Saturday, June 24, 2023

उद्या कराडात संजय राऊत इंद्रजित गुजर यांच्या भेटीला येणार ; माजी नगरसेवक गुजर यांच्या निकटवरतीयांनी वेध- माझाला दिली माहिती :

वेध माझा ऑनलाइन । कराडचे नगरसेवक इंद्रजित गुजर याची भेट घेण्यासाठी बनवडी येथील डॉ दौलतराव आहेर अभियांत्रिकी महाविद्यालय येथे उद्या रविवारी सकाळी 11 वाजता शिवसेना नेते संजय राऊत येणार असल्याचे माजी नगरसेवक इंद्रजित गुजर यांच्या निकटवरतीयांनी वेध माझाशी बोलताना सांगितले त्यामुळे इंद्रजित गुजर ठाकरे गटात प्रवेश कधी करणार... याबाबतच्या चर्चा आता पुन्हा सुरू झाल्या आहेत आणि त्यांच्या प्रवेशाबद्दलचा खुलासा उद्याच होईल अशी अपेक्षा देखिल कराडकरांना आहे

दरम्यान इंद्रजित गुजर हे उद्धव ठाकरे गटात जाणार असल्याची चर्चा खूप दिवसापासून सुरू आहे मात्र त्यांच्या कन्येचा विवाह सोहळा पार पडल्यानंतर ते काही दिवसानी पक्षप्रवेश करतील असे ऐकिवात होते  त्यांच्या कन्येचा विवाह काल शुक्रवारी सम्पन्न झाला या विवाह सोहळ्यासाठी स्वतः संजय राऊत व ठाकरे कुटुंबीयांनी इंद्रजीत गुजर यांच्या कन्येला व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आशीर्वाद दिल्याचे सर्व उपस्थित जनसमुदायाने काल पाहिले 

उद्या ढेबेवाडी परिसरात संजय राऊत काही कार्यक्रमाच्या निमित्ताने येणार आहेत त्यापूर्वी सकाळी 11 वाजता ते इंद्रजित गुजर याना भेटण्यासाठी बनवडी येथील आहेर कॉलेज येथे  येणार आहेत असे गुजर यांच्या निकटवरतीयांनी वेध माझाला सांगितले आहे

नगरसेवक इंद्रजित गुजर व अप्पा माने यांनी आपला स्वतंत्र गट निर्मितीसाठी प्रयत्न सुरू केले असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे अप्पा माने हे काँग्रेसचे शहर अध्यक्ष होते त्यांना विश्वासात घेतले नाही आणि अचानक पदावरून हटवण्यात आले अशी भावना अप्पा मानेंसह बाबा गटातील अनेकांची झाली व त्यातून नाराजी पसरत ठाकरे गटाची एन्ट्री कराडात झाली अशी देखील चर्चा असते

काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी इंद्रजित गुजर यांच्या निवासस्थानी अचानक भेट दिली होती त्यापूर्वी सेना नेते विनायक राऊत हे देखील इंद्रजित गुजर याना भेटले असल्याची बातमी मिळाली होती शिवसेनेतून त्यांना मोठी ऑफर दिल्याचेही वृत्त आहे स्वतः गुजर व त्यांच्याबरोबर असणारे शहरातील काही आजी - माजी काही नगरसेवक ठाकरे ,गटात जाण्यासाठी इच्छुक आहेत असे कळते सुरुवातीला शिवसेनेच्या कोणत्या पदावर गुजर यांच्यासह त्यांच्या समर्थकाना पदाची ऑफर केली जाते व कोणत्या पदावर तडजोड होते हे बघून व त्यावर चर्चा होऊन मगच गुजर व त्यांच्या आजी माजी सहकाऱ्यांचा मातोश्रीवर जाऊन किंवा कराडात मोठा कार्यक्रम घेऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार असल्याचे देखील वृत्त आहे
 
कराड पालिका निवडणुकीत अचानकपणे जुनी जनशक्ती आघाडी बाबा गटाचे नेतृत्व करणार आणि आपण मागे पडणार तसेच आपल्याला बाबा गटातून संधी मिळणार नाही असाच अचानक डच्चू दिला तर पर्याय काय ? या विवनचनेत असणाऱ्या नाराजांची ठाकरे गटात प्रवेश होण्याची प्रक्रिया होणार आहे असे असली तरी ऐन पालिका निवडणुकीत बाबा गटासाहित होणाऱ्या महाआघाडीचे सदस्य म्हणून हेच नगरसेवक ठाकरे गटाच्या माध्यमातून पुन्हा बाबा गटाबरोबर हातात हात घालून एकत्र येत भाजप- शिंदे गटाशी दोन हात करण्यासाठी शहरात पुन्हा एकत्र दिसतील असेही खात्रीलायक वृत्त आहे

सध्या महाआघाडीचा प्रयोग एकूणच झालेल्या 
आत्तापर्यंतच्या निवडणुकीसाठी राज्यात यशस्वी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे याचाच धागा पकडून कराड पालिकेसाठी देखील महाआघाडी होणार हे निश्चित मानले जात आहे परंतु कराडात दोन काँग्रेसच्या तुलनेत शिवसेनेचे म्हणावे असे प्राबल्य नाही म्हणूनच महाआघाडीची ताकद कराडात वाढावी यासाठीच नगरसेवक गुजर यांचा ठाकरे गटात होणारा प्रवेश ही एक प्रकारची खेळी तर नाही ना ? अशीही चर्चा सध्या सुरू आहे...त्याच खेळीचा भाग म्हणून संजय राऊत व गुजर यांच्या उद्याच्या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे !

No comments:

Post a Comment