वेध माझा ऑनलाईन। जूनमध्ये पावसाने झलक दाखवली, पण मनासारखा पाऊस काही पडला नाही. त्यामुळे राज्यातील अनेक भागात पेरणीची कामे खोळंबली आहेत, असे असताना जुलै च्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्याने बळीराजा सुखावला आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांची शेतीची कामं खोळंबली होती. अखेर अनेक भागात पावसानं हजेरी लावली आहे. काही ठिकाणी जोरदार पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर रायगड, पालघर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणासह मध्ये महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. रायगड, पालघर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या मुसळदार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
No comments:
Post a Comment