Thursday, July 13, 2023

अखेर ठरलं ? उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खातं देण्यावर शिक्कामोर्तब ; सहकार खातं दिलीप वळसे पाटलांकडे तर छगन भुजबळांकडे अन्न आणि औषध पुरवठा खातं सोपवलं जाणार ;

वेध माझा ऑनलाइन।  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्याकडील सर्वात मोठं खात अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खातं देण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे. महायुतीत नव्यानं दाखल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अर्थ खात्यासोबतच सहकार खातंही मिळण्याची शक्यता आहे. सहकार खातं दिलीप वळसे पाटलांकडे आणि छगन भुजबळांकडे अन्न आणि औषध पुरवठा खातं सोपवलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्थ खात्यासह सहकार खात्यासाठीही आग्रही असल्याचं बोललं जात होतं. अखेर अर्थ खात्यासोबतच सहकार खातंही राष्ट्रवादीकडेच जाणार असल्याचं बोलंल जात होतं. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांकडे सर्वात महत्त्वाची समजली जाणारी अर्थ आणि गृह अशी दोन्ही खाती होती. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील अर्थ खातं अजित पवारांकडे जाणार असल्याचं बोललं जात आहे. 
महिला आणि बाल विकास मंत्रालय, युवक कल्याण मंत्रालय, सामाजिक न्याय मंत्रालय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जाण्याची शक्यता आहे. 



No comments:

Post a Comment