Monday, July 17, 2023

अजित पवार यांना 36 आमदारांची जुळवाजुळव करणे कठीण ! ; पुन्हा गेले शरद पवारांच्या भेटीला ...

वेध माझा ऑनलाईन। देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 2 जुलै रोजी राजभवन येथे अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घातली. त्यानंतर रविवारपासून अजित पवार हे शरद पवार यांची भेट घेत आहेत, यात त्यांना मनोमिलन करायचे की अन्य काही, याचे उत्तर लवकरच मिळणार आहे. आज सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे सर्व आमदार पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत रविवारी अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर, आज पुन्हा आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले. यशवंतराव चव्हाण सेंटरवर ही भेट होत आहे. महत्त्वाचं म्हणजे स्वत: अजित पवार, सुनील तटकरे शरद पवारांची भेट घेत आहेत. रविवारच्या भेटीत या सगळ्या आमदारांनी शरद पवार यांचे पाय धरले होते. दरम्यान अजित पवार यांना 36 आमदारांची जुळवाजुळव करणे कठीण जात आहे, त्यामुळे ते शरद पवार यांची विनवणी करण्यासाठी आज पुन्हा त्यांची भेट घेत असल्याचे समजते.

राज्याचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. आज सभागृहाचं कामकाज आटोपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीनंतर सर्व आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी यशवंतराव चव्हाण सेंटरकडे रवाना झाले. दरम्यान, शरद पवार हे आपल्या सिल्व्हर ओक निवासस्थानावरुन यशवंतराव चव्हाण सेंटरकडे रवाना झाले. दरम्यान, शरद पवार यांच्यासोबत यावेळी जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार आज शरद पवारांच्या भेटीला आल्याने राज्यासह देशाच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष याकडे लागलं आहे.

No comments:

Post a Comment