तेलंगाणा चे मुख्यमंत्री केसीआर हे विठ्ठलाच्या दर्शनाला महाराष्ट्रात आले आहेत 600 गाड्यांचा ताफा घेऊन ते मंत्रिमंडळासहित आले आहेत ते उद्या पंढरपूर येथे जाणार आहेत दरम्यान उमरगा येथे आज त्यांनी आपल्या काही लोकांबरोबर मटनावर ताव मारला त्यामुळे ते चर्चेत आले आहेत खरंतर वारीला जाताना, माऊलीचे दर्शनासाठी जाताना त्याठिकाणी नॉन व्हेज खाऊन जाऊ नये अशी प्रथा आहे यावरून राष्ट्रवादी चे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर टीका करताना पंढरीची वारी पवित्र आहे ती अपवित्र करू नका असा टोला ट्विट करत लगावला आहे पैशाच्या जोरावर तेलंगाणा चे मुख्यमंत्री मटणाचे बेत करत आहेत असेही त्यांनी म्हटले आहे
No comments:
Post a Comment