वेध माझा ऑनलाइन । जर तुमचे पालक निवृत्त झाले असतील आणि तुम्ही त्यांच्यासाठी चांगली बचत योजना शोधत असाल तर पोस्ट ऑफिसशी संपर्क साधा. ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकप्रिय पर्याय म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजना जी पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग्ज स्कीमचा भाग आहे. पोस्ट ऑफिस योजना असल्याने त्यात सुरक्षिततेची १०० टक्के हमी आहे. कमाल ठेव मर्यादा आणि त्यावर मिळणारे व्याज वाढल्यामुळे ही योजना पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक बनली आहे. या योजनेत तुम्ही तुमच्या पालकांच्या नावावर दोन स्वतंत्र खाती उघडून दरमहा ४०,१०० रुपये घरी येण्याची व्यवस्था करू शकता. या योजनेवर ८.०२ टक्के वार्षिक व्याज आहे. सामान्यतः वयाची ६० वर्षे पूर्ण केलेली व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते.
ठेव मर्यादा वाढवली अन् व्याजही जबरदस्त
ज्येष्ठ नागरिक बचत योजने मध्ये आता कमाल ठेव मर्यादा वाढली आहे. अर्थसंकल्प २०२३ च्या घोषणेनुसार, १ एप्रिल २०२३ पासून या योजनेत १५ लाख रुपयांऐवजी जास्तीत जास्त ३० लाख रुपये जमा करता येतील. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत ही सुविधा आहे. जर तुम्ही पती-पत्नी असाल तर एका संयुक्त खात्याशिवाय तुम्ही २ संयुक्त खाती देखील उघडू शकता. दुसरीकडे जर दोघेही पात्र असतील तर दोन स्वतंत्र खातीदेखील उघडली जाऊ शकतात. या प्रकरणात २ वेगवेगळ्या खात्यांमध्ये जास्तीत जास्त ६० लाख रुपये (एका खात्यात ३० लाख रुपये) जमा केले जाऊ शकतात. ५ वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर तुम्ही हे खाते आणखी ३ वर्षांसाठी वाढवू शकता.
No comments:
Post a Comment