वेध माझा ऑनलाईन। कराडचे माजी पंचायत समिती उपसभापती सुहास बोराटे यांचा मुलगा आयुष्य बोराटे याचा खून करण्याचा प्लॅन आखणार्या टोळीला तळबीड पोलिसांनी अटक केली त्यामुळे हा खुनाचा प्लॅन पोलिसांमुळे उधळला गेला आहे
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रीतम पाटील आनंद नावाचे हॉटेल बेलवडे हवेली याठिकाणी चालवतात गेल्या 7 जुलै ला आयुष्य बोराटे त्याठिकाणी जेवण करण्यास आला असता त्याचा जेवणाची ऑर्डर देण्यावरून प्रीतम पाटील यांच्याबरोबर वाद झाला होता त्यावेळी आयुष्य ने त्या हॉटेलची तोडफोड देखील केली होती त्याचा राग मनात धरून प्रीतम पाटील (रा वहागाव) यांनी आयुष्यच्या खुनाचा कट रचला त्यासाठी त्याने ऋषिकेश पाटील तसेच सागर व किरण पवार (रा वहागाव) या साथीदारांच्या साहाय्याने हा कट रचला
दरम्यान तासवडे येथे रात्री उशिरा दुचाकीवरून हे चार जण जात असताना पोलिसांना दिसले त्यांची अडवून अधिक चौकशी केली असता त्यांनी सदर खुनाच्या कटाची कबुली दिली यानंतर पोलिसांनी हत्यारे व मुद्देमाल ताब्यात घेतला तसेच या चौघांना देखील अटक केली
No comments:
Post a Comment