वेध माझा ऑनलाईन। राज्यात सध्या जे काही सुरू आहे ते किळसवाणे आहे. घड्याळाने काटा काढला की काट्याने घड्याळ काढलं काहीच समजत नाही. मात्र हे काही अचानक घडलेले नाही तर फार आधीपासून ठरत होतं अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.दरम्यान या सर्व घडामोडींमध्ये शंकेला जागा आहे असे सांगत जे झाले त्यात शरद पवार यांचा हात असण्याची शक्यताही राज यांनी व्यक्त केली
पुण्याच्या प्रभात रस्त्यावरील निवासस्थानी आले असताना राज यांनी पत्रकारांबरोबर बोलताना राज्यातील राजकीय घडामोडींवर या सर्व किळसवाण्या गोष्टी आहेत असे सांगितले. राज म्हणाले, अशा गोष्टी अचानक होत नाहीत. हे सगळे फार आधीपासून प्लॅन केलेले असणार. प्रफुल्ल पटेल किंवा दिलीप वळसे पाटील हे अजित पवार यांच्याकडे जाणाऱ्यांतले नाहीत. शरद पवार यांच्याबरोबरची ही माणसे अचानक उठतील व अजित पवारांना साथ देतील असे होणार नाही. त्यामुळे या सर्व घडामोडींमध्ये शंकेला जागा आहेत. जे झाले त्यात शरद पवार यांचा हात असण्याची शक्यताही राज यांनी व्यक्त केली. उद्या खासदार सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री झाल्या तर आश्चर्य वाटणार नाही या आपल्या वक्तव्याचा पुनरूच्चार केला.
No comments:
Post a Comment