Monday, July 31, 2023

राज्याचा विरोधीपक्ष नेता ठरला ; काँग्रेसच्या "या' नेत्यांचे नाव झालं फायनल ;

वेध माझा ऑनलाईन। राजकारणा गेल्या काही महिन्यात अनेक घडामोडी घडल्या. त्यामुळे, सत्तेतील नेते विरोधात आणि विरोधातील नेतेमंडळी सत्तेत गेल्याचं पाहायला मिळालं. या सत्तासंघर्षात राष्ट्रवादी काँग्रेसनेही अजित पवारांच्या नेतृत्वात बंड करत भाजपासोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यात, अजित पवार उपमुख्यमंत्री झाले तर, राष्ट्रवादीचे इतर ९ आमदार मंत्री बनले आहेत. त्यामुळे, राज्याचे विरोधी पक्षनेतेपद गेल्या काही दिवसांपासून रिक्त होते. तेथे आता काँग्रेस नेत्याची नियुक्ती होणार आहे. काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी विजय वडेट्टीवार यांचे नाव निश्चित करण्यात आलं आहे. 

राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी दुसऱ्यांदा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांची निवड होत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी स्वतः वडेट्टीवार यांनी फेसबुक पेजवर आनंदाची बातमी विरोधी पक्षनेता होणार, अशी पोस्ट केल्याने राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली होती. आता, काँग्रेसकडून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. तर, विधिमंडळ नेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. आता, काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षांना विरोधी पक्षनेतेपदाची निवड करण्याबाबत पत्र दिले जाईल. त्यानंतर, विधानसभा अध्यक्ष विरोधी पक्षनेत्याच्या निवडीची घोषणा करतील. 

२०१४ ते २०१९ या कार्यकाळात अखेरच्या तीन महिने विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळाली होती. त्यावेळी, राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपसोबत गेल्यामुळे त्यांना ही संधी मिळाली होती. आता, दुसऱ्यांदा त्यांना विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळत आहे. त्यामुळे, काँग्रेस पक्षात वडेट्टीवार यांचं स्थान वाढल्याचं दिसून येतं. 

दरम्यान, यापूर्वी विरोधी पक्षनेतेपद पहिले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीमुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तथा उद्बव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संख्याबळ कमी आहे. आता, काँग्रेसकडे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपद काँग्रेस पक्षाकडे आले असून विजय वडेट्टीवार यांचे नाव निश्चित झाले आहे.

नरेंद्र मोदीं पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात त्या मोदींचा सन्मान पवार करतात हे लोकांना आवडल नाही ; शरद पवारांच्या असल्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंची सामनातून टीका ;

वेध माझा ऑनलाईन।  नरेंद्र मोदी कालपर्यंत ज्यांना भ्रष्ट मानत होते, ते मोदींचा सन्मान करतील. याचा अर्थ मोदी आणि त्यांच्या लोकांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप खोटेच आहेत. फक्त पक्ष फोडण्यासाठीच त्यांनी हे आरोप केले आणि लोकांमध्ये भय निर्माण केले. दुसरे आश्चर्य म्हणजे शरद पवार, महिन्यापूर्वी मोदी यांनीच शरद पवारांच्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, पक्ष फोडला. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करून सोडला. तरीही शरद पवार मोदींचे आगत स्वागत करणार हे लोकांना आवडले नाही. शरद पवार गैरहजर राहिले असते तर त्यांचे नेतृत्व, हिंमत यास सह्याद्रीने दाद दिली असती अशा शब्दात सामना अग्रलेखातून खोचक बाण सोडले आहेत.

सामना अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी म्हटलंय की, खरेतर, लोकांच्या मनात आपल्या विषयी असलेली साशंकता दूर करण्याची चांगली संधी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवून शरद पवार यांना साधता आली असती. तिनेक महिन्यापूर्वी आपणच त्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिल्याने मला हजर राहावे लागेल असं पवार म्हणतात. पण पुण्यात येण्याआधी मोदींनी त्यांच्या या विशेष निमंत्रकाचा पक्ष फोडून भाजपामध्ये सामावून घेतला. त्याचा निषेध म्हणून शरद पवारांनी गैरहजर राहायला हवे होते असं त्यांनी सांगितले.

सामनात आणखी म्हटलंय...
शरद पवार मऱ्हाटे आहेत, शरद पवार म्हणजे आशादायक चेहरा असं ते स्वत:च सांगत असतात तेव्हा त्यांच्याकडून वेगळ्याच आशादायी भूमिकेची अपेक्षा आहे. देशातील हुकुमशाहीविरोधात इंडिया आक्रमक आघाडी तयार झालीय. शरद पवार हे त्या आघाडीतले महत्त्वाचे शिलेदार आहेत.

मोदी पुण्यात असताना तिकडे संसदेत दिल्ली सरकारचे लोकशाही अधिकार खतम करून सर्वोच्च न्यायालयाचा न्याय तुडवत विधिमंडळाच्या अधिकारावर आक्रमण करणारे विधेयक संसदेत मंजुरीसाठी आणले जात आहे. हे हुकुमशाही विधेयक आणणारे मोदी हे स्वातंत्र्याचे सेनानी लोकमान्य टिळकांच्या नावाने पुरस्कार घेतील व शरद पवार संसदेत विधेयकास विरोध करण्यास हजर राहण्याऐवजी मोदींना पुरस्कार देतील हे पवारांच्या चाहत्यांना आवडणार नाही.देशात स्वातंत्र्याचा दुसरा लढा सुरू आहे. अशावेळी शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून लोकांच्या वेगळ्या अपेक्षा आहेत. 

कराडला बुधवारी शासन आपल्या दारी कार्यक्रम ;रणजित पाटील मित्रपरिवारातर्फे आयोजन ;

वेध माझा ऑनलाईन। 
राज्य शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेला ‘शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम बुधवारी 2 रोजी कराड येथे व्यापक प्रमाणात आयोजित करण्यात आला आहे. वाखाण रोड, अर्बन बँकेसमोर दत्त मंदिरात सकाळी 10 वाजता या कार्यक्रमास सुरवात होणार आहे. सामाजिक कार्यकर्ते रणजितनाना पाटील मित्र परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरी व ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला विविध प्रकारचे दाखले, उतारे व शासकीय योजनांच्या लाभासाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. सर्वसामान्य जनतेची कामे त्यांच्या गावात व विनासायास व्हावीत, यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. बुधवारी कराड येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रणजित पाटील यांनी केले आहे.या कार्यक्रमात एकाच छताखाली जास्तीत जास्त शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्यात येणार आहे, असे रणजित पाटील यांनी सांगितले.

पृथ्वीराज चव्हाणांना धमकी देणाऱ्या आरोपीला जामीन मंजूर ;

वेध माझा ऑनलाईन। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ईमेलवर द्वारे नांदेड येथील संशयित अंकुश शंकरराव सरावते याने धमकी दिली होती. या प्रकरणी संशयितास अटक करण्यात आल्यानंतर आज कराड येथील प्रथम वर्ग न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास जामीन मंजूर केला.

आ. पृथ्वीराज चव्हाण यांना नांदेड येथील अंकुश सरावते या व्यक्तीने शनिवारी मध्यरात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास ई-मेल द्वारे धमकी दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी काल राजगड येथून रविवारी आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर त्याला आणण्यासाठी कराडचे पोलिसांचे पथक रवाना झाले होते. यानंतर आज संबंधित आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर कराड येथील प्रथम वर्ग न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयात पार पडलेल्या युक्तिवादानंतर धमकी देणाऱ्या आरोपीस जमीन मंजूर करण्यात आला.  


पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 10 वाजता येणार पुण्यात ; मोदींचा पुणे दौरा कसा असेल? वाचा बातमी;

वेध माझा ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (दि.१) पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान मंगळवारी सकाळी ११ वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पूजाअर्चा करणार आहेत. सकाळी ११.४५ वाजता पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येईल. त्यानंतर, दुपारी १२:४५ वाजता पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत तसेच विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.

पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून पुणे मेट्रो टप्पा १ च्या कार्य पूर्ण झालेल्या फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय स्थानक तसेच गरवारे महाविद्यालय स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या दोन मार्गिकांचे उद्घाटन करणार आहेत. सर्वांसाठी घरे या उद्दिष्टपूर्तीच्या ध्येयाकडे वाटचाल करत, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात आलेली १२८० हून अधिक घरे पंतप्रधानांच्या हस्ते हस्तांतरीत करण्यात येणार आहेत. पुणे महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेली २६५० हून अधिक घरे देखील पंतप्रधान हस्तांतरित करणार आहेत. त्यांनतर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात येणाऱ्या सुमारे ११९० घरांची आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणाऱ्या ६४०० हून अधिक घरांची पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

पंतपधान नरेंद्र मोदी पुणे दौरा...

-सकाळी १० .१५ लोहगाव विमानतळावर आगमन
-सकाळी १०.४० कृषि महाविघालयाच्या मैदानवरील हेलिपॅडवर आगमन
- सकाळी १०.५५ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन
- सकाळी ११ तेे ११. ३० वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात पुजा
- सकाळी ११ .४५ वाजता लोकमान्य टिळक पुरस्कारः स. प. महाविद्यालय (कार्यक्रम निमंत्रितांसाठी)
- दुपारी १२.४५ वाजता मेट्रोच्या दोन विस्तारित मार्गांचे लोकार्पण, पंतप्रधान आवास योजनेतील पुणे आणि पिंपरीतील चार हजार सदनिकांचे लोकार्पण,  पीएमआरडीएच्या सहा हजार घरांचे भूमिपूजन (खुला कार्यक्रम)
- दुपारी १.४५ ते २.१५ राखीव
- दुपारी २.२५ कृषि महाविघालयाच्या मैदानवरील हेलिपॅडवर आगमन
- दुपारी २. ५५ वाजता दिल्लीकडे प्रस्थान

संभाजी भिडेंवर तातडीने कारवाई करावी”, राज्य महिला आयोगाची फडणवीसांकडे मागणी

वेध माझा ऑनलाईन। शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. भिडे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. पावसाळी अधिवेशनातही याचे पडसाद उमटत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी संभाजी भिडे यांच्याविरोधात आंदोलनं केली आहे. संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे. संभाजी भिडेंच्या वक्तव्याची आता राज्य महिला आयोगानं दखल घेतली आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचा अपमान महाराष्ट्र सरकार सहन करणार नाही, हे शासनाने कृतीतून दाखवून दिले पाहिजे. राज्याचे गृहमंत्री यांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केली. याबाबतचा एक व्हिडीओ त्यांनी ट्वीटरवरून शेअर केला आहे.

रुपाली चाकणकर ट्विटमध्ये म्हणाल्या, “राष्ट्रपिता महात्मा गांधी, क्रांतीसूर्य महात्मा फुले तसेच लाखोंचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांबद्दल मनोहर भिडे यांनी केलेली वक्तव्य निंदनीय, निषेधार्ह आणि संतापजनक आहेत. सार्वजनिक कार्यक्रमात देशाच्या राष्ट्रपित्याचा अवमान करणे, तसेच त्यांच्या मातोश्रींच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत जाहीरपणे आक्षेपार्ह भाष्य करणं, ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे.”

अमेरिकेत पुन्हा कोरोनाचीे रुग्णसंख्या वाढू लागली ! अमेरिकेच्या सीडीसी संस्थेनं दिला सतर्कतेचा इशारा : करोनाच्या नव्या लाटेची सुरुवात ? अमेरिकन संस्थेचे निरीक्षण ;

वेध माझा ऑनलाईन। २०१९-२० या वर्षांमध्ये करोनानं जगभरात थैमान घातलं होतं. कोट्यवधी माणसं करोनामुळे दगावली. असंख्य लोकांना गंभीर व्याधी जडल्या. काहींवर अद्याप उपचार चालू आहेत. मात्र, गेल्या वर्षभरात करोनाचा जोर मोठ्या प्रमाणावर ओसरल्याचं चित्र जगभरात दिसत आहे. मात्र, त्याचवेळी अमेरिकेत वेगळंच चित्र दिसत आहे. गेल्या काही दिवसांत अमेरिकेत करोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. यासंदर्भात अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिजीस कंट्रोल अँड प्रिव्हेंशन अर्थात सीडीसी या संस्थेनं सतर्कतेचा इशारा दिला आहे. ही कदाचित करोनाच्या नव्या लाटेची सुरुवात ठरू शकते, असं निरीक्षण या संस्थेनं नोंदवलं आहे.

अमेरिकेत गेल्या आठवड्याभरात करोनामुळे रुग्णालयात भरती होणाऱ्यांची संख्या तब्बल १० टक्क्यांनी अचानक वाढली आहे. १५ जुलैच्या आठवड्यात करोनामुळे तब्बल ७ हजार १०० रुग्णांना रुग्णालयात दाखल केलं. त्याआधीच्या आठवड्यात हाच आकडा ६ हजार ४४४ रुग्ण इतका कमी होता. त्याशिवाय, कोविडसंदर्भातल्या इमर्जन्सी रुम्सची मागणीही वाढल्याचं पाहायला मिळत आहे.
“गेल्या सहा ते सात महिन्यांपासून करोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने घट झाल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र. आता अचानक रुग्णांची संख्या वाढू लागल्याचं दिसत आहे. गेल्या अनेक आठवड्यांमध्ये गेल्या आठवड्यात पहिल्यांदाच करोना रुग्णभरतीचा आकडा वाढल्याचं निदर्शनास आलं आहे”, अशी माहिती सीडीसीचे कोविड व्यवस्थापक डॉ. बँडन जॅकसन यांनी दिल्याचं हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तात म्हटलं आहे.


Sunday, July 30, 2023

पृथ्वीराज चव्हाण यांना धमकी देणाऱ्यांचे नाव अंकुश सावराटे ; नांदेड मध्ये मुसक्या आवळल्या ! ; वाचा बातमी

वेध माझा ऑनलाइन । 
माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना आज ईमेलवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी चव्हाण यांच्याकडून कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कराड पोलिसांनी तात्काळ याची दखल घेत ई-मेल करणाऱ्याचा शोध घेतला असून त्याला ताब्यात घेण्यासाठी पथके रवाना केली . तर आमदार चव्हाण यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
दरम्यान धमकीचे मेल करणाऱ्या तरुणाच्या नांदेडच्या पोलिसांनी तिथेच मुसक्या आवळल्या आहेत असे समजते अंकुश सावराटे असे या धमकीचा मेल करणाऱ्याचं नाव आहे.

पृथ्वीराज चव्हाणांना धमकी देणारा इसम नांदेडचा! कराड पोलीस नांदेडला रवाना ;

वेध माझा ऑनलाईन ।
कराड दक्षिण चे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवप्रतिष्ठान चे अध्यक्ष संभाजी भिडे याना महात्मा गांधीबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल अटक करा अशी मागणी केली होती त्यांनतर आ चव्हाण याना धमकीचा मेल आला होता या पार्शवभूमीवर चव्हाण यांना पोलिसांनी सुरक्षा दिली आहे
दरम्यान धमकी देणारा युवक नांदेड चा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून या युवकांच्या मुसक्या आवळण्यासाठी कराड पोलीस नांदेड ला रवाना झाले असल्याचे पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी सांगितले आहे

फडणवीसांनी संभाजी भिडेंना सुनावले ; स्वातंत्र्यवीर सावरकरबाबत अत्यंत गलिच्छ शब्दात राहुल गांधी बोलतात त्याचाही निषेध काँग्रेसनं करायला हवा ; काँग्रेसलाही दिला टोला ...

वेध माझा ऑनलाईन।  संभाजी भिडे गुरुजींनी जे वक्तव्ये केले त्याचा मी निषेध करतो. महात्मा गांधी देशाचे राष्ट्रपिता आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात महानायक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अशा महानायकाबाबत असं विधान करणे अत्यंत चुकीचे आहे. भिडे गुरुजी असो वा कुणीही अशी विधाने करू नये. याबाबत जी काही कारवाई आहे ती राज्य सरकार उचितपणे करेल असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोट्यवधी लोकं अशा विधानाने संतप्त होतात. लोकं महात्मा गांधीविरोधात असं बोलले कधीही सहन करणार नाहीत. महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर कुणाबद्दलही असो आम्ही बोललेले सहन करणार नाही. संभाजी भिडे यांचा भाजपाशी काहीही संबंध नाही. ते त्यांची संघटना चालवतात. त्यामुळे याला राजकीय रंग देण्याचं कारण नाही असं स्पष्ट शब्दात फडणवीसांनी सांगितले.

त्याचसोबत ज्यारितीने काँग्रेसचे लोक महात्मा गांधींविरोधात केलेल्या विधानावरून रस्त्यावर उतरतात तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबतही अत्यंत गलिच्छ राहुल गांधी बोलतात त्याचाही निषेध काँग्रेसनं करायला हवा. पण त्यावेळी ते मिंदे होतात. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत महात्मा गांधींचा अपमान सहन केला जाणार नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी भिडेंच्या विधानावर भाष्य केले आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांना ईमेल द्वारे धमकी ; कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल ;

वेध माझा ऑनलाईन। राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना ईमेल द्वारे धमकी देण्यात  आली आहे. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंद झाली आहे. 
दरम्यान, धमकीच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
राष्ट्रपित्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा माणूस बाहेर कसा फिरू शकतो?, असा सवाल करताना पृथ्वीराज चव्हाण संतप्त झाले होते. संभाजी भिडे या व्यक्तिला ताबडतोब अटक करा, अशी मागणी चव्हाण यांनी सभागृहात केली होती. चव्हाण यांच्या मागणीला काँग्रेसच्या इतर आमदारांनी पाठिंबा दिला आहे

Saturday, July 29, 2023

स्टार असलेली ५०० रुपयांची नोट खरी की खोटी? रिझर्व्ह बँकेनं दिलं चर्चांवर स्पष्टीकरण

वेध माझा ऑनलाईन। काही Tदिवसांपासून ५०० रुपयांच्या नोटेबाबत सोशल मीडियावर एक अफवा परसली. त्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी आता रिझर्व्ह बँकेलाही पुढे यावं लागलं. 'स्टार' चिन्ह (*) असलेल्या नोटच्या वैधतेबाबत सोशल मीडियावर व्यक्त केल्या जात असलेल्या सर्व शंका रिझर्व्ह बँकेनं फेटाळून लावल्या आहेत. जर तुम्हाला सीरिजच्या मध्यभागी स्टार असलेली अशी कोणतीही बँक नोट मिळाली असेल, तर ही नोट देखील इतर नोटांप्रमाणे वैध असल्याचं स्पष्टीकरण रिझर्व्ह बँकेनं दिलंय.

चुकीच्या पद्धतीनं छापलेल्या नोटांच्या जागी जारी केल्या जाणाऱ्या नोटेवरील नंबर पॅनेलमध्ये स्टार चिन्ह जोडण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलेय. हे स्टार चिन्ह पाहून काही लोकांनी त्याची तुलना ५०० रुपयांच्या नोटेशी केली आणि ती अवैध किंवा बनावट असल्याचं म्हटलं. यानंतर रिझर्व्ह बँकेनं याची दखल घेत ही माहिती दिलीये. सीरिअल नंबर असलेल्या नोटांच्या बंडलमध्ये चुकीच्या पद्धतीनं छापलेल्या नोटांऐवजी तारांकित चिन्ह असलेल्या नोटा दिल्या जातात. हा स्टार नोटेचा नंबर आणि त्यात असलेल्या अक्षरांच्या मध्ये असतो, असंही सांगण्यात आलंय.
रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं की स्टार चिन्ह असलेली बँक नोट ही इतर कायदेशीर नोटांप्रमाणेच आहे. त्यावरील स्टारचं चिन्ह फक्त हे दर्शवते की ते बदललेल्या किंवा पुन्हा प्रिन्ट केलेल्या नोटेच्या जागी जारी करण्यात आलेले आहे. नोटांची छपाई सुलभ करण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी स्टार नोटचा ट्रेंड २००६ मध्ये सुरू झाला होता. यापूर्वी रिझव्‍‌र्ह बँक चुकीच्या छापील नोटा बदलून त्याच क्रमांकाच्या योग्य नोटा देत असे.

संभाजी भिडे म्हणजे सोंगाड्या... महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींचा गंभीर आरोप ! ; हा तर नागपूरचा अजेंडा ; आर एस एस वर देखील केली टीका: ;


वेध माझा ऑनलाईन। संभाजी भिडेंनी राष्ट्रपिता महात्मा गाधींबाबत केलेल्या विधानावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. या विधानाचे आणि त्यावरून निर्माण झालेल्या वादाचे पडसाद राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनातही उमटल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, संभाजी भिडेंनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. संभाजी भिडे फक्त एक सोंगाड्या असून त्यांना दिलेली स्क्रिप्ट ते सादर करत असल्याचं तुषार गांधी म्हणाले आहेत.

काय म्हणाले संभाजी भिडे?
अमरावतीच्या बडनेरामध्ये झालेल्या कार्यक्रमात संभाजी भिडेंनी महात्मा गांधींच्या वडिलांविषयी वादग्रस्त विधान केलं. “मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले. त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले”, असं संभाजी भिडे म्हणाले.

 भिडे RSS च्या इशाऱ्यावर बोलतायत”
संभाजी भिडे हे आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावरच हे सगळं बोलत असल्याचा आरोप तुषार गांधी यांनी केला. “या विधानावर स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. कारण एका गलिच्छ, विकृत, हीन मानसिकतेच्या माणसानं केलेले हे आक्षेप आहेत. हे भिडे बोलत नाहीयेत. भिडे कुणाच्यातरी इशाऱ्यावर हे करत आहेत. गांधी हत्येपासून हा गांधीद्वेष प्रखर पद्धतीने नागपूरहून (आरएसएसकडून) केला जातो. हा नागपूरचा अजेंडा आहे हे सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. नागपूरच्याच इशाऱ्यावर गोडसेनी बापूंवर तीन गोळ्या झाडल्या होत्या”, असं तुषार गांधी म्हणाले.

“जेव्हा त्यांना समजलं की व्यक्तीची हत्या झाली पण विचार प्रखर झाले, तेव्हापासून नागपूरच्या, आरएसएसच्या इशाऱ्यावर गांधीद्वेषाची एक मोहीम चालवली जात आहे, हे विकृत आणि अश्लील विचारधारेचं उत्पादन आहे”, अशा शब्दांत तुषार गांधींनी आपला संताप व्यक्त केला आहे.

Friday, July 28, 2023

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त निराधार महिलांना खाऊ व भेटवस्तूंचे वाटप.


वेध माझा ऑनलाईन। 
राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कराड येथील शासकीय आशाकिरण महिला वसतिगृहातील निराधार महिलांना  
सौ.जयमाला बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते खाऊ व भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या आठ दिवसांपासून कराड तालुक्यातील व कराड उत्तर मतदारसंघातील विविध गावांमध्ये आरोग्य शिबीर, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, वृक्षारोपण असे समाजोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत, आज याच अनुषंगाने कराड येथील शासकीय आशाकिरण महिला  वसतिगृहातील निराधार महिलांना खाऊ व भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.

मा.सौ.जयमाला पाटील यांनी वसतिगृहातील प्रवेशितांची आस्थेवाईकपणे चौकशी केली, तसेच वसतिगृहामध्ये महिलांना पुरविण्यात येत असलेल्या सोयीसुविधांच्या बाबतची माहिती घेतली व कमतरता असलेल्या सोयी पूर्ण करण्याबाबत आश्वासित केले, तसेच शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये यासाठी या ठिकाणी राहत असलेल्या इच्छुक मुलींना पुढील वर्गामध्ये प्रवेश देऊन शिक्षणाचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले करण्यासाठीचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले, वस्तीगृहातील महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय स्टाफ उपलब्ध करून देण्यात येईल असेही यावेळी त्यांनी सांगून या निराधार माता-भगिनींच्या पाठीवरून मायेचा हात फिरविला या सर्व बाबींमुळे उपस्थित माता-भगिनींनी मा.सौ. जयमाला पाटील यांचे प्रती ऋण व्यक्त केले व आभार मानले.

याप्रसंगी सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन सौ.लक्ष्मीताई गायकवाड, कराड नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा ॲड.विद्यारणी साळुंखे, माजी नगरसेविका सौ.अनिता पवार, सौ.सुनंदा शिंदे, सौ.पल्लवी पवार, सौ.अरुणा जाधव, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका सौ.शारदाताई पाटील, आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब पाणी पुरवठा संस्थेच्या संचालिका सौ.सुशीला पाटील, सौ.आशा पाटील, कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ.सुरेखा डुबल, सौ.उज्वला पाटील, सौ.गुरव मॅडम, जयंत बेडेकर, अख्तर अंबेकरी मुसद्दीक अंबेकरी, वसतिगृहाचे अधीक्षक अविनाश म्हासुर्णेकर आदी.उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे कराड बसस्थानकाच्या सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा मार्गी :

वेध माझा ऑनलाईन। सातारा विभागातील कराड येथे पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्री काळात नव्याने बांधण्यात आलेल्या बसस्थानकामधील स्टील बेंचेसची मोडतोड झालेने सद्या प्रवाशांना बसण्याकरिता गैरसोय होत आहे हि बाब माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी शासनाच्या निदर्शनास  आणून देण्यासाठी व कराड बसस्थानक साठी निधी मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला तसेच लक्षवेधीच्या माध्यमातून विधानसभेत सूचना देखील मांडली. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले कि, स्टीलचे बेंचेस वेल्डिंग करून पुन्हा तुटण्याची शक्यता असल्याने त्याऐवजी त्याठिकाणी आरसीसी बेंचेस तयार केले जातील व हे काम तातडीने केले जाईल. तसेच बसस्थानकाच्या तळघरामधील पार्किंगमध्ये पाणी साठते सदरचे पाणी साठणार नाही याची दक्षता घेण्याचेसुद्धा आदेश दिले जातील. 

पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्री काळात विशेष निधीची तरतूद करून जवळपास रु. ११ कोटी इतका खर्च करून कराडकरांच्या सोयीसाठी नवीन बसस्थानक बांधले गेले कराड तालुक्यातील सर्वच नागरिकांना अत्यंत प्रशस्त व सुविधायुक्त बस स्थानक त्यांच्या महत्वपूर्ण निर्णयामुळे मिळाले. परंतु काही वर्षातच येथील स्टीलच्या खुर्च्यांची मोडतोड झाली. ज्यामुळे अनेक प्रवासी जखमी झाले हि बाब आ. चव्हाण यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शासनाकडून येथील बसस्थानक पुन्हा एकदा सुस्थितीत आणण्यासाठी व निधी मिळावा म्हणून प्रयत्न केले, तसेच अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडून शासनाचे लक्ष वेधले. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी बसस्थानकाच्या विकासाबद्दल ठोस निर्णय घेऊन आदेश दिले आहेत. 

Thursday, July 27, 2023

आ. बाळासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कृषिमंत्री मुंडेंना घेरले ; बाळासाहेब पाटील यांनी विचारलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारीच्या प्रश्नावर कृषिमंत्री मुंडेंनी सादर केली आकडेवारी ;


वेध माझा ऑनलाईन। 
राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. या विधिमंडळाच्या  पावसाळी अधिवेशनास १७ जुलै २०२३ पासून सुरूवात झाली आहे. अधिवेशनाच्या बुधवारी पार पडलेल्या कामकाजावेळी माजी सहकार व पणन मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना एका प्रश्नावरून घेरले. आ. बाळासाहेब पाटील यांनी विचारलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारीच्या प्रश्नावर कृषिमंत्री मुंडेंनी आकडेवारी सादर केली.

राज्याचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु असून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना अनेक प्रश्नांवरुन घेरले जात आहे. दरम्यान, काल पार पडलेल्या अधिवेशनात आमदार बाळासाहेब पाटील यांनी एक प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, राज्याच्या बहुतांशी भागामध्ये बऱ्यापैकी पाऊस पडला असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एक व्हाट्सअप्प नंबरची घोषणा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी गेल्या आठवड्यात केली होती. त्या नंबर वर आतापर्यंत किती शेतकऱ्यांकडून कोणकोणत्या तक्रारी आल्या आहेत?, असा प्रश्न आ. पाटील यांनी उपस्थित केला.

आ. बाळासाहेब पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर कृषिमंत्री धनंजय मुंडे  यांनी आकडेवारी सादर केली. कृषिमंत्री मुंडे म्हणाले की, अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात कृषी आढावावेळी एक व्हॉट्सअप नंबर सुरु केल्याची मी घोषणा केली.  शेतकऱ्यांच्या तक्रारीसाठी सुरु केलेल्या व्हॉट्सअप नंबर वर आतापर्यंत ३ हजारहून अधिक शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या आहेत. त्यामध्ये बियाणांच्या संदर्भात ३९२ तक्रारी, खताच्या संदर्भात २१० तक्रारी, खत लिंकींगच्या संदर्भात ३२ तक्रारी, कीटकनाशकाच्या संदर्भात ६१ तक्रारी तसेच  इतर २ हजार ७९६ अशा एकूण मिळून ३ हजार ४९१ तक्रारी आतापर्यंत आल्या आहेत. 

संबंधित शेतकऱ्यांकडून येत असलेल्या तक्रारीची दररोज दखल घेत त्यानं मॉनिटर करून त्या खालील विभागाकडे दिल्या जात आहेत. संबंधित विभागास सांगून तात्काळ त्याची चौकशी करण्याचे निर्देश आपण दिल्या असल्याचे कृषिमंत्री मुंडे यांनी सांगितले. 

भ्रष्टाचारी शिक्षणाधिकार्‍याची ई डी अंतर्गत कारवाई होणार ? माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन ;

वेध माझा ऑनलाईन।  राज्यातील शिक्षण विभागातील अधिकार्‍यांकडून गैरव्यवहार होत असल्याबाबत विधानसभेत प्रश्नोत्तरच्या वेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी शिक्षण विभागातील गंभीर भ्रष्टाचाराच्या घटना उपस्थित करीत सभागृहाचे लक्ष वेधले अशा भ्रष्टाचारी अधिकार्‍यांवर कारवाई केली जावी यासाठी आपल्या कायद्यात योग्य बदल केले जावेत तसेच भ्रष्टाचारी अधिकार्‍यांची ई डी अंतर्गत कारवाई केली जावी अशी मागणी केली. आ. चव्हाण यांच्या मागणीचा विचार करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्कीच कायद्यात योग्य ते बदल केले जातील तसेच उपस्थित केलेल्या नाशिकच्या भ्रष्ट शिक्षणाधिकार्‍यापासूनच ई डी अंतर्गत कारवाई करण्यासाठी शिफारस केली जाईल. असे आश्वासन दिले. 

नाशिक महापालिका शिक्षण अधिकारी सुनीता धनगर यांना ५० हजाराची तर लिपिकाला ५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले होते या घटनेची माहिती देताना शिक्षण विभागात अशा प्रकारचे विविध ठिकाणी होत असलेला भ्रष्टाचार अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत सभागृहाला दिली. याबाबत सबंधित भ्रष्ट अधिकार्‍यावर कोणतीही ठोस कारवाई न केल्याने सरकार हतबल असल्याचे चित्र समोर येत आहे. नाशिकच्या प्रकरणात राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी जे पत्र लिहले होते त्यामध्ये 72 भ्रष्ट अधिकार्‍यांपैकी 36 शिक्षणाधिकारी आहेत. या भ्रष्टाचारी  अधिकार्‍यांची चौकशी केली तरी त्यांना पुन्हा पदावर घ्यावे लागते असे निदर्शनास आणले. यामध्ये 2 प्रश्न माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केले. यामध्ये विधिमंडळाचा कायदा करून काही बदल करता येईल का? ज्यांच्या चौकश्या झाल्या त्यांनाच पुन्हा पदावर घ्यायचे हे काही योग्य होणार नाही. असे प्रकरण घडले असल्याचे सरकारने मान्य केले आहे. तरी अशा घटना घडत असताना यावर ठोस कारवाई न केल्याने संपूर्ण विधिमंडळाची हतबलता यामध्ये दिसून येते.  असा गंभीर प्रश्न यावेळी उपस्थित केला. तसेच नाशिक च्या केस मध्ये त्या शिक्षणाधिकार्‍याच्या घराची लाचलुचपत विभागाने झडती घेतली असताना 50 लाख रुपयांची रोकड 32 तोळे सोने, आणि एका बँक अकाऊंटवर 32 लाख रु तसेच काही आलीशान फ्लॅट अशी माहिती समोर आली. या घटनेची माहिती देत आ. चव्हाण यांनी  मागणी केली की, अशा भ्रष्टाचारी अधिकार्‍यांना कडक शासन करण्यासाठी आपल्या कायद्यात कडक तरतुदी कराव्यात तसेच या भ्रष्टाचारी अधिकार्‍यांची मनी लौंडरिंग अंतर्गत कारवाई केली जावी. 

आ. चव्हाण यांनी केलेली मागणी अत्यंत योग्य व गंभीर स्वरूपाची आहे असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत कायद्यात बदल करून त्याच व्यक्ति पुन्हा त्या ठिकाणी येणार नाहीत व कायद्याची पळवाट शोधून मिळते म्हणून त्या भ्रष्टाचारी लोकांनी त्या त्या ठिकाणी काम करणे योग्य नाही म्हणून त्या ठिकाणी त्यांना नियुक्त केले जाणार नाही तसेच ई डी अंतर्गत करवाईसाठी नाशिकच्या भ्रष्ट अधिकार्‍याचीच पहिली हीच केस ई डी कडे पाठवली जाईल असे आश्वासन सभागृहाला फडणवीस यांनी दिले

Wednesday, July 26, 2023

पंधरा दिवसांतच सावत्र भावासारखे का वागू लागलात?... बारामती म्हणजे महाराष्ट्र नव्हे, या शब्दात यशोमती ठाकूर यांनी अजितदादांना खडसावले ;

वेध माझा ऑनलाईन। विधान सभेत आज निधी वाटपावरून कॉंग्रेस आमदार तसेच माजी मंत्री यशोमती ठाकूर या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भिडल्या. पंधरा दिवसांतच सावत्र भावासारखे का वागू लागलात? असा भावनिक सवाल करत, बारामती म्हणजे महाराष्ट्र नव्हे, या शब्दात त्यांनी अजित पवार यांना खडसावले. यशोमती ठाकूर यांचा हा रुद्रावतार पाहून सभागृह अवाक झाले. महाविकास आघाडीत अजित पवार अर्थमंत्री असताना त्यांनी शिवसेना आमदारांना विकास निधी देताना आकडता हात घेतला, असा आरोप शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांनी केला होता, नव्हे तर अजित पवार यांना अर्थमंत्री करण्यात येणार असल्याची माहिती मिळताच हे आमदार आक्रमक झाले होते. त्यांची समजूत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काढावी लागल्याने मंत्र्यांचे खातेवाटप रखडले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता निधी वाटपात होत असलेल्या भेदभावाबाबत विरोधक काय भूमिका घेतात हे पहावे लागणार आहे.

उन्हाळी अधिवेशनात शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांना निधीवाटप करताना सरकारने भेदभाव केल्याचा आरोप होत आहे. हे प्रकरण न्यायालयात आहे. असे असताना आता पुन्हा निधी वाटपाबाबत वाद निर्माण झाला आहे आणि त्यात टार्गेट अजित पवार आहेत. अजित पवार हे अर्थमंत्री झाल्यावर अधिक निधी ते आपल्या आणि भाजपच्या आमदारांना देतील अशी अटकळ बांधली जात असताना बुधवारी विधान सभेत याच मुद्द्यावर आमदार यशोमती ठाकूर या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर चिडल्याचे निदर्शनास आले.

अजित पवार यांना मी भाऊ, मार्गदर्शक मानते. पण ते 15 दिवसात सावत्र भावासारखे वागत आहे. लहानपणापासून माझ्या मनात अजित पवार यांची वेगळी इमेज आहे. पण विकास निधी देताना त्यांनी केलेल्या भेदभाव मान्य नाही. अजित पवार यांनी त्यांच्या मतदार संघाला जास्त निधी दिला. बारामती म्हणजे महाराष्ट्र नव्हे, त्यात विदर्भ येतो. निधी वाटपात अमरावती विभागाला पैसा दिला नाही, असा आरोप ठाकूर यांनी केला. अजित दादांकडून असे अपेक्षित नाही, असेही त्यां म्हणाल्या 

पवार गटाला निवडणूक आयोगाची नोटीस; राष्ट्रवादी कोणाकडे राहणार?



वेध माझा ऑनलाईन। 
अजित पवारांच्या बंडाचा आता दुसरा अंक सुरु झाला आहे. विधानसभेत राष्ट्रवादीचे दोन प्रदेशाध्यक्ष एकमेकांच्या गळ्यात गळे घालतानाचे फोटो व्हायरल झाले होते. यानंतर शरद पवार गटातील आमदारांना अजित पवारांनी भरघोस निधी देखील दिल्याचे समोर आले होते. अशातच आता पुन्हा एकदा अजित पवार वि. शरद पवार असे राजकीय युद्ध सुरु होणार असल्याची चिन्हे आहेत. 

राष्ट्रवादीचे अध्यक्षपद, बहुतांश आमदार, पदाधिकारी आदी लोक आमच्यासोबत असून राष्ट्रवादी पक्ष आम्हाला देण्यात यावा अशी याचिका अजित पवार यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केली होती. या बंडानंतर शरद पवार गटानेही तातडीने हालचाली करत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. आता त्यावर म्हणणे मांडण्यासाठी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला नोटीस पाठविल्याचे समजते आहे. एका वृत्त वाहिनीच्या हवाल्याने ही महिती समोर आली आहे

अजित पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेवर ही नोटीस आली आहे. आम्हीच मुळ पक्ष असा दावा अजित पवारांनी केला होता. यावर आयोगाने उत्तर मागविले आहे. आता शिवसेनेसारख्याच सर्व घडामोडी पुन्हा एकदा राज्यात घडणार आहेत. 

राज ठाकरेंनी आजच राष्ट्रवादीचा एक गट सरकारमध्ये सामिल झाला आहे, थोड्या दिवसांनी दुसरा गटही सत्तेत सहभागी होईल अशी टीका केली होती. दुसरीकडे सुनिल तटकरे आणि जयंत पाटील या दोन्ही गटाच्या प्रदेशाध्यक्षांचे गळाभेटीचे फोटो आले होते. तिसरीकडे अजित पवार गटाने सलग तीन दिवस शरद पवारांची भेट घेतली होती. या साऱ्या घडामोडींनंतर आता शरद पवार गटाला म्हणणे मांडण्यासाठी नोटीस आली आहे. 


कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी विजय दर्डा व देवेंद्र दर्डा यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

वेध माझा ऑनलाईन। कोळसा खाण घोटाळा प्रकरणी दिल्ली सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलागा छत्तीसगडमधील कोळसा खाणीच्या वाटपाच्या अनियमिततेच्या प्रकरणात दोषी आढळले होते. त्यांच्यासोबतच माजी कोळसा सचिव एच सी गुप्ता, के एस क्रोफा, के सी सामरिया यांना तीन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा आज (दि.२६) रोजी न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली.

युपीए सरकारच्या काळात देशभर गाजलेल्या कोळसा खाणी घोटाळाप्रकरणी सीबीआयने तपास केला, यामध्ये माजी खासदार विजय दर्डा, देवेंद्र दर्डा, जेएलडी कंपनीचे संचालक मनोज जयस्वाल यांच्यासह ७ जणांना न्यायालयाने दोषी ठरवले होते. आज दर्डा पितापुत्रासह तीन सनदी अधिकाऱ्यांना न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दर्डा आणि इतरांना कलम 120 बी, 420 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली दोषी ठरवले आहे.

गैर मार्गाने कंत्राट मिळवल्याचा आरोप विजय दर्डा आणि इतर आरोपींवर होता. कोळसा घोटाळा प्रकरणात सीबीआयने सन २०१२ मध्ये क्लोजर रिपोर्ट दिला होता. मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला होता. दरम्यान गेली नऊ वर्षे आम्ही न्यायालयाचे हेलपाटे मारत असून आम्ही आधीच वेदना भोगत असल्याचे सांगत शिक्षेचा कालावधी कमी करण्याचा युक्तीवाद दर्डा यांच्या वकिलांनी न्यायालयात केला होता.
कोळसा खाण घोटाळा प्रकरणी दिल्ली सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलागा छत्तीसगडमधील कोळसा खाणीच्या वाटपाच्या अनियमिततेच्या प्रकरणात दोषी आढळले होते. त्यांच्यासोबतच माजी कोळसा सचिव एच सी गुप्ता, के एस क्रोफा, के सी सामरिया यांना तीन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा आज (दि.२६) रोजी न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली.

युपीए सरकारच्या काळात देशभर गाजलेल्या कोळसा खाणी घोटाळाप्रकरणी सीबीआयने तपास केला, यामध्ये माजी खासदार विजय दर्डा, देवेंद्र दर्डा, जेएलडी कंपनीचे संचालक मनोज जयस्वाल यांच्यासह ७ जणांना न्यायालयाने दोषी ठरवले होते. आज दर्डा पितापुत्रासह तीन सनदी अधिकाऱ्यांना न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दर्डा आणि इतरांना कलम 120 बी, 420 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली दोषी ठरवले आहे.

गैर मार्गाने कंत्राट मिळवल्याचा आरोप विजय दर्डा आणि इतर आरोपींवर होता. कोळसा घोटाळा प्रकरणात सीबीआयने सन २०१२ मध्ये क्लोजर रिपोर्ट दिला होता. मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला होता. दरम्यान गेली नऊ वर्षे आम्ही न्यायालयाचे हेलपाटे मारत असून आम्ही आधीच वेदना भोगत असल्याचे सांगत शिक्षेचा कालावधी कमी करण्याचा युक्तीवाद दर्डा यांच्या वकिलांनी न्यायालयात केला होता.

Tuesday, July 25, 2023

ज्यो मै बोलता हु... वो मै करता हु ... हेच दाखवून दिले कराडच्या मुख्याधिकारी खंदारे यांनी... काय आहे बातमी...?

वेध माझा ऑनलाईन। 
कराड नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांनी तीन महिन्यापासून वेतन न मिळाल्याने जलशुद्धी केंद्राच्या ऑफिसच्या बाहेरच मागील काही दिवसांपूर्वी काम बंद आंदोलन पुकारले होते तसेच तोडगा न निघाल्यास उपोषणाचा इशाराही दिला होता मात्र हे आंदोलन मुख्याधिकारी खंदारे यांच्या शब्दाला मान देत या कर्मचाऱ्यांनी मागे घेतले होते त्यावेळी खंदारे यांनी कर्मचाऱ्यांना थकीत पगाराची रक्कम देण्याबाबत आश्वासन दिले होते या पार्शवभूमीवर ठरल्याप्रमाणे थकीत पगाराचे दोन चेक मागच्या 20 तारखेला मुख्याधिकारी खंदारे यांनी  या कर्मचाऱ्यांना सुपूर्त केले आहेत तसेच पुढील पगार ठरल्या प्रमाणे देण्याचे आश्वासनही दिले आहे 

कराड नगरपरिषद जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांनी तीन महिन्यापासून वेतन न मिळाल्याने जलशुद्धी केंद्राच्या बाहेरच काम बंद आंदोलन पुकारले होते तसेच उपोषणाचा इशाराही दिला होता दरम्यान कराड पालिकेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे याना ही बाब समजली तेव्हा ते साताऱ्यात होते तातडीने ते साताऱ्याहून कराडला आले कर्मचारी जिथे काम बंद आंदोलन करत होते त्याठिकाणी जाऊन कर्मचाऱ्यांना ते भेटले त्यांनी आपल्या पालिकेतील ऑफिसमध्ये या कर्मचाऱ्यांना बोलावून घेत एक धनादेश त्याचवेळी या कर्मचाऱ्यांना सुपूर्त केला तसेच पुढच्या आठवड्यात उरलेल्या पगाराच्या रकमेच्या तरतुदींचे आश्वासनही दिले तसेच हे आंदोलन मागे घेण्यासाठी या कर्मचाऱ्यांना त्यांनी विंनती देखील केली होती कर्मचाऱ्यांनी देखील त्यांच्या शब्दाला मान देत आंदोलन मागे घेतले होते  दरम्यान त्यावेळी शब्द दिल्याप्रमाणे थकीत पगाराचे दोन चेक 20 तारखेला मुख्याधिकारी खंदारे यांनी  या कर्मचाऱ्यांना सुपूर्त केले आहेत तसेच पुढील पगार ठरल्या प्रमाणे देण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे या सर्व कर्मचाऱ्यानी देखील मुख्याधिकारी उपमुख्याधिकारी तसेच तेवरे आणि कुंभार यांचे आभार मानले आहेत

दरम्यान सी ओ खंदारे हे कराडमध्ये रुजू झाल्यानंतर त्यांच्यावर पहिलीच ही अशी वेळ आली होती की त्यांच्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच पालिका अंतर्गत कर्मचारी वर्गाच्या आंदोलनाला त्यांना तोंड द्यावे लागले असते मात्र त्यांनी एकूनच या सर्व प्रकाराला ज्या पद्धतीने हाताळले त्याचे कौतुक शहरात होताना दिसते आहे तर... दुसरीकडे... ज्यो मै बोलता हु...वो मै करता हु...अशी आपली कामाची पद्धत असल्याचेही त्यांनी यातून दाखवुन दिले आहे अशीही चर्चा आहे.


शिंदे सरकारचा सेवानिवृत्त पत्रकारांसाठी मोठा निर्णय; पेन्शनमध्ये होणार भरघोस वाढ


वेध माझा ऑनलाईन। ९ मे रोजी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेत निवृत्त पत्रकारांना दरमहा ११ हजार ऐवजी २० हजार रूपये निवृत्ती वेतन देण्याची घोषणा केली आहे. मात्र त्याचा शासन निर्णय अजून जारी करण्यात आला नसल्याची बाब विधान परिषद सदस्या प्रज्ञा सातव यांनी सभागृहात उपस्थित केली. यासंदर्भातील शासन निर्णय येत्या दोन दिवसांत जारी केला जाईल, अशी घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात केली.

विधान परिषदेत आज पत्रकारांच्या प्रश्नांसंदर्भात लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आली होती. त्यावर मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने विधान परिषद सदस्य यांना काही सूचना केल्या होत्या. त्यानुसार आज खालील निर्णय घेण्यात आले. बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेत निवृत्तीचे वय ५८ आणि २५ वर्षे अनुभव असा निर्णय करण्यात यावा अशी मागणी विधान परिषद सदस्य सुनिल शिंदे यांनी केली. त्यानुसार तातडीने निर्णय घेवून जाचक अटी कमी केल्या जातील असे आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात दिले. स्व.शंकरराव चव्हाण पत्रकार सुवर्णमहोत्सवी कल्याण निधी हा ट्रस्ट असून यामध्ये सध्या ५० कोटींची तरतूद आहे. ( मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या प्रयत्नामुळे हा निधी उपलब्ध झाला आहे.) या निधीमध्ये वाढ करण्यात येईल अशी घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे.

डिजिटल माध्यमांसाठी केंद्राचे जे निकष आहेत. ते तपासून त्या धर्तीवर डिजिटल माध्यमांसाठी धोरण आखले जाईल, अशी घोषणा ही मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात केली. पत्रकारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अभ्यास गट स्थापन करण्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे. तसेच पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी येत्या डिसेंबर पर्यंत धोरणात्मक निर्णय घेण्याचे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. पत्रकारांचे प्रश्न पोटतिडकीने उपस्थित करणाऱ्या सर्व विधान परिषद सदस्य, मंत्री शंभूराज देसाई आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्यावतीने अध्यक्ष प्रमोद डोईफोडे आणि प्रवीण पुरो यांनी दिली

कराड उत्तरमधील प्रत्येक जिल्हा परिषद गटात काँग्रेसची ताकद वाढविण्यावर भर - श्रीरंग चव्हाण ;

वेध माझा ऑनलाईन। कराड उत्तर विभाग हा कायमच काँग्रेस विचारांच्या पाठीशी राहिला आहे. काँग्रेसची विचारधारा जपणाऱ्या या मतदारसंघात प्रत्येक जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे संघटन वाढवून ताकद वाढविण्यावर भर देणार असल्याचे मत सातारा जिल्ह्याचे प्रभारी श्रीरंग चव्हाण यांनी यावेळी केले. सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे संघटन वाढावे तसेच प्रत्यक्ष भेटीतून संवाद वाढविण्यावर भर द्यावा या माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सूचनेनुसार जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्ह्याचे प्रभारी श्रीरंगनाना चव्हाण, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अल्पनाताई यादव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, कराड उत्तर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निवास थोरात तसेच सर्जेराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड उत्तर ब्लॉक चा दौरा करण्यात आला. यावेळी कोपर्डे हवेली, मसूर, उंब्रज, पाल, सैदापूर आदी जिल्हा परिषद गटामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या सोबत संवाद दौरा संपन्न झाला. 

यावेळी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव म्हणाले कि, काँग्रेस पक्ष हा विचारांचा पक्ष आहे. या पक्षाने आजपर्यंतच्या निवडणूका या विचारांनी लढल्या आहेत, आणि तीच शिकवण काँग्रेस कार्यकर्त्यांना मिळत गेली आहे. सत्ता असो किंवा नसो काँग्रेसचा विचार जपणारे करोडो लोक आजही काँग्रेसच्या पाठीशी ठाम आहेत. 

यावेळी कराड उत्तर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निवास थोरात म्हणाले कि, आपले नेते आदरणीय पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांनी काँग्रेसचे संघटन राज्यात तर केलेच पण जिल्ह्यात सुद्धा केले पण त्या त्या वेळच्या नेत्यांनी काँग्रेस पक्ष वाढीसाठी प्रयत्न न करता स्वतःच्या विकासावर अधिक भर दिल्याने जिल्ह्यात काँग्रेस मागे पडली पण आता स्वतः पृथ्वीराज बाबा जिल्ह्यातील काँग्रेस पुन्हा एकदा उभा करायला सरसावले आहेत आणि त्यांना आमच्यासारखे एकनिष्ठ कार्यकर्ते साथ दिल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेतून संपूर्ण देश जोडला असल्याने सर्वसामान्य जनता काँग्रेसशी जोडली आहे. काँग्रेसचं सामान्य नागरिकांचा विचार करते व त्यांच्या भाल्याचे निर्णय घेते म्हणूनच आपला भारत देश उभा राहिला विकसित झाला. 

या दौऱ्यादरम्यान बूथ कमिटी, मंडल कमिटी तयार करून ज्या जबाबदाऱ्या पक्षाकडून दिल्या जातील त्या नियोजनानुसार सर्वानी काम केले पाहिजे असा संदेश या दौऱ्यातून दिला गेला.

जयंत पाटील यांना 500 कोटी निधी मिळाला... हा बार फुसका ; सभागृहात जयंत पाटलांनी सांगितला खरा आकडा ;

वेध माझा ऑनलाईन। अर्थमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्याव्दारे अनेक आमदारांना निधी वाटप केल्यानंतर विरोधकांनी निधीच्या वाटपावरुन दोन्ही सभागृहात आवाज उठवला आहे. अशातच राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार जयंत पाटील यांना ५८० कोटी रुपये निधी देण्यात आल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्यानंतर जयंत पाटलांनी सभागृहासमोर हा आकडा खोटा असल्याची माहिती दिली आहे.

अजित पवार महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री असताना त्यांनी शिवसेना आमदारांना कमी निधी दिल्याचे सांगत शिवसेनेत बंड केले आणि भाजपसोबत सत्तास्थापन केली. त्यानंतर बरोबर एक वर्षांनी अजित पवारच या सरकारमध्ये सहभागी झाले असून त्यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अजित पवार या सरकारध्ये मंत्री झाल्यानंतर पुरवणी मागण्यांचे विधेयक त्यांनी सभागृहत मांडले आहे. या विधेयकात अनेक आमदारांना कोट्यवधींचा निधी दिला असून काही आमदारांना शुन्य रुपये निधी दिल्याचे काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात सांगितले होते. दरम्यान ज्या आमदारांना कोट्यवधी रुपयाचा निधी मिळाला आहे त्यांची नावे आणि मिळालेल्या निधीची आकडेवारी माध्यमांध्ये येऊ लागली. राष्ट्रवादीच्या पवार गटाच्या आमदारांना देखील मोठा निधी मिळाल्याची आकडेवारी यामध्ये माध्यमांनी दिली.

राष्टवादीचे आमदार जयंत पाटील यांना तब्बल 580 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचे वृत्त माध्यमांमध्ये आल्यानंतर जयंत पाटील यांनी याबाबत सभागृहात माहिती दिली. जयंत पाटील यांनी सांगितले की, मला 580 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचे वृत्त मी वाचले. मात्र मला इतका निधी मिळालेला नाही. आणि तेवढा निधी मिळावा म्हणून मी कोणाला पत्र देखील दिलेले नाही. तसेच या निधीचे जे आकडे आहेत ते खरे आहेत असे मला वाटत नाही असे देखील ते म्हणाले

जयंत पाटील म्हणाले, एवढा निधी माझ्या मतदारसंघाला मिळालेला नाही. मला 20 ते 22 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याची माहिती जयंत पाटील यांनी सभागृहात दिली. ते म्हणाले, मी व्हाईट बूक तपासले तेव्हा त्यात मला इतक्या मोठ्या रकमेचा निधी मिळाल्याचे दिसले नाही. त्यामुळे कोणाचा गैरसमज होऊ नये. असे सांगत आपल्याला 20 ते 22 कोटींचा निधी मिळाल्याचे जयंत पाटील यांनी सभागृहात सांगितले.

Monday, July 24, 2023

जयंत पाटलांची तटकरेंना मिठी ; दोघांची भेट कॅमेरात कैद; जयंत पाटील म्हणतात मी पवारांबरोबर ठाम ; एक गट सत्तेत, दुसरा विरोधात ; राष्ट्रवादीत नेमकं चाललय काय? राज्यात चर्चेला उधाण ;

वेध माझा ऑनलाईन। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या काय सुरुय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतोय. कारण एकाच पक्षाचे दोन गट सत्तेत आणि विरोधात सहभागी होतात. विशेष म्हणजे दोन्ही गटाचे दोन मोठे नेते विधान भवनात एकमेकांना भेटतात. ते एकमेकांशी अतिशय मनमोकळेपणाने आणि हसत-खेळत गप्पा मारतात. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. खरं नेमकं काय आहे? तेच कळायला मार्ग नाही, अशी चर्चा आता सध्या सर्वत्र सुरु आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे आणि विरोधी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज भेट झाली. विधान भवनाच्या कॉरिडॉरमध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी गळाभेट घेतली. तसेच दोन्ही नेत्यांमध्ये छान गप्पाही रंगताना दिसल्या. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांची भेट आणि त्यांचे गप्पा मारत असतानाचे क्षण कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाले आहेत. एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले हे दोन्ही नेते अतिशय मित्रासारखे हसत चर्चा करत होते. त्यांच्याकडे पाहून ते एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत, असं वाटणार देखील नाही, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान, या भेटीवर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. या भेटीचा कुणीही राजकीय अर्थ काढू नये, असं जयंत पाटील यांनी सांगितलंय. मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत मी ठामपणे उभा आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.
दरम्यान जयंत पाटील यांना सत्तेत घेऊन मंत्रिपद देण्याची भाजपाची तयारी असल्याचे समजते
या सर्व विषयावर जयंत पाटील यांनी महत्वाची विधाने केली आहेत

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत ठाम आहे. पवार साहेब सांगतील तीच आमची दिशा आहे असे त्यांनी स्पष्ट केले. आता अजित पवारांसोबत गेलेले ६ आमदार हे माझ्या सोबत लॉबीत बसलेले होते. ३ आमदारांनी माझ्या सोबत जेवण केले. याचा अर्थ काही वेगळा होत नाही. त्यामुळे कोणीही गैरसमज निर्माण करु नका," असेही पाटील यांनी सांगितले. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहतील ,याची कल्पना अजित पवारांनाही आहे ; फडणवीसांनी केलं स्पष्ट ; पृथ्वीराज चव्हाण पतंगबाजी करतात ; लगावला टोला;

वेध माझा ऑनलाईन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. आगामी काळात अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होतील, असे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले. यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण देत विरोधकांना टोला लगावला. 

कुठल्याही पक्षातील लोकांना वाटते की, आपल्या पक्षातील नेता मुख्यमंत्री व्हावा यात वावगे काही नाही. राष्ट्रवादीतल्यांना वाटू शकते की अजितदादा झाले पाहिजेत. आमच्या पक्षातील लोकांनाही वाटू शकते की भाजपाचा मुख्यमंत्री व्हायला हवा. शिवसेनेचे मुख्यमंत्री आज आहेत. मात्र, मी आज अधिकृतपणे महायुतीतील सर्वात मोठ्या पक्षाचा नेता म्हणून सांगतो की, महायुतीचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेंच राहणार आहेत. यामध्ये कोणताही बदल होणार नाही. याबद्दल अजित पवार आणि मला चांगली कल्पना आहे, त्यामुळे मुख्यमंत्री बदलाची कोणती चर्चा देखील नाही आणि जे महायुतीतील लोक असं बोलत आहेत त्यांनी संभ्रम करणं टाळावं, असे फडणवीसांनी सांगितले दरम्यान पृथ्वीराज चव्हाण जे काही बोलले आहेत, अशा प्रकारची पतंगबाजी अनेकजण करत आहेत असा टोलाही त्यांनी लगावला 

ते म्हणाले, त्यांनी कितीही भविष्यवाणी सांगून संभ्रम निर्माण केला तरी १०, ११ तारखेला आणि ९ तारखेला देखील काहीही होणार नाही. झाला तर विस्तारच होईल आणि तो विस्तार मुख्यमंत्री ठरवतील तेव्हा होईल. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच राहतील, अशा शब्दांत फडणवीसांनी मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. ते माध्यमांशी बोलत होते. 
 
"महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि तेच राहतील"
तिन्ही पक्षातील वाद टाळण्यासाठी समन्वय समिती वाचाळविरांची कानघडणी करणार का असा प्रश्न विचारला असता त्यांनी म्हटले, "मला वाटते की, माझे हे वक्तव्य म्हणजे समजणाऱ्याला इशारा पुरेसा आहे. सर्वच जण समजूतदार असून त्यांना इशारा मिळाला आहे. कोणाला असे वाटावे यात गैर काही नाही. पण बोलताना प्रत्येकाने वास्तवाचं भान ठेवलं पाहिजे आणि वास्तव हे आहे की, महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि तेच राहतील."

10 ऑगस्टपर्यंत शिंदेंच्या पक्षांतराचा फैसला, त्यानंतर अजित पवार CM; पृथ्वीराज चव्हाणांनी फोडला राजकीय बॉम्ब ;

वेध माझा ऑनलाईन। येत्या 10 ऑगस्टपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकारी आमदारांच्या पक्षांतराचा निर्णय होईल. त्यानंतर अजित पवार राज्याचे नवे मुख्यमंत्री होतील, असा दावा काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे सत्ताधारी गोटासह राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.

पृथ्वीराज चव्हाण पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, आगामी लोकसभेच्या निवडणुकांचा विचार केल्यास भाजप एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढणार नाही. कारण ठाण्याबाहेर त्यांचा फारसा प्रभाव दिसत नाही. आता भाजपकडे अजित पवारांचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री केले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यानुसार येत्या 10 ऑगस्टपर्यंत शिंदे यांच्या पक्षांतराचा निर्णय होईल. त्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, भाजप पक्षश्रेष्ठींनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काही आकलन केले आहे. त्यात अजित पवार यांना मुख्यमंत्री केले जाईल. विशेष म्हणजे वापरा व फेकून द्या ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची पद्धत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनाही काम झाल्यानंतर बाजूला फेकले जाईल.

पक्षांतरासाठी आर्थिक प्रलोभने दिली गेली का?

निधी वाटपाच्या मुद्यावरून अजित पवार पुन्हा एकदा विरोधकांच्या रडारवर आले आहेत. याविषयी पृथ्वीराज चव्हाण यांना छेडले असता, ते म्हणाले की, शिवसेना व राष्ट्रवादीत पक्षांतर झाले. त्यात काही मोठे आकडे समोर आले. काही रोखीचे विषय झाले. पक्षांतर केलेल्या आमदारांना 25 ते 50 कोटी अगदी 150 कोटींचा निधी देण्यात आला. ही आश्वासन पूर्ती आहे का? पक्षांतर करण्यासाठी आर्थिक प्रलोभने दिली गेली का? राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांना झुकत माप दिले गेले का? हे आताच सांगता येत नाही.

चव्हाणांची भाकिते ठरली खरी

गत काही दिवसांपासून पृथ्वीराज चव्हाण यांनी राजकारणाविषयी व्यक्त केलेले अनेक अंदाज खरे ठरलेत. त्यातच त्यांनी आता अजित पवार मुख्यमंत्री होतील, असा दावा केल्यामुळे एकनाथ शिंदे यांची सुट्टी होणार का? अशी चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्र्यांकडून वाढलेल्या दिल्ली वाऱ्यांमुळेही या चर्चेत अधिकची भर पडत आहे.

कोयना धरणाच्या विद्युतगृहातून होणार 1050 क्युसेक्स विसर्ग ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा ;

वेध माझा ऑनलाईन। कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत आहे.  धरणामध्ये आवक वाढली आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहातून आज दि. 24 जुलै रोजी दुपारी 4:00 वा.1050 क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात येणार आहे.
तरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून ग्रामस्थांनी नदी पात्रात जावू नये. तसेच त्यांनी जनावरे नदी पात्रात जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासना मार्फत करण्यात आले आहे.

बाळासाहेब नेमके कोणत्या राष्ट्रवादीत आहेत ? त्यांचे दोन्ही डगरीवर हात? भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांचा सवाल ;


वेध माझा ऑनलाईन। आमदार बाळासाहेब हे नक्की कोणत्या राष्ट्रवादी मध्ये आहेत हे त्यांनी स्पष्ट करावे त्यांचे दोन्ही डगरीवर हात असल्याचे दिसत आहे विरोधात असेल तर निधीं मिळत नाही मग ते राष्ट्रवादीच्या कोणत्या डगरीबरोबर आहेत हे त्यांनी स्पष्ट करावे मग आम्ही पुढचं ठरवू असे सातारा जिल्ह्याचे भाजप चे नूतन अध्यक्ष धैर्यशील कदम यांनी आज विधान केले

कराड येथील सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते
मनोज घोरपडे, विक्रम पावसकर, रामकृष्ण वेताळ एकनाथ बागडी तसेच शहर व परिसरातील अनेक पदाधिकारी महिला यावेळी उपस्थित होत्या

ते पुढे म्हणाले 
 आम्ही निवडनूकीपूरत बाहेर पडतो अशी टीका करणाऱ्यांना आम्ही दिसत नाही त्याला आमचा काय दोष?असा सवाल करून मी आणलेल्या 150 कोटी निधींबाबत जनतेला पूर्णपणे माहीत आहे उलट लोकच मला म्हणतात तुम्ही आणलेला निधीचे विरोधक श्रेय घेत आहेत त्यामुळे जनता ठरवेल कोणी किती निधी आणला ते...सरकार आमचे आहे... विरोधकांना निधी मिळत नाही...मग जर निधी बाळासाहेबांनी आणला तर मग त्यांनी  जाहीर करावे की ते नेमकं कोणत्या राष्ट्रवादी मध्ये आहेत असेही ते म्हणाले ...

दरम्यान त्यांनी यावेळी आपण जिल्ह्यात भाजप च्या माध्यमातून गावोगावी वातावरण तयार करून संपूर्ण जिल्हा भाजपमय करणार असल्याचे विधान केले कराड उत्तर मध्ये यावेळी भाजप चाच उमेदवार निवडून येणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला 
बाजार समितीतील निवडणुकीत काँग्रेसबाबतची आमची स्थानिक युती ही त्यावेळेपुरती होती ती निवडणूक संपली तेव्हाच ती युतीही संपली असही त्यांनी यावेळी स्पष्ट केले

Sunday, July 23, 2023

"कराड उत्तर 'साठी 27 कोटी 32 लाखाचा निधी मंजुर ; आ बाळासाहेब पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती ;

वेध माझा ऑनलाईन। 
कराड उत्तर मतदार संघाकरिता अर्थसंकल्प 2023 मधून रस्त्याचे कामासाठी 26 कोटी 16 लाख तर  जिल्हा वार्षिक योजनांमधून  बंधाऱ्यासाठी रुपये 1 कोटी 17 लाख रुपये असा एकूण 27 कोटी 32 लाखाचा निधी मंजूर झाल्याची माहिती राज्याचे माजी सहकार, पणन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आ बाळासाहेब पाटील यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली

मंजूर कामाचा तपशील पुढीलप्रमाणे...
१).खंडाळा-कोरेगांव-कराड-सांगली-शिरोळ रस्ता रा.मा. १४२ कि.मी. ९१/७०० ते ९४/०० (भाग-मसूर ते शहापूर फाटा) रस्त्याचे चौपदरीकरणासह सुधारणा करणे २ कोटी २० लाख. 
२).सासपडे-निसराळे-तारगांव-वाठार-आवी नागझरी रस्ता प्रजिमा ३५ कि.मी. २२/५०० ते २५/०० (भाग-वाठार ते इंगळे वस्ती) चे रूंदीकरण व सुधारणा करणे ता. कोरेगांव ३ कोटी 
३).खंडाळा-कोरेगांव- रहिमतपूर-कराड-सांगली-शिरोळ रस्ता रा.मा. १४२ कि.मी. ७१/०० ते ७३/५०० (भाग-बोरगांव ते किरोली) रस्त्याचे रूंदीकरण व सुधारणा करणे ता कोरेगांव ३ कोटी. 
४).प्रजिमा-५७ ते शिरगाव-पेरले-खराडे-हेळगांव-पाड ळी-रहिमतपूर रस्ता प्रजिमा-३९ कि.मी.५/०० ते ७/७०० (भाग-रा.म.४ ते पेरले ते कृष्णा नदी पुलापर्यंत) रस्त्याचे मजबुतीकरण व सुधारणा करणे २ कोटी ५० लाख.

५).सासपडे-निसराळे-तारगांव-वाठार- आर्वी-नागझरी रस्ता प्रजिमा ३५ कि.मी.१६/०० ते १७/५०० (भाग-तारगांव पूल ते तारगांव रेल्वे स्टेशन) चे रूंदीकरण व सुधारणा करणे ता. कोरेगांव २कोटी, 
६).रामा.१२४ ते लाडेगांव- वांझोळी-भूषणगड- शेनवडी-म्हासुर्णे ते रामा. १४३ रस्ता प्रजिमा १०२ कि.मी.३/५०० ते ६/०० (भाग-लाडेगांव ते वांझोळी) रस्त्याचे रूंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता. खटाव.२ कोटी ५० लाख.
७). मांडवे पाडळी नागठाणे बोरगांव-अपशिंगे-नांदगांव प्रजिमा ३२ कि.मी. ११/०० ते १३/०५० (भाग -बोरगाव ते वाघ वस्ती) ची सुधारणा करणे १ कोटी ३० लाख). 
८) पाटण मणदुरे-पाल काशीळ रस्ता रा.मा. ३९८ कि.मी. ३८/०५० ३८/१०० मधील मोठ्या उंच जीर्ण पुलाची पुनर्बांधणी करणे २ कोटी.
 ९). रा.मा. १४३ ते अंतवडी रस्ता ग्रा.मा. ६९ सुधारणा करणे ३० लाख.
१०) यशवंत नगर गाडी तळ ते मसूर-शिरवडे रस्ता ग्रा.मा. ७३ सुधारणा करणे ३० लाख.
११). शामगाव ते वांग रेटरे ते पाचुंद रस्ता ग्रा.मा.६७ (भाग-वांग रेठरे ते पाचूद) सुधारणा करणे २० लाख.
१२) तासवडे ते वराडे रस्ता ग्रा.मा.७७ सुधारणा करणे ३० लाख.
 १३.सयापुर जोडरस्ता ग्रा.मा. १२६ सुधारणा करणे.
१४. करवडी ते आरफळ कॉलनी रस्ता ग्रा. मा. ११६ सुधारणा करणे ३० लाख.
१५). रा.मा.१३६ ते विरवडे-करवडी रस्ता प्रा.मा. १९८ (भाग-गणपती एम.एस.ई.बी. चौक) सुधारणा करणे ता. कराड ५१ लाख. 
१६) पाल ते खंडाईत खाली ते अतित रस्ता प्रा.मा.३ सुधारणा करणे ता. कराड ३० लाख. १७) धारवाडी से पाल रस्ता ग्रा.मा. ४ सुधारणा करणे ता. कराड २५ लाख 
१८).प्रजिमा ६० ते चोरजवाडी-मस्करवाडी ते साखरवाडी रस्ता ग्रा.मा.८ सुधारणा करणे ३० लाख.
१९).किवळ ते घोलपवाडी रस्ता ग्रा.मा.२९ सुधारणा करणे ता. कराड ३० लाख.
२०).पाडळी ते गायकवाडवाडी रस्ता ग्रा.मा. २८ सुधारणा करणे ता. कराड ३० लाख.
२१).रा.म.४ ते कोटी ते जुने गावठाण रस्ता ग्रा.मा.३८ सुधारणा करणे ता. कराड २५ लाख.
२२). साखरवाडी ते जंगलवाडी रस्ता ग्रा.मा. ४७ सुधारणा करणे ता. कराड३० लाख.
२३) अपशिंगे ते नवलेवाडी रस्ता ग्रा.मा. १३६ सुधारणा करणे ता. कोरेगांव ३० लाख, २४).रा.मा. १४२ ते बोरबन रस्ता ग्रा.मा. १३९ सुधारणा करणे ता.कोरेगांव.२०लाख.
२५).रा.मा. १४० ते साप वेळू जोडरस्ता ग्रा.मा. १५४ सुधारणा करणे ता.कोरेगांव. २० लाख, २६).रा.मा. १४२ ते टकले अॅप्रोच रस्ता ग्रा.मा. १६६ सुधारणा करणे ता.कोरेगांव २० लाख.
२७). तारगांव ते टकले रस्ता ग्रा.मा. १७७ सुधारणा करणे ता.कोरेगांव.२० लाख, 
२८) आर्वी-पिंपरी-सुली-बोरगांव रस्ता इजिमा.८८ (भाग-पिंपरी ते सुली) ची सुधारणा करणे २० लाख, 
२९).कालगांव-खराडे-कवठे-कोणेगा व रस्ता प्रजिमा-८३ कि.मी.१०/७०० ते १३/७०० (भाग- मसूर रेल्वे स्टेशन ते कोणेगांव) चे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे ता. कराड २ कोटी

आ. बाळासाहेब पाटील यांचे प्रयत्नाने कराड-उत्तर मधील सि.काँ. बंधाऱ्यांसाठी रक्कम रूपये १ कोटी १७ लाख मंजूर..

आ. बाळासाहेब पाटील यांचे विशेष प्रयत्नाने जिल्हा वार्षीक योजना सन २०२२-२३ मधून मृद व जलसंधारण विभागाकडील सि.काँ. बंधारा बांधणे या योजनेमधून खालील गावांमधील कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून सदरची कामे निविदास्थरावर आहेत. या बंधाऱ्यांच्या कामांमुळे संबंधीत गावांमधील शेती सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्याच्या योजनांना  लाभ होणार आहे.
यामध्ये...१).किवळ ता. कराड येथे सिमेंट काँक्रीट बंधारा बांधणे. ४३ लाख२२ हजार, २).मांडवे ता.जि.सातारा येथे सिमेंट कॉंक्रीट बंधारा बांधणे. ३६ लाख ९५ हजार, 
३).पाडळी ता.जि.सातारा येथील (भटीचा ओढा) येथे सिमेंट काँक्रीट बंधारा बांधणे ३६ लाख.४८ हजार. या कामाचा समावेश आहे

सातारा जिल्ह्यात सरासरी 19.5 मि.मी. पाऊस

वेध माझा ऑनलाईन। सातारा जिल्ह्यात सरासरी 19.5 मि.मी. पावसाची नोंद झाली असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 285.0 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस एकूण सरासरीच्या 32.5 टक्के इतका आहे. 
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. सर्व आकडे मि.मी.मध्ये असून कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे आहेत....... 
सातारा –16.9 (285.7), जावली-मेढा – 24.5(517.4), 
पाटण –64.1(554.5), कराड –21.7 (146.2), कोरेगाव –4.8 (127.5), खटाव – वडूज –2.7(101.8), माण – दहिवडी –0.0(91.0), फलटण –0.0 (67.1), खंडाळा –1.0 (94.7),वाई -9.4 (210.9), महाबळेश्वर –74.3 (1563.1) या प्रमाणे पाऊस झाला आहे

मणिपूरमध्ये दोन महिलांची धिंड काढल्याच्या पीडित महिलांमधील एक महिला कारगिल युद्धात सहभाग घेतलेल्या माजी सैनिकाची पत्नी ;

वेध माझा ऑनलाईन। मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढल्याचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अशातच या पीडित महिलांमधील एक महिला कारगिल युद्धात सहभाग घेतलेल्या माजी सैनिकाच्या पत्नीचा असल्याचे समोर आले आहे. मणिपूरच्या या घटनेने देशभरात खळबळ उडाली असून अनेकांनी या घटनेचा निषेध केला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. पीडित महिलेने त्यांच्याशी बोलताना सांगितले की, आम्हा दोघी महिलांना हजारो पुरुषांच्यासमोर बंदूकीच्या धाकाने अंगावरील कपडे काढले नाहीत तर जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी आम्हाला त्रास दिला आमची धिंड काढली असे देखील त्यांनी सांगितले.

चुराचंदपूर येथील एका मदत शिबिरात आसरा घेतलेल्या माजी सैनिकाने (वय ६५) सांगितले की सांगितले की, माझ्या पत्नीला या घटनेचा मोठा धक्का बसला होता. मात्र आमच्या मुलांकडे पाहून त्यांच्यासाठी ती पुन्हा जगण्यासाठी बळ एकवटू पाहत आहे. ते म्हणाले 3 आणि 4 मे रोजी हजारोंच्या संख्येने लोकांच्या झुंडीने गावावर हल्ला केला. घरे, एक चर्च आणि अनेक पाळीव जनावरे त्यांनी मारुन टाकली. तो जमाव 4 मे रोजी आमच्या गावात आला आणि घरे जाळणे सुरु केले. त्या भीतीने अनेक लोक जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळत सुटले. माझ्या पत्नीची आणि माझी चुकामुक झाली. त्यावेळी ती आणि गावातील चौघेजण जंगलातील एका झाडाच्या पाठीमागे लपून बसले. काही हल्लेखोर आमच्या पाळीव जनावरांचा (डुक्कर, बकऱ्या, कोंबड्या)चा पाठलाग करत असताना जंगलात घुसले. यावेळी जंगलात लपलेल्या माझ्या पत्नीला आणि चार जणांना त्यांनी पाहिले आणि पकडले.
पीडित महिलेच्या पतीने सांगितले की, माझी पत्नी आणि आणि दुसरी एक महिला तसेच तिचे एक लेकरु, आणि दुसऱ्या एका कुटुंबातील तिघे (वडील, मुलगा आणि मुलगी) होते. त्यांना जेव्हा बाहेर आणले तेव्हा पोलिसांचे एक वाहन तेथे दिसले ते काही प्रयत्न करणार पण जमावाने पोलिसांना न जूमानता त्यांनी माझ्या पत्नीला आणि इतर चौघांना वाहनातून बाहेर ओढले.
त्यानंतर तीन महिलांना कपडे काढण्यास सांगितले. एका महिलेच्या काखेत लहान मुल होते. तीला जमावातील काही लोकांनी जाण्यास सांगितले. तर जमावातील काही जण दुसऱ्या तरुणीसोबत छेडछाड करत होते. त्यावेळी तीच्या वडिलांनी आणि भावाने त्याला विरोध केला तेव्हा त्यांना मारुन टाकण्यात आले.
एफआयआरमध्ये नमुद केल्याप्रमाणे, नंतर जमावाने त्या तरुणीवर सामुहिक बलात्कार केला. पोलिसांनी सांगितले की, सामुहिक बलात्काराबाबत ठोसपणे सांगितले जावू शकत नाही, कारण ती तरुणी सापडलेली नाही. पिडीत महिलेचा पती माजी सैनिकाने सांगितले की, नंतर तीचा प्रियकर तीला सोबत घेऊन गेला. जवळपास दोन ते तीन तास तीच्यासोबत दृष्कृत्य करण्यात आले.

समृद्धी महामार्गावर अमित ठाकरे यांची कार टोलनाक्यावर अडवली ; मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाका फोडला ;

वेध माझा ऑनलाईन। 
मनसे नेते आणि मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित राज ठाकरे सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात अमित ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे. यावेळी नाशिकला असताना सिन्नर जवळ समृद्धी महामार्गावर अमित ठाकरे यांची कार टोलनाका कर्मचाऱ्यांनी अडवली. त्यानंतर संतापलेल्या कार्यकर्त्यांनी टोलनाका फोडला आहे. अमित ठाकरे या महामार्गावरून गेल्यानंतर हा प्रकार घडला.

मागील ३ दिवसांपासून अमित ठाकरे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. नंदूरबार, धुळे, जळगाव याठिकाणी त्यांनी मेळावे घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अमित ठाकरेंचा ताफा मुंबईच्या दिशेने जात होता. यावेळी सिन्नरजवळील समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर अमित ठाकरेंची कार अडवण्यात आली. काही काळ अमित ठाकरेंना तिथे उभेदेखील राहावे लागले. फास्टटॅगच्या तांत्रिक बिघाडामुळे विलंब झाल्याची माहिती आहे. मात्र त्यानंतर अमित ठाकरे तिथून निघून गेले. पण मनसे नाशिक शहराध्यक्ष दिलीप दातार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रागाच्या भावनेतून या टोलनाक्याची तोडफोड केली.

२-३ वाहनांमधून मनसे कार्यकर्ते टोलनाक्याला दाखल झाले होते. त्यांनी टोलनाक्याच्या केबिनमधील काचा फोडल्या आणि त्याठिकाणाहून निघून गेले. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अद्याप या घटनेत कुणीही तक्रार केली नाही. परंतु पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

गेल्या चार वर्षात राज्यातील १६ जिल्ह्यात ३७ हजार हुन अधिक बालकांचा कुपोषणाने मृत्यू ; राज्याच्या महिला व बालविकास विभागाने दिली माहिती

वेध माझा ऑनलाईन। महाराष्ट्र हे पुरोगामी आणि विकसित राज्य असल्याचा डंका वाजवला जात असताना, राज्यात कुपोषणाचा राक्षस अक्राळविक्राळ रूप घेत चालला आहे. गेल्या चार वर्षात राज्यातील १६ जिल्ह्यात ३७ हजार २९२ बालकांचा कुपोषणाने मृत्यू झाला आहे. अशी माहिती दस्तुरखुद्द महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी तारांकित प्रश्नोत्तरे दरम्यान दिली. याबाबतचा प्रश्न आमदार विलास पोतनीस, मनीषा कायंदे आदींनी उपस्थित केला होता.

राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यात २०१९ ते २०२२ या काळात कुपोषणाने ६ हजार ५८२ बालकांचा मृत्यू झाला असून, १ लाख ३६ हजार ७३३ मुलांमध्ये तीव्र आणि अतितीव्र कुपोषा अधलून आले असून त्यापैकी १५ हजार २५३ मातांचे बालविवाह झाले असल्याची व २०२२ – २३ च्या अहवालानुसार केवळ नंदुरबार जिल्ह्यात सुमारे २४००० बालके कुपोषित असल्याची बाब निदर्शनास आली हे खरे आहे का, असा सवाल पोतनीस यांनी केला होता. त्याला उत्तर देताना तटकरे यांनी ही माहिती दिली.

आरोग्य विभागाकडून ६ जुलै २०२३ रोजी प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार राज्यातील आदिवासी बहुल १६ जिल्ह्यांची २०१९ ते २०२३ या चार वर्षाची माहिती महिला व बालविकास विभागाने दिली आहे. त्यानुसार २०१९ – २० मध्ये ९८१९, २०२०- २१ मध्ये ८९९०, २०२१ – २२ मध्ये ९०२४ तर २०२२ – २३ मध्ये ९४५९ अशा एकूण ३७ हजार २९२ बालकांचा कुपोषणाने मृत्यू झाल्याची माहिती महिला व बालविकास विभागाने दिली आहे.

आदिवासी जिल्ह्यातील जी बालके आढळून आली आहेत, त्यांच्या मातांच्या विवाहा संबंधी त्या त्या जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांमार्फत एप्रिल २०२२ मध्ये सर्वेक्षण करून घेण्यात आलेले आहे. या सर्वेक्षणात १५ हजार २५३ बाल विवाह झाल्याचे आढळून आले आहे. मार्च २०२३ मधील मासिक प्रगती अहवालानुसार कोकणातील( मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांत) ११ हजार ५२८ बालके कुपोषित असल्याची माहिती या विभागाने दिली आहे.

Saturday, July 22, 2023

ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कराड दक्षिणमध्ये २५,००० वह्यांचे वाटप , डॉ. अतुल भोसले यांचा पुढाकार; आरोग्य शिबीरांचेही आयोजन

वेध माझा ऑनलाईन। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सेवा कार्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या पुढाकाराने भाजपा कराड दक्षिणच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांना सुमारे २५,००० वह्यांचे वाटप करण्यात आले. 

इर्शाळवाडी येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कार्यकर्त्यांनी हा दिवस सेवा कार्य दिन म्हणून साजरा करुन लोकोपयोगी उपक्रम राबवावेत, असे आवाहन भाजपाच्यावतीने करण्यात आले होते. त्यानुसार भाजपा कराड दक्षिणच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी वह्यावाटप उपक्रम राबविण्यात आला. कराड नगरपरिदेच्या शाळा क्रमांक ३ मध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी कराड नगरपरिदेच्या शाळा क्रमांक ३ सह ११, २ व शाळा क्र. ४ मधील विद्यार्थ्यांना प्रातनिधीक स्वरुपात वह्यावाटप करण्यात आले.

याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, माजी नगरसेवक सुहास जगताप, प्रमोद शिंदे, रमेश मोहिते, प्रशांत कुलकर्णी, विष्णू फुटाणे, सौ. स्वाती पिसाळ, मंजिरी कुलकर्णी, उमेश शिंदे, अभिषेक भोसले, विशाल कुलकर्णी, शैलन्द्र बोंडकर, विनायक घेवदे, उपमुख्याध्यापिका सौ. जयश्री जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, ना. फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कराड दक्षिण मतदारसंघात आरोग्य शिबीरांचेही आयोजन करण्यात आले असून, याचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला असल्याची माहिती तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील यांनी दिली.

Friday, July 21, 2023

बोगदा ते यवतेश्वर कास रस्ता सर्वप्रकारच्या वाहतूकीस रविवारी आणि सोमवारी पूर्णपणे बंद ; नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा


वेध माझा ऑनलाईन । अतिवृष्टी / भूस्सखलनामुळे सातारा तालुक्यातील सांबरवाडी हद्दीतील सातारा - यवतेश्वर - कास या  घाटातील धोकादायक दरड / दगड कोसळल्यास  मोठया प्रमाणावर जीवीत व वित्त हानी होणेची शक्यता आहे. यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनामार्फत सांबरवाडी येवतेश्वर घाटातील  धोकादायक दरड / दगड फोडण्याची कार्यवाही दि. 24 जुलै रोजी कार्यकारी अभियंता , सार्वजनिक बांधकाम विभाग , सातारा यांच्या मार्फत करण्यात येणार आहे. तरी रविवार दि. 23जुलै2023 रोजी रात्री 12वाजल्यापासून ते सोमवार दि. 24 जुलै 2023 रोजीचे रात्री 12 वाजेपर्यंत बोगदा ते यवतेश्वर -  कास रस्ता सर्वप्रकारच्या वाहतूकीस  पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. अशी  माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटी यांनी दिली आहे.
 
तसेच धोकादायक दगड फोडण्याची कार्यवाही सुरु असताना, सदर ठिकाणापासून कमीतकमी 200 ते 300 मीटर परिसरात  कोणी व्यक्ती/पशूधनास  प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. 

कोणत्याही प्रकारची जिवीत हानी होऊ नये म्हणून महादरे गावाच्या दक्षिणेकडील बाजूस शेतीच्या कामाकरिता, गुरे राखण्याकरिता व इतर कारणासाठी नागरिकांना जाणेस पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे दि. 23जुलै रोजी रात्री १२ वाजलेपासून दि. 24 जुलै रोजीचे रात्री 12 पर्यंत बोगदा ते यवतेश्वर -  कास रस्ता खबरदारीची उपाययोजनेसाठी बंद करणेत येणार असलेने, नागरिकांनी सदर दिवशी पर्यायी रस्त्यावरुन वाहतूक करावी असे आवाहन प्रशासना मार्फत करण्यात आले आहे.                                                                                                                                                                                

मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढल्याचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अशातच या पीडित महिलांमधील एक महिला कारगिल युद्धात सहभाग घेतलेल्या माजी सैनिकाच्या पत्नीचा असल्याचे समोर आले आहे. मणिपूरच्या या घटनेने देशभरात खळबळ उडाली असून अनेकांनी या घटनेचा निषेध केला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. पीडित महिलेने त्यांच्याशी बोलताना सांगितले की, आम्हा दोघी महिलांना हजारो पुरुषांच्यासमोर बंदूकीच्या धाकाने अंगावरील कपडे काढले नाहीत तर जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी आम्हाला त्रास दिला आमची धिंड काढली असे देखील त्यांनी सांगितले.

चुराचंदपूर येथील एका मदत शिबिरात आसरा घेतलेल्या माजी सैनिकाने (वय ६५) सांगितले की सांगितले की, माझ्या पत्नीला या घटनेचा मोठा धक्का बसला होता. मात्र आमच्या मुलांकडे पाहून त्यांच्यासाठी ती पुन्हा जगण्यासाठी बळ एकवटू पाहत आहे. ते म्हणाले 3 आणि 4 मे रोजी हजारोंच्या संख्येने लोकांच्या झुंडीने गावावर हल्ला केला. घरे, एक चर्च आणि अनेक पाळीव जनावरे त्यांनी मारुन टाकली. तो जमाव 4 मे रोजी आमच्या गावात आला आणि घरे जाळणे सुरु केले. त्या भीतीने अनेक लोक जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळत सुटले. माझ्या पत्नीची आणि माझी चुकामुक झाली. त्यावेळी ती आणि गावातील चौघेजण जंगलातील एका झाडाच्या पाठीमागे लपून बसले. काही हल्लेखोर आमच्या पाळीव जनावरांचा (डुक्कर, बकऱ्या, कोंबड्या)चा पाठलाग करत असताना जंगलात घुसले. यावेळी जंगलात लपलेल्या माझ्या पत्नीला आणि चार जणांना त्यांनी पाहिले आणि पकडले.

पीडित महिलेच्या पतीने सांगितले की, माझी पत्नी आणि आणि दुसरी एक महिला तसेच तिचे एक लेकरु, आणि दुसऱ्या एका कुटुंबातील तिघे (वडील, मुलगा आणि मुलगी) होते. त्यांना जेव्हा बाहेर आणले तेव्हा पोलिसांचे एक वाहन तेथे दिसले ते काही प्रयत्न करणार पण जमावाने पोलिसांना न जूमानता त्यांनी माझ्या पत्नीला आणि इतर चौघांना वाहनातून बाहेर ओढले.

त्यानंतर तीन महिलांना कपडे काढण्यास सांगितले. एका महिलेच्या काखेत लहान मुल होते. तीला जमावातील काही लोकांनी जाण्यास सांगितले. तर जमावातील काही जण दुसऱ्या तरुणीसोबत छेडछाड करत होते. त्यावेळी तीच्या वडिलांनी आणि भावाने त्याला विरोध केला तेव्हा त्यांना मारुन टाकण्यात आले.

एफआयआरमध्ये नमुद केल्याप्रमाणे, नंतर जमावाने त्या तरुणीवर सामुहिक बलात्कार केला. पोलिसांनी सांगितले की, सामुहिक बलात्काराबाबत ठोसपणे सांगितले जावू शकत नाही, कारण ती तरुणी सापडलेली नाही. पिडीत महिलेचा पती माजी सैनिकाने सांगितले की, नंतर तीचा प्रियकर तीला सोबत घेऊन गेला. जवळपास दोन ते तीन तास तीच्यासोबत दृष्कृत्य करण्यात आले.

मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढल्याचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अशातच या पीडित महिलांमधील एक महिला कारगिल युद्धात सहभाग घेतलेल्या माजी सैनिकाच्या पत्नीचा असल्याचे समोर आले आहे. मणिपूरच्या या घटनेने देशभरात खळबळ उडाली असून अनेकांनी या घटनेचा निषेध केला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. पीडित महिलेने त्यांच्याशी बोलताना सांगितले की, आम्हा दोघी महिलांना हजारो पुरुषांच्यासमोर बंदूकीच्या धाकाने अंगावरील कपडे काढले नाहीत तर जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी आम्हाला त्रास दिला आमची धिंड काढली असे देखील त्यांनी सांगितले.

चुराचंदपूर येथील एका मदत शिबिरात आसरा घेतलेल्या माजी सैनिकाने (वय ६५) सांगितले की सांगितले की, माझ्या पत्नीला या घटनेचा मोठा धक्का बसला होता. मात्र आमच्या मुलांकडे पाहून त्यांच्यासाठी ती पुन्हा जगण्यासाठी बळ एकवटू पाहत आहे. ते म्हणाले 3 आणि 4 मे रोजी हजारोंच्या संख्येने लोकांच्या झुंडीने गावावर हल्ला केला. घरे, एक चर्च आणि अनेक पाळीव जनावरे त्यांनी मारुन टाकली. तो जमाव 4 मे रोजी आमच्या गावात आला आणि घरे जाळणे सुरु केले. त्या भीतीने अनेक लोक जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळत सुटले. माझ्या पत्नीची आणि माझी चुकामुक झाली. त्यावेळी ती आणि गावातील चौघेजण जंगलातील एका झाडाच्या पाठीमागे लपून बसले. काही हल्लेखोर आमच्या पाळीव जनावरांचा (डुक्कर, बकऱ्या, कोंबड्या)चा पाठलाग करत असताना जंगलात घुसले. यावेळी जंगलात लपलेल्या माझ्या पत्नीला आणि चार जणांना त्यांनी पाहिले आणि पकडले.

पीडित महिलेच्या पतीने सांगितले की, माझी पत्नी आणि आणि दुसरी एक महिला तसेच तिचे एक लेकरु, आणि दुसऱ्या एका कुटुंबातील तिघे (वडील, मुलगा आणि मुलगी) होते. त्यांना जेव्हा बाहेर आणले तेव्हा पोलिसांचे एक वाहन तेथे दिसले ते काही प्रयत्न करणार पण जमावाने पोलिसांना न जूमानता त्यांनी माझ्या पत्नीला आणि इतर चौघांना वाहनातून बाहेर ओढले.

त्यानंतर तीन महिलांना कपडे काढण्यास सांगितले. एका महिलेच्या काखेत लहान मुल होते. तीला जमावातील काही लोकांनी जाण्यास सांगितले. तर जमावातील काही जण दुसऱ्या तरुणीसोबत छेडछाड करत होते. त्यावेळी तीच्या वडिलांनी आणि भावाने त्याला विरोध केला तेव्हा त्यांना मारुन टाकण्यात आले.

एफआयआरमध्ये नमुद केल्याप्रमाणे, नंतर जमावाने त्या तरुणीवर सामुहिक बलात्कार केला. पोलिसांनी सांगितले की, सामुहिक बलात्काराबाबत ठोसपणे सांगितले जावू शकत नाही, कारण ती तरुणी सापडलेली नाही. पिडीत महिलेचा पती माजी सैनिकाने सांगितले की, नंतर तीचा प्रियकर तीला सोबत घेऊन गेला. जवळपास दोन ते तीन तास तीच्यासोबत दृष्कृत्य करण्यात आले.

लवकरच अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री असतील ; अमोल मिटकरींच्या ट्विटने खळबळ तर शिंदे गटाच्या पोटात गोळा!

वेध माझा ऑनलाईन। राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अनपेक्षितपणे सामील झालेल्या अजित पवार गटामुळे आधीच शिंदे गटाचे आमदारांमध्ये चलबिचलता सुरू आहे, अशात आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरींच्या एका ट्वीटमुळे त्यांच्या चिंतेत अधिकची भर पडल्याचं चित्र आहे. अजित पवार हे लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होतील, राज्यात लवकरच अजित पर्व सुरू होईल असं ट्वीट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये गेले असून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची ते भेट घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी अजित पवार हे लवकरच राज्याचे मुख्यमंत्री असतील असं सांगितल्याने उलट सुलट राजकीय चर्चा रंगल्या आहेत.तर दुसरीकडं शिंदे गटाच्या पोटात या ट्विट ने गोळा आल्याचे बोलले जात आहे

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. अजित पवारांची राजकारणात काम करण्याची स्टाईल, त्यांचा स्पष्टवक्तेपणा आणि त्यांची कार्यशैली त्यातून दाखवण्यात आली आहे. हा व्हिडीओ शेअर करत अमोल मिटकरी यांनी राज्यात लवकरच अजित पर्व सुरू होणार असल्याचं सांगितलं आहे. 'मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की......! लवकरच #अजितपर्व' असं कॅप्शन त्यांनी त्या ट्वीटला दिलं आहे.

राधाकृष्ण विखे पाटलांच्या सोबतीला आले तुकाराम मुंडे ; राज्यात ४१ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या;

वेध माझा ऑनलाईन। शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून राज्यात आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरुच आहे. आज राज्य शासनाने तब्बल ४१ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. आपल्या आतापर्यंतच्या सेवा काळात ज्यांनी बदल्यांचा रेकॉर्डच मोडलेला आहे, त्या आएएस तुकाराम मुंडे यांची बदली राधाकृष्ण विखे-पाटील मंत्री असलेल्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय खात्याच्या सचिवपदी झाली आहे.

ब्रेकिंग.....

कराड विमानतळाच्या विस्ताराबाबत येत्या तीन महिन्यात उच्च स्तरीय मिटिंग घेतली जाणार ;; पृथ्वीराज चव्हाणांनी मानले फडणवीसांचे आभार

वेध माझा ऑनलाईन।  महाराष्ट्रातील तालुका ठिकाणचं पहिलं विमानतळ कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सुरू केलं होतं कारण कराड हे पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण आहे. कराड विमानतळ विस्तारीकरणासाठी तेथील ग्रामस्थांचा विरोध नसून त्याबाबत योग्य तो निधी त्यांना हवा आहे यासाठी राज्य शासनाकडून त्वरित तोडगा काढण्याची अपेक्षा आहे या माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या तीन महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्च स्तरीय मिटिंग घेण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले त्यानंतर आ पृथ्वीराज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले

कराड हे पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण आहे, या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले तालुका पातळीवरील विमानतळ स्व. यशवंतराव चव्हाण यांनी उभारले होते. माझ्या मुख्यमंत्री काळात कराड विमानतळ विस्तारीकरणाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर निधीअभावी प्रलंबित असणारा तो प्रश्न लवकर मार्गी लागावा यासाठी पाठपुरावा केला जात आहे. तसेच 28 नोव्हेंबर 2022 ला MADC च्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला होता की, महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यामध्ये हेलिपॅड करण्याचा. विमानतळ बाबत कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी इच्छा असूनही अडचणी येत आहेत. त्या नाईट लँडिंगच्या असतील किंवा विमानतळ विस्तारीकरणाबाबत असतील. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये हेलिपॅड करण्यासाठी जागा निश्चितीचे आदेश दिलेले आहेत. हे जर खरे असेल तर  शासनाने याबाबत काही धोरण ठरवलेले आहे का? असा राज्याच्या दृष्टीने महत्वाचा तसेच मतदारसंघातील कराड विमानतळाचा अत्यंत महत्वाचे प्रश्न विधानसभेत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला विचारले. 

आ. चव्हाण यांच्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडच्या विमानतळाबाबत जो प्रश्न मांडलेला आहे त्याबाबत माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय मिटिंग आपण येत्या तीन महिन्यात घेतली जाईल. कराड विमानतळ विस्तारीकरणाबाबत जर शेतकऱ्यांच्या काही अडचणी नसतील तर निधीची कोणतीही कमी होणार नाही. कराडचे विमानतळ हे अत्यंत महत्त्वाचं व स्ट्रेटेजिक विमानतळ आहे त्यामुळे जर त्याचा विस्तार करता आला तर त्याचा नक्कीच त्या भागातील लोकांना फायदा होऊ शकतो.  पश्चिम महाराष्ट्रातील विमानतळांचा विचार केला तर कराड सारख्या ठिकाणी एक मध्यवर्ती विमानतळ असणं अत्यंत गरजेचं आहे, कारण मागच्या वेळी आपण बघितलं की मोठा पूर त्या भागात आला त्यावेळी अशा परिस्थितीमध्ये विमानतळच आसपास नसल्याने कनेक्टिव्हिटी त्या भागात होत नव्हती. कोल्हापूर विमानतळावर  उतरता येत नव्हतं कारण तिथं पाण्याचा वेढा होता, त्यामुळे त्याचा सुद्धा विचार आपल्याला करण गरजेच आहे. यामुळे यासाठी माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक आपण घेऊ. आपल्याकडे विमान संचालनालय आणि नागरी विमानन विभाग देखील आहे. काही विमानतळ MADC च्या अंतर्गत ठेवले आहेत तर काही MIDC च्या अंतर्गत ठेवले आहेत त्यामुळे या सर्वांना एका नोडल एजेन्सी च्या अंतर्गत आपणाला आणावे लागेल तशी एक नोडल एजेन्सी आपण तयार करू आणि पुढच्या तीन महिन्यात याचा एक प्लॅन आपण तयार करू.