वेध माझा ऑनलाइन । कराड शहरालगत असलेल्या विद्यानगर परिसरातील कॅफेंवर कराडचे नूतन डीवायएसपी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शनिवारी दुपारी धडक कारवाई केली. सैदापूरसह विद्यानगर परिसरातील कॅफेनवर केलेल्या कारवाईत काही महाविद्यालीन युवक-युवतींना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, विद्यानगर-सैदापूर परिसरात अनेक कॉफी कॅफे आहेत. या ठिकाणी काही कॅफेंमध्ये युवक-युवतींकडून अनुचित व गैरप्रकार केले जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु होती. युवक-युवतींच्या अशा प्रकारांवर आला घालण्यासाठी अशा कॅफेंवर कारवाई करण्याची स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली होती. दरम्यान, शनिवारी डीवायएसपी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय परिसरातील कॅफेवर धडक कारवाई केली.त्यामुळे या परिसरात अनेकांचे धाबे दणाणले आहेत
No comments:
Post a Comment