वेध माझा ऑनलाईन। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित मंत्र्यांसह शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी सर्वच नऊ मंत्र्यांनी शरद पवार यांचे आशिर्वाद घेतल्याचे समजतेय. शरद पवारांना वाय.बी. चव्हाण सेंटरवर अजित पवारांचा गट भेटला, छगन भुजबळ पवारांच्या समोर आले आणि विठ्ठला सांभाळून घे रे आम्हाला, असं म्हणत थेट पवारांच्या पाया पडले त्यानंतर जवळपास सर्वच नेत्यांनी पवारांच्या पाया पडत हात जोडले, अशी माहिती मिळाली
विठ्ठला सांभाळून घे रे असे उद्गार काढत छगन भुजबळ शरद पवारांच्या पाया पडले. वाय बी चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी येऊन शरद पवारांची भेट घेतली. याभेटी दरम्यान जवळपास सर्वच मंत्र्यांनी शरद पवारांच्या पाया पडत हात जोडले. मंत्री आणि शरद पवार यांच्यामध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याचे समजतेय. अजित पवार यांच्या गटाने शरद पवार यांची भेट घेतली. यात सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, संजय बनसोडे आदींचा सहभाग होता. ही माहिती मिळताच जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड देखीलही तातडीने वाय.बी. चव्हाण सेंटरवर दाखल झाले. मला सुप्रिया सुळेंचा फोन आला म्हणून मी लवकर निघालोय. शरद पवारांनी बोलवलंय, लवकर या असं मला सांगितलं, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
No comments:
Post a Comment