Wednesday, July 26, 2023

पंधरा दिवसांतच सावत्र भावासारखे का वागू लागलात?... बारामती म्हणजे महाराष्ट्र नव्हे, या शब्दात यशोमती ठाकूर यांनी अजितदादांना खडसावले ;

वेध माझा ऑनलाईन। विधान सभेत आज निधी वाटपावरून कॉंग्रेस आमदार तसेच माजी मंत्री यशोमती ठाकूर या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भिडल्या. पंधरा दिवसांतच सावत्र भावासारखे का वागू लागलात? असा भावनिक सवाल करत, बारामती म्हणजे महाराष्ट्र नव्हे, या शब्दात त्यांनी अजित पवार यांना खडसावले. यशोमती ठाकूर यांचा हा रुद्रावतार पाहून सभागृह अवाक झाले. महाविकास आघाडीत अजित पवार अर्थमंत्री असताना त्यांनी शिवसेना आमदारांना विकास निधी देताना आकडता हात घेतला, असा आरोप शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांनी केला होता, नव्हे तर अजित पवार यांना अर्थमंत्री करण्यात येणार असल्याची माहिती मिळताच हे आमदार आक्रमक झाले होते. त्यांची समजूत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काढावी लागल्याने मंत्र्यांचे खातेवाटप रखडले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता निधी वाटपात होत असलेल्या भेदभावाबाबत विरोधक काय भूमिका घेतात हे पहावे लागणार आहे.

उन्हाळी अधिवेशनात शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांना निधीवाटप करताना सरकारने भेदभाव केल्याचा आरोप होत आहे. हे प्रकरण न्यायालयात आहे. असे असताना आता पुन्हा निधी वाटपाबाबत वाद निर्माण झाला आहे आणि त्यात टार्गेट अजित पवार आहेत. अजित पवार हे अर्थमंत्री झाल्यावर अधिक निधी ते आपल्या आणि भाजपच्या आमदारांना देतील अशी अटकळ बांधली जात असताना बुधवारी विधान सभेत याच मुद्द्यावर आमदार यशोमती ठाकूर या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर चिडल्याचे निदर्शनास आले.

अजित पवार यांना मी भाऊ, मार्गदर्शक मानते. पण ते 15 दिवसात सावत्र भावासारखे वागत आहे. लहानपणापासून माझ्या मनात अजित पवार यांची वेगळी इमेज आहे. पण विकास निधी देताना त्यांनी केलेल्या भेदभाव मान्य नाही. अजित पवार यांनी त्यांच्या मतदार संघाला जास्त निधी दिला. बारामती म्हणजे महाराष्ट्र नव्हे, त्यात विदर्भ येतो. निधी वाटपात अमरावती विभागाला पैसा दिला नाही, असा आरोप ठाकूर यांनी केला. अजित दादांकडून असे अपेक्षित नाही, असेही त्यां म्हणाल्या 

No comments:

Post a Comment