वेध माझा ऑनलाईन। रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका करताना केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला होता. आपण अनावधानाने ते बोलून गेलो, असंही सदाभाऊ खोत नंतर म्हणाले होते. मात्र, त्यावरून दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे चालू असतानाच आता सदाभाऊ खोत यांनी त्यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. “तुम्हाला काय करायचं ते करा”, असं आव्हानच आता सदाभाऊ खोत यांनी दिल्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून याला काय उत्तर दिलं जातं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
काय म्हणाले होते सदाभाऊ खोत?
“पूर्वी बापाने केलेलं पाप मुलाला फेडावं लागत होतं. पण, कलयुगात जो पाप करतो, त्याला फेडावं लागते. शरद पवार यांना हे पाप फेडावं लागणार आहे. भविष्यात हा सैतान गावगाड्यापर्यंत परत येता कामा नये”, असं विधान सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका करताना केलं होतं.
शरद पवारांनी शेतकऱ्याला बरोबर घेतलं नाही, फक्त शेतकऱ्याचं नाव बरोबर घेतलं. शेतकऱ्याचं खळं लुटण्याचं काम शरद पवारांनी केलं. शरद पवारांनी फक्त काटे-कुटे पेरले. आता त्या काट्यांवरून चालण्याची वेळ शरद पवारांवर आली आहे. त्यामुळे त्यांचे पाय रक्तबंबाळ झाले आहेत. आम्ही खरं बोललो म्हणून बऱ्याच जणांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या आहेत. तुम्ही त्यांच्या पत्रावळीवर पंगतीला बसले असाल. तुमच्या ओठाला त्यांचं अन्न लागलं असेल. आम्ही आमच्या बापाचं खात होतो. त्याामुळे त्याच्यावर झालेल्या अन्यायाची आमच्या मनात चीड का असू नये? आम्ही आमच्या बापाच्या बाजूने बोलत राहणार”, अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.
“आमचं काय तुम्ही वाईट करणार? राजकारणातून उठवणार? राजकारण हा आमचा धंदाच नाही. राजकारणात आम्ही गावगाड्यासाठी आलो. राजकारण गेलं चुलीत. तुम्ही काय वाईट करणार आहात? जे काही करायचं असेल ते करा. नंगे को खुदा भी डरता है. हम भी नंगे है. तुम कितने नंगे है ये हम भी दिखा देंगे. आमच्याकडेही मोठ्या पोथ्या आहेत. बघू, समोरून सवाल-जबाब होईल, तेव्हा योग्य वेळी उत्तर देऊ”, असं खुलं आव्हानच सदाभाऊ खोत यांनी दिलं आहे.
No comments:
Post a Comment