Sunday, June 11, 2023

पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची शक्यता;...वाचा बातमी...



वेध माझा ऑनलाइन । आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्यास तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याचा विचार करू शकतात, असे मोदी सरकारमधील पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी शनिवारी सांगितले.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा मुद्दा राजकारण्यांपासून सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम करणारा आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढत असून, पेट्रोल प्रति लिटर १०० रुपये आणि डिझेल प्रति लिटर ९० रुपयांपेक्षा जास्त दराने विकले जात आहे. परंतु आता लवकरच त्याच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्यास तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याचा विचार करू शकतात, असे मोदी सरकारमधील पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी शनिवारी सांगितले. एवढेच नाही तर तेल कंपन्यांची कामगिरी कशी असते, यावरही ते अवलंबून असेल. जर या कंपन्यांनी पुढील तिमाहीत चांगली कामगिरी केली तर ते किमतीतील कपातीवर निर्णय घेऊ शकतील. पुरी यांनी शनिवारी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पत्रकारांशी चर्चा केली होती. त्यावेळी ते बोलत होते.

देशातील २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी हरदीप सिंग पुरी यांच्या या विधानाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे यानिमित्ताने हे विधान महत्त्वाचं मानलं जात असून, पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याचे संकेत मिळत आहेत.

No comments:

Post a Comment