Tuesday, July 4, 2023

गद्दारी करणाऱ्यांनी माझे फोटो लावू नयेत ; शरद पवारांनी अजितदादांना सुनावले;

वेध माझा ऑनलाईन। शरद पवार यांचे फोटो पोस्टरवर लावा असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना देऊन आपण काकांचा आदरच करत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न चालवला आहे, त्याला शरद पवार यांनी विरोध केला आहे. माझ्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी माझे फोटो लावू नयेत, असे खडेबोल शरद पवारांनी अजित पवार यांना सुनावले आहेत. तसेच अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या कोणतेही नेत्याचा फोटो फ्लेक्सवर वापरायचा नाही, असे आदेश शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्याचे समजते आहे.

No comments:

Post a Comment