Sunday, June 25, 2023

संजय राऊत म्हणाले...इंद्रजित गुजर यांच्या शिवसेना प्रवेशासाठी स्वतः उद्धव ठाकरे इच्छुक ; इंद्रजित गुजर म्हणाले...100 टक्के प्रवेश करणार...

वेध माझा ऑनलाइन । इंद्रजित गुजर यांच्या शिवसेना प्रवेशा करिता स्वतः उद्धव ठाकरे इच्छुक आहेत  लवकरच गुजर यांचा प्रवेश मातोश्रीवर होईल असे सूतोवाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज कराड येथे केले आज पाटण तालुक्यातील तळमावले याठिकाणी कार्यक्रमाकरिता ते आले आहेत दरम्यान कराड येथे त्यांनी गुजर यांच्या आहेर कॉलेजवर जाऊन भेट दिली व गुजर यांच्याशी काहीकाळ कमराबंद चर्चा केली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते 

ते पुढे म्हणाले मी अस ऐकलय की गुजर हे राजकारण कमी आणि समाजकारण अधिक करतात त्यांचा संपर्क दांडगा आहे ते उत्तम संघटक आहेत माझा त्यांच्याशी जुना सम्बन्ध आहे त्यांनी शिवसेनेत यावे यासाठी आम्ही सगळे तसेच स्वतः उद्धव ठाकरेही इच्छुक आहेत लवकरच त्यांचा मातोश्री वर प्रवेश होईल 

इंद्रजित गुजर म्हणाले मी 100 टक्के उद्धव ठाकरे सेनेत प्रवेश करणार आहे मात्र माझ्या आजी-माजी सहकाऱ्यांशी चर्चा करून मी पुढच्या आठवड्यात या प्रवेशाचा मुहूर्त ठरवेंन माझा हा प्रवेश  मातोश्रीवर झाला तरी कराड मध्ये त्यांनतर प्रचंड मोठा कार्यक्रम घेऊन शिवसेना वाढीसाठीच्या संघटनात्मक कामाला आपण लागणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले 

गेल्या पंचवार्षिक पालिका निवडणुकीत मी अपक्ष निवडून आलो आहे आणि आ पृथ्वीराज चव्हाण यांना मी पाठिंबा दिला होता आमदार चव्हाण यांना आमच्या शिवसेनेत प्रवेश करण्याने धक्का वगैरे बसण्याचा काही प्रश्नच नाहीये कारण महाविकास आघाडीचा हिस्सा म्हणून आम्ही निवडणुकीत एकत्रच असू आणि ते आघाडीचे नेतेच आहेत यावेळी माजी नगरसेवक अप्पा माने यांनीही इंद्रजित गुजर यांच्या बरोबरीने ते म्हणतील त्या दिशेने पुढे राजकिय वाटचाल करणार असल्याचे यावेळी संगितले

No comments:

Post a Comment