वेध माझा ऑनलाइन - कोविड बाधित रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरूच असून शुक्रवारी दिवसभरात ११ हजार ३१७ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर एकच दिवशी तब्बल २२ हजार ७३ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्णालयांमध्ये १६.८ टक्केच खाटा भरल्या आहेत. मात्र मृत्यूचा आकडा मागील काही दिवसांत वाढताना दिसून येत आहे.
मुंबईत आतापर्यंत नऊ लाख ८१ हजार ३०६ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ८९ टक्के रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. शुक्रवारी बाधित आढळून आलेल्या रुग्णांपैकी नऊ हजार ५०६ रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नव्हती. तर लक्षणे असलेले एकूण सहा हजार ४३२ रुग्ण सध्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून यापैकी एकूण दोन हजार ८२४ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण मात्र वाढले आहे. त्यामुळे आतापर्यंत आठ लाख ७७ हजार ८८४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ८४ हजार ३५२ सक्रीय रुग्ण आहेत.
No comments:
Post a Comment