वेध माझा ऑनलाईन। राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कराड येथील शासकीय आशाकिरण महिला वसतिगृहातील निराधार महिलांना
सौ.जयमाला बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते खाऊ व भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.
राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या आठ दिवसांपासून कराड तालुक्यातील व कराड उत्तर मतदारसंघातील विविध गावांमध्ये आरोग्य शिबीर, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, वृक्षारोपण असे समाजोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत, आज याच अनुषंगाने कराड येथील शासकीय आशाकिरण महिला वसतिगृहातील निराधार महिलांना खाऊ व भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.
मा.सौ.जयमाला पाटील यांनी वसतिगृहातील प्रवेशितांची आस्थेवाईकपणे चौकशी केली, तसेच वसतिगृहामध्ये महिलांना पुरविण्यात येत असलेल्या सोयीसुविधांच्या बाबतची माहिती घेतली व कमतरता असलेल्या सोयी पूर्ण करण्याबाबत आश्वासित केले, तसेच शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये यासाठी या ठिकाणी राहत असलेल्या इच्छुक मुलींना पुढील वर्गामध्ये प्रवेश देऊन शिक्षणाचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले करण्यासाठीचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले, वस्तीगृहातील महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय स्टाफ उपलब्ध करून देण्यात येईल असेही यावेळी त्यांनी सांगून या निराधार माता-भगिनींच्या पाठीवरून मायेचा हात फिरविला या सर्व बाबींमुळे उपस्थित माता-भगिनींनी मा.सौ. जयमाला पाटील यांचे प्रती ऋण व्यक्त केले व आभार मानले.
याप्रसंगी सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन सौ.लक्ष्मीताई गायकवाड, कराड नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा ॲड.विद्यारणी साळुंखे, माजी नगरसेविका सौ.अनिता पवार, सौ.सुनंदा शिंदे, सौ.पल्लवी पवार, सौ.अरुणा जाधव, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका सौ.शारदाताई पाटील, आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब पाणी पुरवठा संस्थेच्या संचालिका सौ.सुशीला पाटील, सौ.आशा पाटील, कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ.सुरेखा डुबल, सौ.उज्वला पाटील, सौ.गुरव मॅडम, जयंत बेडेकर, अख्तर अंबेकरी मुसद्दीक अंबेकरी, वसतिगृहाचे अधीक्षक अविनाश म्हासुर्णेकर आदी.उपस्थित होते.
No comments:
Post a Comment