वेध माझा ऑनलाइन ; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कराडला प्रतिवर्षी प्रमाणे ना नफा- ना तोटा तत्वावरील स्वस्त वही विक्री केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. गोगरीब विद्यार्थांसाठी गेली 17 वर्षांपासुन मनसेच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
जेष्ठ नागरीक रघुनाथ बावडेकर यांच्या हस्ते फित कापून या केंद्राचा शुभारंभ्घ् करण्यात आला. यावेळी मनसेचे जिल्हाप्रमुख ऍड.विकास पवार, शहर अध्यक्ष सागर बर्गे, विद्यर्थी सेनेचे जिल्हाअध्यक्ष विनायक भोसले, नितीन गायकवाडे, अशुतोष दुर्गावळे, राजेंद्र कांबळे, सतीश कणसे, सतीश सुर्यवंशी व कार्यकर्ते उपस्थीत होते.
ऍड.विकास पवार व सागर बर्गे म्हणाले की, राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कराडला दरवर्षी विविध सामाजीक उपक्रम राबवण्यात येत आहेत. महागाईने पिचलेल्या शहरासह तालुक्यातील गोगरीब विद्यार्थांना व पालकांना दिलसा मिळावा यासाठी सतरा वर्षांपासुन येथील लाहोटी कन्या शाळेसमोर ना नफा ना तोटा तत्वावर स्वस्त वही विक्री केंद्र चलवण्यात येत आहे. बाजारपेठेपेक्षा स्वस्त दरात वह्या व शालेय साहीत्य उपलब्द होत असल्याने पालकांना मोठा दिलासा मिळत आहे. याबरोबरच मुकबधिर शाळेतील विद्यार्थांना, गणवेश, वह्या, शालेय साहीत्य व क्रिडा साहीत्याचे वाटप करण्यात आले. तसेच दहावीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थांचा सत्कार करण्यात आल्याचे ऍड.विकास पवार व सागर बर्गे यांनी सांगीतले.
No comments:
Post a Comment