वेध माझा ऑनलाईन। सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या नवीन अत्याधुनिक इथेनॉल प्रकल्पातून उत्पादित झालेल्या इथेनॉलचा पहिला टँकर, कारखान्याचे संचालक मा.जशराज पाटील (बाबा) यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करून शासनाच्या इंडियन ऑईल कॅर्पोरेशन लि.या कंपनीच्या गोवा येथील डेपोकडे पाठवण्यात आला.
सह्याद्रि कारखान्याचे चेअरमन, राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याने प्रतिदिन एक लाख लिटर्स उत्पादन क्षमतेचा नवीन अत्याधुनिक इथेनॉल प्रकल्प उभारला असून, मागील हंगामाच्या अखेरीस या नवीन प्रकल्पातून इथेनॉल उत्पादन घेण्यात आले असून, इथेनॉलने भरलेला पहिला टँकर कारखान्याचे संचालक मा.जशराज पाटील (बाबा) यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करून कंपनीच्या गोवा येथील डेपोकडे पाठविण्यात आला आहे.
याप्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, जनरल मॅनेजर पी.आर.यादव, डिस्टलरी इन्चार्ज अनिल पाटील, शेती अधिकारी व्ही.बी.चव्हाण, स्टोअर सुपरीटेंडंट डि. एन.पिसाळ, डिस्टलरी केमिस्ट व कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment