वेध माझा ऑनलाइन । कराड येथील नरसिंह देवस्थान मधील फायनल प्लॉट नंबर 396 व 397 मधील अतिक्रमण त्वरित हटवण्यात यावे अशी मागणी राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष इमरान मुल्ला यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकारी सातारा यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की कराड मधील शनिवार पेठेतील फायनल प्लॉट सिटी सर्वे नंबर 396 व 397 मधील सदरची जमीन ही नरसिंह देवस्थान यांच्या मालकीची आहे सदर देवस्थान जमिनीमध्ये संजय पुरुषोत्तम बधीयानी यांनी व नितीन पुरुषोत्तम बधीयानी यांनी सन 2005 पासून बेकायदेशीर रित्या अतिक्रमण केले आहे सदरचे नरसिंह देवस्थानची जमिनीमध्ये केलेल्या अतिक्रमणाबाबत आपल्या अधिकारात अतिक्रमण काढून घेण्याचे आदेश व्हावेत केलेले अतिक्रमण त्वरित व तात्काळ काढून घेण्याची कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली असून पुढे असे म्हटले आहे की नरसिंह देवस्थान ट्रस्टवर केलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेकडून आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत प्राणांतिक उपोषण सुरू करावे लागेल .
निवेदन देतेवेळी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष इम्रान मुल्ला संघटनेचे कराड तालुका कार्याध्यक्ष चंद्रकांत गायकवाड संघटनेचे कराड तालुका मार्गदर्शक राकेश पवार तसेच देवस्थान ट्रस्टचे कुळ अवधूत हापसे गोरख रगडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment