वेध माझा ऑनलाईन। राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना ईमेल द्वारे धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंद झाली आहे.
दरम्यान, धमकीच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
राष्ट्रपित्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा माणूस बाहेर कसा फिरू शकतो?, असा सवाल करताना पृथ्वीराज चव्हाण संतप्त झाले होते. संभाजी भिडे या व्यक्तिला ताबडतोब अटक करा, अशी मागणी चव्हाण यांनी सभागृहात केली होती. चव्हाण यांच्या मागणीला काँग्रेसच्या इतर आमदारांनी पाठिंबा दिला आहे
No comments:
Post a Comment