Friday, July 28, 2023

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे कराड बसस्थानकाच्या सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा मार्गी :

वेध माझा ऑनलाईन। सातारा विभागातील कराड येथे पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्री काळात नव्याने बांधण्यात आलेल्या बसस्थानकामधील स्टील बेंचेसची मोडतोड झालेने सद्या प्रवाशांना बसण्याकरिता गैरसोय होत आहे हि बाब माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी शासनाच्या निदर्शनास  आणून देण्यासाठी व कराड बसस्थानक साठी निधी मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला तसेच लक्षवेधीच्या माध्यमातून विधानसभेत सूचना देखील मांडली. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले कि, स्टीलचे बेंचेस वेल्डिंग करून पुन्हा तुटण्याची शक्यता असल्याने त्याऐवजी त्याठिकाणी आरसीसी बेंचेस तयार केले जातील व हे काम तातडीने केले जाईल. तसेच बसस्थानकाच्या तळघरामधील पार्किंगमध्ये पाणी साठते सदरचे पाणी साठणार नाही याची दक्षता घेण्याचेसुद्धा आदेश दिले जातील. 

पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्री काळात विशेष निधीची तरतूद करून जवळपास रु. ११ कोटी इतका खर्च करून कराडकरांच्या सोयीसाठी नवीन बसस्थानक बांधले गेले कराड तालुक्यातील सर्वच नागरिकांना अत्यंत प्रशस्त व सुविधायुक्त बस स्थानक त्यांच्या महत्वपूर्ण निर्णयामुळे मिळाले. परंतु काही वर्षातच येथील स्टीलच्या खुर्च्यांची मोडतोड झाली. ज्यामुळे अनेक प्रवासी जखमी झाले हि बाब आ. चव्हाण यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शासनाकडून येथील बसस्थानक पुन्हा एकदा सुस्थितीत आणण्यासाठी व निधी मिळावा म्हणून प्रयत्न केले, तसेच अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडून शासनाचे लक्ष वेधले. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी बसस्थानकाच्या विकासाबद्दल ठोस निर्णय घेऊन आदेश दिले आहेत. 

No comments:

Post a Comment