Wednesday, July 19, 2023

पावसाळी अधिवेशनच्या दुसऱ्या दिवशी वेध माझा ऑनलाईन। भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे कथित व्हिडिओ प्रकरण बाहेर आले. याबाबत विधान परिषदेत मुद्दा उपस्थित झाल्यावरगृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कुणालाही पाठीशी घालणार नाही, सोमय्या यांच्यासंबंधातील आक्षेपार्ह व्हिडीओची सखोल चौकशी केली जाईल,असे स्पष्ट केले होते. आता या प्रकरणाचा तपास तांत्रिक बाबी आणि सायबर तज्ज्ञांच्या साहाय्याने मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट न १० कडून करण्यात येणार आहे.

भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणावरून विधिमंडळ अधिवेशनात घमासान घडून आले. ‘महिलांचे शारिरीक शोषण करणाऱ्या सोमय्यांना पाठीशी घालणार का?’ असा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला आहे. यावर बोलताना फडणवीसांनी कुणालाही पाठीशी घालणार नाही, सोमय्या यांच्यासंबंधातील आक्षेपार्ह व्हिडीओची सखोल चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले. फडणवीसांनी आदेश दिल्यानंतर आता मुंबई पोलिस चौकशीच्या दृष्टीने सक्रिय झाले आहेत.

No comments:

Post a Comment