Thursday, June 8, 2023

इनरव्हील क्लब ऑफ कराडच्या अध्यक्षपदी सीमा पुरोहित तर सचिवपदी डॉ. अर्चना औताडे

वेध माझा ऑनलाइन ।इनर व्हील क्लब ऑफ कराड च्या अध्यक्ष पदी सीमा पुरोहित तर सचिव पदी  डॉ. अर्चना औताडे यांची निवड नुकतीच करण्यात आली ही निवड 2023-2024 या वर्षाकरिता करण्यात आली आहे
त्याचप्रमाणे नवीन संचालक मंडळ देखील नियुक्त करण्यात आले आहे. यामध्ये, प्रामुख्याने   उपाध्यक्ष पदी अँड. मंजुषा इंगळे, खजिनदार पदी  शितल शाह,  आय एस ओ  पदी नम्रता कंटक, संपादक पदी रूपाली डांगे तर सी सी अनुराधा टकले यांची निवड झाली आहे. आणि अलका गोखले, अंजली नावडीकर, ऋता चाफेकर, श्रावणी घळसासी  आणि अनुराधा पवार यांची एक्झिक्यूटिव्ह सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
सन 2023-24 करीता इनर व्हील  डिस्ट्रिक्ट 313च्या डिस्ट्रिक्ट चेअरमन संगमनेरच्या सौ. रचना मालपाणी  यांच्या मार्गदर्शनाखाली आणि क्लब मधील सर्व सभासदांच्या सहकार्याने  वृक्षारोपण,  गरोदर स्त्रीयांचे तसेच बालकांचे आरोग्य, कॅन्सर निदान अशा विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा अध्यक्ष सीमा पुरोहित व सचिव डॉ. अर्चना औताडे  व त्यांचे संचालक मंडळाचा मानस आहे
इनर व्हील  क्लब ऑफ कराड च्या सामाजिक कार्याच्या वाटचालीत कराड शहरातील व पंचक्रोशीतील अनेकांचे सहकार्य मिळते. तसेच, ते या पुढेही मिळेल अशी खात्री इनर व्हील  क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment