणि माफ करण्याची वृत्ती आली की जीवनात सर्वोत्कृष्ट होता येते. मायबाप जी संस्कारांची शिदोरी देतात, ती प्रत्येकाला नेहमीच आयुष्यभर पुरते. सध्याच्या काळात मोबाईल व टीव्ही बघण्यात महिलांची मोठी शक्ती आणि सर्जनशीलता वाया जात आहे. त्याऐवजी त्यांनी पुस्तक वाचनाला अधिक वेळ दिला तर अधिक संस्कारक्षम पिढी घडविता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

डॉ. सुरेश भोसले म्हणाले, की मुलींच्या शिक्षणासाठी आप्पांनी शिक्षणसंस्थेची स्थापना केली. आजसुद्धा कृष्णा अभिमत विद्यापीठात विविध विद्याशाखेत शिक्षण घेणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या सर्वाधिक आहे. किंबहुना जिल्ह्यात सर्वाधिक महिलांना नोकरीची संधी मिळवून देणारा कृष्णा उद्योग समूह आहे. आप्पांच्या प्रेरणेतून सुरू झालेला कृष्णा महिला सरिता बझार आणि कृष्णा महिला औद्योगिक संस्था उत्तम काम करत आहे. तिथेही महिलांना मोठी रोजगार संधी निर्माण झाली आहे. आप्पांच्या या सगळ्या कार्यामागे आईचे मोठे पाठबळ होते.

आईसाहेबांच्या आठवणी सांगताना डॉ. अतुल भोसले म्हणाले, की आप्पांनी या परिसराचा विकास करण्याच्यादृष्टीने अनेक विधायक कामे केली. या प्रत्येक कामात आज्जींनी त्यांना खंबीर साथ दिली. ज्या-ज्यावेळी आप्पासाहेबांसमोर राजकीय - सामाजिक अडचणी उभ्या राहिल्या, त्या-त्यावेळी आज्जींनी या अडचणींतून मार्ग काढत, आपले कुटुंब सांभाळत आप्पांच्या सामाजिक कार्याला पाठिंबा देण्याचे कार्य केले. आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले, संस्कार केले. माझ्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मलाही त्यांनी संस्कारांची शिकवण दिली. अशा कुटुंबात माझा जन्म झाला हे मी माझे भाग्य समजतो.  आप्पांच्या जाण्यानंतर त्या दुःखातून आज्जींना सावरण्याचे व त्यांना आधार देण्याचे मोठे काम विनूबाबांनी केले. नातू या नात्याने मला आणि विनूबाबांना त्यांचा मिळालेला स्नेह आणि प्रेम न विसरण्यासारखे आहे.

कार्यक्रमाला जि. प. सदस्या सौ. श्यामबाला घोडके, रेठरे बुद्रुकच्या सरपंच सौ. सुवर्णा कापूरकर, माजी सरपंच सौ. प्रविणा हिवरे, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सारिका गावडे, कृष्णा बँकेच्या संचालिका सौ. सारिका पवार यांच्यासह विविध संस्थांच्या चेअरमन, व्हॉईस चेअरमन आणि संचालिकांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्राचार्य डॉ. वैशाली मोहिते यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले.


कराडला शोभायात्रेने विजय दिवस समारोहास प्रारंभ

वेध माझा ऑनलाइन -  विजय दिवस समारोहात आज शोभा यात्रेने उत्साहात प्रारंभ झाला. विजय दिवस चौकातील विजय स्तंभास अभिवादन केल्यानंतर शोभा यात्रेस भाई गंगाराम गुजर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, गट शिक्षणाधिकारी सन्मती देशमाने, माजी नगराध्यक्षा श्रीमती शारदा जाधव, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, राष्ट्रवादीच्या सरचिटणीस संगीता साळुंखे यांच्या उपस्थितीत त्यास प्रारंभ झाला. 
यावेळी जेष्ठ चित्रकार दादासाहेब सुतार, विजय दिवस समितीचे विनायक विभुते, चंद्रकांत जाधव, सहसचीव विलासराव जाधव, अॅड. परवेझ सुतार, उद्योजक सलीम मुजावर, महालिंग मुंढेकर, सतीश बेडके, रत्नाकर शानभाग, प्रा. बी. एस. खोत, रमेश जाधव, मिनल ढापरे, भरत कदम, राजु अपिने, पौर्णिमा जाधव, आसमा इनामदार, प्राजक्ता पालकर, मिल्ट्री होस्टेलचे सहाय्यक अधिक्षक धनाजी जाधव आदींसह मान्यवर उपस्थित होते. 
शोभा यात्रेत येथील लाहोटी कन्याप्रशाळेचा महिला सबलीकरणांतर्गत ती चा सन्मान, टिळक हायस्कुलचा स्वच्छ भारत मिशन, एसएमएस इंग्लिश मेडीयम स्कूलचा पर्यावरण विषयक, शाहीन हायस्कूलचा भारतीय स्वयंसिध्दतेवर, पालिका शाळा क्रमांक बाराचा संविधान विषयक जनजागृती, कोटा ज्युनियर कॉलेजचा स्त्री भ्रूण हत्या, यशवंत हायस्कूलचा कारगील युध्दातील प्रसंगावर, कमला नेहरू ज्युनियर कॉलेजचा महिला सबलीकरण, दि. का. पालकर माध्यमिक शाळा, डॉ. द. शी. एरम अपंग सहाय्य संस्थेचा जय जवान जय किसान हे चित्ररथ सहभागी झाले होते.  सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयाचे एनसीसी छात्र, आदर्श विद्यार्थी, आदर्श विद्यार्थीनी सहभागी झाले होते. विजय दिवस चौकातून सुरू झालेली पदयात्रा उपजिल्हा रुग्णालय, कृष्णा नाका मार्गे कन्या शाळा, चावडी चौक, आझाद चौक, दत्त चौकमार्गे विजय दिवस चौकात आली. भरत कदम यांनी सुत्रसंचालन केले.

सुनावणी पुढे ढकलली :

वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी 10 जानेवारी 2023 रोजी होणार आहे. मात्र, ही सुनावणीदेखील प्रकरणाच्या निर्देशासाठी असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, दुसरीकडे ठाकरे गटाने या प्रकरणाची सुनावणी 7 सदस्यीय खंडपीठासमोर करण्याची मागणी केली आहे. सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे हे प्रकरण सोपवण्याची मागणी ठाकरे गटाकडून ही मागणी केवळ एका मुद्यांवर झाली आहे. त्यामुळे सत्ता संघर्षाच्या सुनावणीला आणखी वेळ लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने सुप्रीम कोर्टात सुरू असलेली सुनावणी अतिशय महत्त्वाची समजली जात आहे. पक्षांतर बंदी कायदा आणि इतर कायदेशीर बाबींचा कस या प्रकरणाच्यानिमित्ताने लागणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाकडे सुनावणी सुरू आहे. मागील सुनावणीत दोन्ही पक्षांनी कोणत्या मुद्यांवर युक्तिवाद होणार, महत्त्वाचे मु्द्दे हे एकत्रितपणे सादर करण्याचे निर्देश घटनापीठाने दिले होते. दोन्ही बाजूंने अजून बऱ्याच गोष्टीवर एकमत झालेले नसल्याचे चित्र आजच्या सुनावणीत दिसून आले.

Monday, December 12, 2022

कराडातील उपजिल्हा रुग्णालयात बोगस डॉक्टरला अटक...

वेध माझा ऑनलाइन - कराड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात डॉक्टर म्हणून फिरणाऱ्या तोतयाला पोलिसांनी ताब्यात घेतले. सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. सुहास दिलीप गोरवे वय- 27, रा. दुशेरे, ता. कराड असे त्या बोगस डॉक्टरचे नाव आहे. याबाबत उपजिल्हा रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक निलेश शंकर माने यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात सोमवारी सकाळी एकजण डॉक्टरसारखे पांढरे अ‍ॅपरन व गळ्यात ओळखपत्र घालून फिरत असल्याचे सुरक्षारक्षक श्रावण दणाने यांना दिसले. संबंधिताच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे दणाने यांनी ही बाब लिपिक निलेश माने यांना सांगीतली. निलेश माने यांनी आवारात जाऊन पाहिले असता संबंधित व्यक्ती डॉक्टर असल्याच्या अविर्भावात फिरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच त्या व्यक्तीच्या गळ्यात महाराष्ट्र शासन, राष्ट्रीय आरोग्य अभियान असे लिहीलेले ओळखपत्र होते. संशय वाटल्यामुळे लिपिक माने यांनी संबंधिताकडे विचारणा केली असता, मी सोनवडी आरोग्य केंद्रात अधिपरिचारक आहे, असे त्याने सांगितले.
संबधित व्यक्तीवर संशय बळावल्याने लिपिक माने यांनी अधिक विचारपूस केली असता. संबंधिताने मी सदरचे ओळखपत्र सातारच्या जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर एका झेरॉक्स सेंटरमधून बोगस तयार करुन घेतल्याचे सांगितले. संबंधित व्यक्ती तोतया डॉक्टर म्हणून फिरत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे लिपिक माने यांनी याबाबतची माहिती वैद्यकीय अधिक्षक आर. जी. शेडगे यांना दिली. तसेच पोलीसही त्याठिकाणी पोहोचले. पोलिसांनी संबंधिताला ताब्यात घेऊन अटक केली. याबाबतचा गुन्हा कराड शहर पोलिसात नोंदविण्यात आला आहे.