दरम्यान महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्ष तुम्ही जे आरोप करत आहात तेच आरोप सत्ताधाऱ्यांवर करताना दिसत आहेत मग राज्यातच राजकीय पक्षांचे ऑप्शन असताना तेलंगणाच्या याच राजकीय पक्षात प्रवेश का केला? तुम्ही विधानसभा लढवणार म्हणता मग,या पक्षाच्या माध्यमातून कोणता कार्यक्रम घेऊन जनतेसमोर जाणार? महाराष्ट्रात काहीच ओळख नसलेल्या या पक्षाला सातारा जिल्ह्यातील लोक निवडणुकीत स्वीकारणार का? या वेध माझा च्या या प्रश्नांवर पक्षाच्या नेत्या व सुपनेच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा पाटील या निरुत्तर झाल्या मात्र इतर पदाधिकार्यांनी या प्रश्नाची गुळगुळीत उत्तरे देत सुरेखा पाटील यांना कव्हर करण्याचा प्रयत्न केला आणि तो उपस्थित पत्रकारांच्या लक्षातही आला
यावेळी जिल्हाध्यक्ष संदीप साबळे, कराड तालुका अध्यक्ष यासीन पटेल, अमित यादव, रवी माने, बाबासाहेब जाधव हे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान आपण स्वत: मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतली आहे. सरकारचे कामही पाहिले आहे. त्यांनी मला पाटण विधानसभा मतदारसंघातून विधानसभा लढवावी, असे सांगितले आहे. याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सुरेखा पाटील यांनी यावेळी सांगितले
दरम्यान गोडसे पुढे म्हणाले...तेलंगणा सरकारने गेली दहा वर्षे शेतकऱयांसाठी विविध योजना राबवल्या आहेत. शेतीबाबत तेलंगणा हे आता मॉडेल बनले आहे. त्या तुलनेत महाराष्ट्र सधन असतानाही सिंचन, शेतीचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. तेलंगणा राज्यात शेतकऱयांसाठी मोठे काम होत असेल तर ते महाराष्ट्रात का होत नाही? तेलंगणा सरकारने शेतकऱयांसाठी राबवलेला जाहीरनामा घेऊन आम्ही निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. तेलंगणामध्ये शेतकऱयांना मोफत वीज मिळते. ही वीज दिवसा दिली जाते. घरगुती तसेच शेतीची अखंडपणे 24 तास सुरू असते. शेतकऱयांनी पिकवलेला माल खरेदी करण्यासाठी 7300 खरेदी केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. तेलंगणामध्ये तलाठी ही यंत्रणा अस्तित्वात नाही. शेतीतील कामामुळे तेलंगणा राज्य संपूर्ण देशापुढे आदर्शवत होत आहे.
तेलंगणा राज्यातील शेतीबाबतचे उपक्रम आम्ही स्वत: तेथे जाऊन पाहिले आहेत. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची आपण भेट घेतली आहे. त्यांच्या कार्यामुळे प्रभावित होऊन आम्ही सर्वजण भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाच्या माध्यमातून शेतकऱयांच्या हितासाठी लढण्याचे ठरवले आहे, असे गोडसे यांनी सांगितले. मी शेतकरी चळवळीतून अनेक वर्षे काम केले आहे. अनेक सरकारे पाहिली आहेत. मात्र शेतकऱयांचे प्रश्न सुटले नाहीत. त्यामुळे शेतकरी केंद्रबिंदू मानून काम करणाऱया बीआरएस पक्षात प्रवेश केला असल्याचे गोडसे म्हणाले.
महाराष्ट्रात काँग्रेससह भाजप महाराष्ट्रातील इतर कोणत्याही पक्षाने आजवर शेतकऱयांची होणारी लूट थांबवलेली नाही. शेतकऱयांसाठी लढताना अनेक केसेस अंगावर घेतल्या. आता शेतकऱयांसाठी काम करणारा पक्ष आला आहे. बीआरएसने केवळ घोषणाबाजी केलेली नाही. गेली दहा वर्षे शेतकऱयांसाठी काम केले आहे. तेलंगणामध्ये जे झाले, ते 70 वर्षात महाराष्ट्रात का झाले नाही? सिंचनासाठी सुमारे 70 हजार कोटी रूपये महाराष्ट्रात खर्च झाले. तरीही शेतकऱयांचे प्रश्न सुटले नाहीत, अशी टीका गोडसे यांनी केली. बीआरएस हा कोणत्याही पक्षाची बी टीम नसून महाराष्ट्रात ताकदीने लढणार असल्याचे ते म्हणाले.
.
No comments:
Post a Comment