Monday, December 5, 2022

गुजरात निवडणूक ; पहा निरनिराळे जाहीर झालेले एग्झिट पोल ; आपची जादू चालणार?

वेध माझा ऑनलाइन -  गुजरात विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान सायंकाळी 5 वाजता संपले. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मैदानात यंदा वेगळाच रंग पाहायला मिळत आहे. कारण, यावेळी काँग्रेससोबत आपनेही मोठी ताकद लावली आहे भाजपनेही आपला गड राखण्यासाठी देशभरातील मंत्र्यांना गुजरातमध्ये पाचारण केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राहुल गांधी ते अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत अनेक दिग्गज प्रचारासाठी मैदानात उतरले. आता वेगवेगळ्या एजन्सीने त्यांचे एग्झिट पोल जाहीर केले आहेत. यात आपची जादू चालणार का? हेही समोर आले आहे.

 TV9 च्या एक्झिट पोलमध्ये गुजरात निवडणुकीत भाजपला 125-130 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर काँग्रेसला 40 ते 50 जागा आणि 'आप'ला केवळ 3-5 जागा मिळतील, तर इतरांना 3 ते 7 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
रिपब्लिक न्यूजच्या एक्झिट पोलमध्ये भाजप पूर्ण बहुमताने पुन्हा सत्तेत येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एक्झिट पोलनुसार, भाजपला 128 ते 148 जागा, काँग्रेसला 30-42 जागा, आप 2 ते 10 जागा, तर इतरांना 0 ते 3 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.
न्यूज एक्स आणि जन की बातच्या एक्झिट पोलने भाजपला पूर्ण बहुमताचा अंदाज वर्तवला आहे. एक्झिट पोलनुसार, भाजपला 117 ते 140 जागा, काँग्रेसला 34-51 जागा, आप 6 ते 13 जागा, तर इतरांना 1 ते 2 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.

 काँग्रेस विजयापासून दूर
काँग्रेसने गुजरातमध्ये 1962, 1967 आणि 1972 मध्ये पहिल्या तीन विधानसभा निवडणुका जिंकल्या. 1975 मध्ये आणीबाणी लागू झाल्यानंतर लढलेल्या निवडणुकांमध्ये मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील पक्षांच्या आघाडीने, काँग्रेसचे बंडखोर नेते चिमणभाई पटेल यांच्या नेतृत्वाखालील जनसंघ आणि किसान मजदूर पक्षाचा पराभव केला. त्यानंतर 1980 आणि 1985 च्या निवडणुका काँग्रेसने जिंकल्या. 1990 च्या निवडणुकीत जनता दल आणि भाजप एक मजबूत शक्ती म्हणून उदयास आले. 1995 नंतर झालेल्या सर्व निवडणुका भाजपने जिंकल्या आहेत.

 गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात जवळपास 58 टक्के मतदान
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील 93 जागांसाठी सोमवारी संध्याकाळी 5 वाजता मतदान संपले. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या टप्प्यात सुमारे 58.68 टक्के मतदान झाले.


No comments:

Post a Comment