Tuesday, July 18, 2023

किरीट सोमय्या यांना जोड्याने मारा ; ठाकरे गटाचे राज्यभर आक्रमक आंदोलन ;

वेध माझा ऑनलाईन। भाजपचे नेते किरीट सोमय्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि सर्वत्र खळबळ उडाली. या व्हिडीओमुळे किरीट सोमय्या चांगलेच अडचणीत आलेत. महत्त्वाचं म्हणजे, इतर नेत्यांवर वारंवार आरोप करण्याची ख्याती असलेल्या सोमय्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने, तेही विरोधकांच्या रडारवर आलेत. किरीट सोमय्या यांच्या या व्हिडीओनंतर राज्यभर त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. अनेक ठिकाणी ठाकरे गटाकडून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. 

दरम्यान याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय. आणि व्हायरल व्हिडीओची सत्यता पडताळावी, अशी मागणी केलीय. त्याचवेळी कोणत्याही महिलेवर आपण अत्याचार केला नसल्याचं स्पष्टीकरणही किरीट सोमय्या यांनी दिलंय. त्यानंतर विरोधकांनी सोमय्यांच्या मुद्द्यावरून विधानपरिषद डोक्यावर घेतली आणि आरोपांची राळ उडवली.

No comments:

Post a Comment