वेध माझा ऑनलाईन। मसूर रेल्वे क्रॉसिंग येथे बांधण्यात आलेल्या उड्डाणंपुलाची पाहणी नुकतीच माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. या भागातील स्थानिक नागरिकांच्या तक्रारीचा विचार करून त्यांनी स्वतः येथील उड्डाणपूलाची पाहणी केली आहे. यावेळी कराड उत्तर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निवास थोरात, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, उमेश साळुंखे, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अमित जाधव, कराड दक्षिण काँग्रेस अध्यक्ष मनोहर शिंदे, राजेंद्र पाटील, शैलेश चव्हाण, शिवराज पवार, प्रशांत यादव, अजित केंजळे, प्रवीण मोहिते आदी यावेळी उपस्थित होते.
मसूर रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल बांधण्यात आला आहे परंतु या पुलावरून खाली आल्यानंतर किंवा पुलावर जाताना वाहनांना वळसा घालताना ट्राफिक होत असून आधीच्या रस्त्याला सरळ हा पूल नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असल्याचे स्थानिकांच्या तक्रारी आहेत, यावेळी स्थानिकांच्या तक्रारीनुसार आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी पुलाची पाहणी केली तसेच स्थानिक नागरिकांचे व कराड उत्तर काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे निवेदन स्वीकारले. यानुसार संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना या पुलाची प्रत्यक्ष पाहणी करणे व त्वरित उपाययोजना करण्यासाठी सूचना करण्यात येतील असे आश्वासन यावेळी आ. चव्हाण यांनी दिले. धोकादायक वळण असलेल्या पुलाची सोय होत असली तरी अपघात प्रमाण वाढत असून त्यावर उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे असल्याची तीव्र मागणी येथील स्थानिकांची आहे.
No comments:
Post a Comment