Tuesday, June 20, 2023

औरंगजेबाच्या कबरीला भेट देणाऱ्या प्रकाश आबेडकरांना उद्धव ठाकरेंनी दिला सल्ला ; काय म्हणाले...

वेध माझा ऑनलाइन । नुकतेच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगर इथं जाऊन औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती. प्रकाश आंबेडकरांच्या या कृतीवरून राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यात सत्ताधारी भाजपाने या प्रकारावरून उद्धव ठाकरेंना टार्गेट केले. कारण उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाली असून प्रकाश आंबेडकरांच्या या भूमिकेवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. 

मुंबईत आज झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी याबाबत उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपासोबत आमची युती होती तेव्हा अडवाणीही जिनाच्या कबरीवर नतमस्तक झाले होते. नवाज शरीफच्या वाढदिवसाला केक खायला आपले पंतप्रधान गेले होते. लोकांना इतिहासात अडकवून ठेवण्यात आणि प्रत्येकवेळी निवडणुकीत एखादा चेहरा चालत नसेल तर तिकडे जय बजरंग बली करायचे, कधी दाऊदचा चेहरा, कधी औरंगजेबाचा चेहरा, औरंगजेबाच्या मुद्द्यावरून दंगल घडवणारे हे और दंगाबाद आहेत. यांना दंगली पेटवायच्या आहेत आणि कारभार करायचाय असा आरोप भाजपावर करत आता स्पष्ट आणि एकाविचाराने पुढे जाण्याची गरज आहे असा सल्ला प्रकाश आंबेडकरांना दिला.  
मंत्रिमंडळात महिलांना स्थान नाही 
राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही. महिलांना शिवीगाळी करणारे मंत्री होतात पण महिला मंत्री होत नाही. हे कुठले राज्य आहे असं सांगत उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस यांच्या सरकारवर टीका केली.  


No comments:

Post a Comment