Saturday, June 24, 2023

वेध माझा ऑनलाइन ।  शुक्रवारी रात्री दोन ते अडीचच्या सुमारास कराड तालुक्यातीलओंड, उंडाळे, टाळगाव या सह विभागात अकरा घरे अज्ञात चोरट्यानी घराची कुलपे तोडून घरातील साहित्याची नासधूस करत मौल्यवान वस्तू सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली.

याबाबत सविस्तर माहिती अशी, उंडाळे परिसरात रात्री वीजपुरवठा खंडीत झाला होता. त्याचाच फायदा घेत चोरट्यांनी तेथील बंद घराचे समोरील कुलूप तोडून घरातील टेबलचे ड्राव्हर उचकटून तसेच घरातील साहित्य विस्कटून चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. राहूल बाजीराव पाटील यांच्याही बंद बंगल्याचे कुलूप तोडून घरातील कपाटे, तिजोरीतील रोख सुमारे तीस हजाराची रोकड तसेच सुमारे साडेतीन चार तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. या दरम्यान चोरट्यांनी घरातील व कपाटातील साहित्य विस्कटून टाकले होते तसेच जवळच असलेल्या अन्य काही ठिकाणी चोरत्यानी चोरी केली 
घटनेची माहिती पोलीस पाटील शुभांगी पवार यांनी दिल्यानंतर उंडाळे पोलीस ठाण्याचे हवालदार सुनिल माने, राजू पाटोळे यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, कराड ग्रामीणचे पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी घटनास्थळी भेट दिली. 

No comments:

Post a Comment