वेध माझा ऑनलाइन। विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून म्हणजेच उद्यापासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चहापानासाठी सह्याद्री अतिथीगृहावर आमंत्रित केले आहे. तत्पुर्वी महाविकास आघाडीच्या विधिमंडळ नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये अधिवेशनासाठी विरोधकांची रणनीती ठरणार आहे.
पक्षफुटीमुळे कमकुवत झालेल्या विरोधी पक्षासमोर सरकारची कोंडी करण्याचं मोठं आवाहन असणार आहे. सरकारला घेरण्याची संधी आम्ही सोडणार असे नाना पटोले आणि आंबादास दानवे यांनी आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकला जाऊ शकतो अशी शक्यता आहे.
महाविकास आघाडीची आज बैठक
महाविकास आघाडीची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर विधिमंडळातील विरोधी पक्षनेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत विरोधक सरकारला घेरण्याची रणनीती ठरणार असल्याची माहिती मिळाली आहे
अजित पवार गटाच्या सर्व मंत्र्यांची आज बैठक
अधिवेशनापूर्वी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयात ही बैठक होणार असून सुनिल तटकरे या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. प्रतोद अनिल पाटील हे या बैठकीला सर्व आमदारांनी हजर राहण्याबाबत नोटीस काढणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे किती आमदार या बैठकीला उपस्थित राहणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण यावरून अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे किती आमदार आहेत हे कळणार आहे.
व्हीप बजावला जाणार
पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून आमदारांना व्हीप बजावला जाणार आहे. प्रतोद अनिल पाटील यांनी ही माहिती दिली आहे. आमच्या पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्हीप बजावण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी व्हीप नाकारला तर त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील अशी मागणी अनिल पाटील यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment