Saturday, July 29, 2023

संभाजी भिडे म्हणजे सोंगाड्या... महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींचा गंभीर आरोप ! ; हा तर नागपूरचा अजेंडा ; आर एस एस वर देखील केली टीका: ;


वेध माझा ऑनलाईन। संभाजी भिडेंनी राष्ट्रपिता महात्मा गाधींबाबत केलेल्या विधानावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. या विधानाचे आणि त्यावरून निर्माण झालेल्या वादाचे पडसाद राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनातही उमटल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, संभाजी भिडेंनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. संभाजी भिडे फक्त एक सोंगाड्या असून त्यांना दिलेली स्क्रिप्ट ते सादर करत असल्याचं तुषार गांधी म्हणाले आहेत.

काय म्हणाले संभाजी भिडे?
अमरावतीच्या बडनेरामध्ये झालेल्या कार्यक्रमात संभाजी भिडेंनी महात्मा गांधींच्या वडिलांविषयी वादग्रस्त विधान केलं. “मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले. त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले”, असं संभाजी भिडे म्हणाले.

 भिडे RSS च्या इशाऱ्यावर बोलतायत”
संभाजी भिडे हे आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावरच हे सगळं बोलत असल्याचा आरोप तुषार गांधी यांनी केला. “या विधानावर स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. कारण एका गलिच्छ, विकृत, हीन मानसिकतेच्या माणसानं केलेले हे आक्षेप आहेत. हे भिडे बोलत नाहीयेत. भिडे कुणाच्यातरी इशाऱ्यावर हे करत आहेत. गांधी हत्येपासून हा गांधीद्वेष प्रखर पद्धतीने नागपूरहून (आरएसएसकडून) केला जातो. हा नागपूरचा अजेंडा आहे हे सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. नागपूरच्याच इशाऱ्यावर गोडसेनी बापूंवर तीन गोळ्या झाडल्या होत्या”, असं तुषार गांधी म्हणाले.

“जेव्हा त्यांना समजलं की व्यक्तीची हत्या झाली पण विचार प्रखर झाले, तेव्हापासून नागपूरच्या, आरएसएसच्या इशाऱ्यावर गांधीद्वेषाची एक मोहीम चालवली जात आहे, हे विकृत आणि अश्लील विचारधारेचं उत्पादन आहे”, अशा शब्दांत तुषार गांधींनी आपला संताप व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment