Sunday, July 30, 2023

फडणवीसांनी संभाजी भिडेंना सुनावले ; स्वातंत्र्यवीर सावरकरबाबत अत्यंत गलिच्छ शब्दात राहुल गांधी बोलतात त्याचाही निषेध काँग्रेसनं करायला हवा ; काँग्रेसलाही दिला टोला ...

वेध माझा ऑनलाईन।  संभाजी भिडे गुरुजींनी जे वक्तव्ये केले त्याचा मी निषेध करतो. महात्मा गांधी देशाचे राष्ट्रपिता आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात महानायक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अशा महानायकाबाबत असं विधान करणे अत्यंत चुकीचे आहे. भिडे गुरुजी असो वा कुणीही अशी विधाने करू नये. याबाबत जी काही कारवाई आहे ती राज्य सरकार उचितपणे करेल असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोट्यवधी लोकं अशा विधानाने संतप्त होतात. लोकं महात्मा गांधीविरोधात असं बोलले कधीही सहन करणार नाहीत. महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर कुणाबद्दलही असो आम्ही बोललेले सहन करणार नाही. संभाजी भिडे यांचा भाजपाशी काहीही संबंध नाही. ते त्यांची संघटना चालवतात. त्यामुळे याला राजकीय रंग देण्याचं कारण नाही असं स्पष्ट शब्दात फडणवीसांनी सांगितले.

त्याचसोबत ज्यारितीने काँग्रेसचे लोक महात्मा गांधींविरोधात केलेल्या विधानावरून रस्त्यावर उतरतात तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबतही अत्यंत गलिच्छ राहुल गांधी बोलतात त्याचाही निषेध काँग्रेसनं करायला हवा. पण त्यावेळी ते मिंदे होतात. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत महात्मा गांधींचा अपमान सहन केला जाणार नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी भिडेंच्या विधानावर भाष्य केले आहे.

No comments:

Post a Comment