वेध माझा ऑनलाईन। सातारा जिल्ह्याच्या भाजप च्या नूतन जिल्हाध्यक्षपदी कराड उत्तर चे भाजपचे नेते धैर्यशील कदम यांनी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बाबवनकुळे यांनी ही माहिती ट्विटरवरून दिली आहे
वर्धन ऍग्रो साखर कारखान्याचे चेअरमन धैर्यशील कदम हे कराड उत्तर चे भाजप चे नेते आहेत यापूर्वी त्यांनी उत्तरची विधानसभा निवडणूक लढवत लक्षवेधी मते मिळवली आहेत
मनोज घोरपडे हे देखील कराड उत्तर चे भाजप चे नेते आहेत त्यांनीही विधानसभा निवडणुकीत घेतलेली मते ही देखील भाजप चे वर्चस्व त्याठिकाणी प्रयत्न केल्यास प्रस्थापित होऊ शकते हे दाखवणारी होती मात्र या दोन भाजप नेत्यांच्या परस्परविरोधी उमेदवारीने मत विभागणी चे नुकसान भाजपला कराड उत्तर मध्ये होत असल्याचे लक्षात आल्याने मावळते जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांच्या पुढाकाराने कराड उत्तर चे राजकिय गणित यावेळी भाजप च्या बाजूने परफेक्ट बसवायचं या उद्देशाने धैर्यशील कदम यांची भाजपचे नूतन सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात आले दरम्यान सातारा जिल्ह्यात या निवडीमुळे भाजप पक्ष आणखी मजबूत होईल असा विश्वासही सातारा जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे
No comments:
Post a Comment