Friday, July 14, 2023

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा गैरअर्थ काढला किंवा त्यांना तसा अर्थ काढायला सांगितलं आहे,; कायदेतज्ञ असीम सरोदे यांचं मोठं विधान ;

वेध माझा ऑनलाईन। सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय दिला आहे. याबाबतचा अंतिम निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा, असा आदेशही न्यायालयाने दिला. ‘रिझनेबल टाइम’ अर्थात वाजवी वेळेत हा निर्णय द्यावा, असंही न्यायालयाने म्हटलं होतं. पण विधानसभा अध्यक्षांनी अद्याप यावर निर्णय घेतला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस पाठवली आहे. तसेच दोन आठवड्यांच्या आत उत्तर द्यावं, असा आदेश दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना नोटीस पाठवल्यानंतर कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा गैरअर्थ काढला किंवा त्यांना तसा अर्थ काढायला सांगितलं आहे, अशी प्रतिक्रिया असीम सरोंदेंनी दिली. ते ‘एका वृत्त वाहिनीशी फोनवरुन संवाद साधत होते.

सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना पाठवलेल्या नोटीसवर प्रतिक्रिया देताना असीम सरोदे म्हणाले,”मला वाटतंय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. ती मुदत देण्याची आवश्यकता नव्हती. कारण आतापर्यंत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय देणं अपेक्षित होतं. सर्वोच्च न्यायालयाने परिच्छेद क्रमांक २०६ (ब) मध्ये ‘रिझनेबल टाईम'(वाजवी काळ) हा शब्द वापरला आहे. याचा राहुल नार्वेकर यांनी गैरअर्थ काढला आहे किंवा त्यांना तसा अर्थ काढायला सांगितला आहे.”

No comments:

Post a Comment