वेध माझा ऑनलाईन। ठाणे जिल्ह्यात बुधवारी मुसळधार पाऊस सुरु झाला असून याचा परिणाम लोकल सेवा ठप्प झाल्याने कल्याणच्या पत्रिपुलाजवळील रेल्वे ट्रॅकवर उतरून चालत स्टेशन गाठण्याच्या प्रयत्नात अवघ्या चार महिन्यांचे बाळ एका मातेसमोर हातातून निसटले आणि नाल्यात पडून वाहून गेले. दुपारी नाल्याजवळच्या खाडीला भारती असल्याने बाळाच्या शोधासाठी अनंत अडचणी येत होत्या, पण दुपारनंतर ही शोधकाम सुरूच होते. या घटनेचा व्हिडिओ वायरल होताच अनेकजण हळहळले.. अनेकांनी ही बाळ सापडावे अशा करुणा देवाकडे भाकल्या.
सकाळपासून ठाणे जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्याचा रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली. त्यातच ठाकुर्ली आणि कल्याण दरम्यान एका मागोमाग एक लोकल रांगेत उभ्या राहिल्या होत्या. बराच वेळ होऊनही लोकल जागेवरून हालत नसल्याने अखेर त्यातील प्रवाशांनी ट्रॅकवर उतरून चालत कल्याण स्टेशन गाठण्याचा निर्णय घेतला. अशाच प्रकारे अंबरनाथ लोकलमधील काही प्रवासीही गाडीतून उतरून कल्याणच्या दिशेने चालू लागले. ज्यामध्ये चार महिन्यांचे छोटं बाळ घेऊन आजोबा आणि त्या बाळाची आईही होती.
त्यावेळी पत्री पुलाजवळ कल्याण दिशेकडील स्लो ट्रॅकवर उभ्या असलेल्या लोकलच्या डाव्या बाजूने हे कुटुंब जात असताना ही दुर्घटना घडली. ही लोकल उभी असलेल्या ट्रॅकच्या खालून एक नाला वाहत होता आणि तो पार करण्यासाठी लोकलच्या डाव्या बाजूने अगदी अरुंद अशी जागा होती. त्या अरुंद जागेतून बाळाला घेऊन चालताना आईला काहीशी अडचण झाली. त्यामुळे त्याच्या आजोबांनी त्या बाळाला आपल्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार आजोबांकडे हे बाळ देत असताना अचानक हातून बाळ निसटले आणि नाल्याच्या पाण्यात पडले आणि दोघांच्याही काळजात धस्स झाले. तिथे असणाऱ्या काही मुलांनी त्या नाल्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन शोधाशोध केली. पण त्यांना यश काही आले नाही.
No comments:
Post a Comment