वेध माझा ऑनलाईन। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सेवा कार्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या पुढाकाराने भाजपा कराड दक्षिणच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांना सुमारे २५,००० वह्यांचे वाटप करण्यात आले.
इर्शाळवाडी येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कार्यकर्त्यांनी हा दिवस सेवा कार्य दिन म्हणून साजरा करुन लोकोपयोगी उपक्रम राबवावेत, असे आवाहन भाजपाच्यावतीने करण्यात आले होते. त्यानुसार भाजपा कराड दक्षिणच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी वह्यावाटप उपक्रम राबविण्यात आला. कराड नगरपरिदेच्या शाळा क्रमांक ३ मध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी कराड नगरपरिदेच्या शाळा क्रमांक ३ सह ११, २ व शाळा क्र. ४ मधील विद्यार्थ्यांना प्रातनिधीक स्वरुपात वह्यावाटप करण्यात आले.
याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, माजी नगरसेवक सुहास जगताप, प्रमोद शिंदे, रमेश मोहिते, प्रशांत कुलकर्णी, विष्णू फुटाणे, सौ. स्वाती पिसाळ, मंजिरी कुलकर्णी, उमेश शिंदे, अभिषेक भोसले, विशाल कुलकर्णी, शैलन्द्र बोंडकर, विनायक घेवदे, उपमुख्याध्यापिका सौ. जयश्री जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, ना. फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कराड दक्षिण मतदारसंघात आरोग्य शिबीरांचेही आयोजन करण्यात आले असून, याचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला असल्याची माहिती तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील यांनी दिली.
No comments:
Post a Comment