Thursday, July 13, 2023

कराडातील एकविरा कॉलनीतील आर सी सी रस्त्याचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन ; अल्पसंख्याक नेते झाकीर पठाण यांनी केली होती रस्त्याची मागणी ; बाबांनी दिला 20 लाखाचा निधी;

वेध माझा ऑनलाईन। कराड शहरातील एकविरा कॉलनीमध्ये आरसीसी रस्ता बनवण्याबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी व महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष झाकीर पठाण यांनी  मागणी केली होती त्याची दखल घेत माजी मुख्यमंत्री कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी वीस लाख रुपये मंजूर केले होते नुकतेच 9 जुलै रोजी या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा हस्ते करण्यात आले,दरम्यान आ पृथ्वीराज चव्हाण यांनी या रस्त्याच्या कामाकरिता झाकीर पठाण यांनी केलेल्या प्रयत्नांचे विशेष कौतूक केले 

यावेळी आ पृथ्वीराज चव्हाण यांचा सत्कार मदार शैख यांच्या हस्ते करण्यात आला तसेच झाकीर पठाण व शिवराज मोरे यांचा सत्कार अल्ताफ मोमीन व समीर डंगरे यानी केला  युवा नेते इंद्रजीत चव्हाण, अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, ऋतुराज मोरे,श्रिकांत मुळे,जितेंद्र ओसवाल, अमीर कटपुरे साहेबराव शेवाळे शिवराज इंगवले जावेद नाईकवडी सलिम बागवान यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता एकविरा कॉलनीतील आदम पठाण,आब्दुल मुल्ला,रफ़ीक शेख,उसमान शेख,आयुब बागवान,आली शैख याचे आ पृथ्वीराज बाबांनी कौतुक व अभिनंदन केले

No comments:

Post a Comment