Friday, July 14, 2023

साताऱ्यात 200 हुन अधिक घरातुन डेंग्यूच्या आळ्या आल्या आढळून! सातारा जिल्हा हिवताप विभागाचा सर्वे ; यंत्रणा अलर्ट!

वेध माझा ऑनलाईन। पावसाळा सुरू झाला की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आरोग्य प्रशासनाकडून सातारा शहरात सध्या घराघरात सर्व्ह चालू आहे साथीच्या रोगाचे प्रमाण व त्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून हा सर्वे चालू आहे त्यात घरातील पाण्याची टाकी कंटेनर तपासले जात आहेत सातारा शहरात मागील काही दिवसात 220 घरात या तपासणी दरम्यान डेंग्यूच्या आळ्या आढळून आल्या असल्याचे निष्पन्न झाले आहे
 दरम्यान एकूण 8 आरोग्य सेवक याकामी कार्यरत आहेत त्यांच्याकडून या आळ्या नष्ट केल्या जात आहेत

पावसाळ्यात डेंग्यू चिकनगुनीया हिवताप,क्षयरोगाचे प्रमाण वाढीस लागल्याचे दिसून येत असते त्यासाठी दरवर्षी प्रशासनाकडून घराघरात जाऊन अशा  रोग लक्षणांचा सर्व्ह केला जातो यावर्षी सदर- बझार लक्ष्मी टेकडी करंजे केसरकर पेठ तसेच आणखी काही ठिकाणी सर्वे सुरू आहे
एकूण 8 आरोग्य सेवक याकामी कार्यरत आहेत त्यांच्याकडून सापडणाऱ्या या आळ्या नष्ट केल्या जात आहेत

No comments:

Post a Comment