वेध माझा ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे प्रसिध्द अभिनेते रवींद्र महाजनी (वय ७७) यांचे आकस्मित निधन झाले आहे. ते मावळ तालुक्यातील आंबे येथे वास्तव्यास होते. एका बंद खोलीत शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळला.
अभिनेते महाजनी हे गेल्या काही दिवसांपासून आंबे येथे एका फ्लॅटमध्ये राहण्यासाठी आले होते. दरम्यान शुक्रवारी त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी आल्याने नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फ्लॅटचा दरवाजा तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी महाजनी यांचा मृतदेह आढळून आला. दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. महाजनी यांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.
भावपूर्ण श्रध्दांजली
ReplyDeleteया माणसाने १९९६ मधे सकाळ मधे एक जाहिरात दिली होती. "वारजे माळवाडी येथील निसर्ग-रम्य परीसरात स्विमिंगपुल, क्लब हाऊस सह सर्व अमॅनिटीजनी परीपूर्ण गृह प्रक्लप. आजच बुक करा." त्या जाहिरातीवर विसंबुन मी पुढील ॲक्शन घेतल्या. त्यांच्या पौड रोड वरील ऑफिस (कम घर?) येथे त्यांना जाऊन भेटलो. प्लान, सर्व ॲप्रुव्हल्स वगैरे चेक केले. HDFC मधे जाऊन लोन सॅक्शंन करुन घेतले. मार्च, १९९७ रोजी ॲग्रीमेंट रजिस्टर केले. नंतर मार्च, १९९८ गेले, मार्च, १९९९ गेले. या माणसाचा प्रोजेक्ट पुरा व्हायचं नाव नाही. त्या वेळेच्या नियमा नुसार, दोन वर्षात प्रोजेक्ट पुर्ण करुन सर्व अमॅनिटीजसह घराचा ताबा देणे कायदेशिर रित्या आवश्यक होते. शेवटी मे / जुन, १९९९ मधे मी त्याना एक वस्तुस्थिती विषद करणारे पत्र पाठवले आणि माझी फ्लॅटची नोंदणी रद्द करून, माझे सर्व पैसे परत करावेत अन्यथा एप्रिल, १९९९ पासून पुढे ताबा मिळे पर्यंतचे गृह कर्जा वरील व्याज (Pre-EMI Interest) व घर भाडे तुम्ही बेअर करणार असे मी समजतो असे सांगितले.
ReplyDeleteपुढे जानेवारी, २००० मधे अर्धवट बांधकाम झालेल्या घराचा ताबा घेतला, परंतु MSEB व सोसायटी फाॅर्मेशनचे पेसे दिले नाहित. लिफ्ट बसवा मग पाहू असे सांगितले. त्या वर त्यानी मला लिगल नोटिस दिली. तेव्हा मी त्या लिगल नोटिसला ऊत्तर दिले व एप्रिल,१९९९ ते डिसेंबर, १९९९ पर्यंतचे व्याज व घरभाडे याची रक्कम त्यानी मागितलेली रक्कम वजा करुन मागितली.
या वर एके दिवशी रात्री दारु पिउन "विजया-रश्मी" या सोसायटीत येउन मला शिवीगाळ केली, माझ्या फ्लॅटच्या दारावर लाथा मारल्या, मला माझ्या बायकोला व पाच, सहा वर्षांच्या मुलीला जीवे मारायची धमकी दिली.
लोकसत्ता संपादकाचा मुलगा व प्रतिथयश नटाची ही बाजूपण प्रकाशात यावी, केवळ याच साठी हा लेखन प्रपंच! माझा "मरणांती न वैराणी" या वर अजिबात विश्वास नाही.