Tuesday, June 20, 2023

कराडात पुन्हा "त्याच' ठिकाणी चोरी ;

वेध माझा ऑनलाइन । कराडात चोऱ्यांचे प्रमाण वाढू लागल्याने दिसू लागले आहे मग  पोलीस काय करतायत... ?  असे लोक आता विचारत असतानाच दोन दिवसांपूर्वी झालेल्या ठिकाणीच पुन्हा एकदा चोरी झाल्याचे निष्पन्न झाले आहे ही चोरी देखील पोलीस स्टेशन जवळच झाल्याने चर्चेला उधाण आले आहे

दोन दिवसांपूर्वी कराड येथील प्रशासकीय इमारती नजीक एक घर एक कार्यलय व एक हॉटेल चोरट्यांनी फोडून त्या ठिकाणाहून एअर गन पिस्टल रोख रक्कम असा 50 हजाराचा मुद्देमाल चोरुन पोबारा केला होता आता पुन्हा त्याच ठिकाणी पत्रकार अक्षय मस्के यांचे कार्यालय चोरट्यांनी फोडून लॅपटॉप व इतर साहित्य चोरून नेल्याची घटना पुन्हा घडली आहे अक्षय मस्के यांनी याबाबतची तक्रार पोलिसात दिली आहे

त्याच एरियात आणि तेही पोलीस स्टेशन जवळ ही चोरीची घटना सलग दोनदा घडल्याने  पोलीस काय करतायत...? असे आता लोक विचारताना दिसत आहेत चोरांनी एक प्रकारे त्याच ठिकाणी दोन वेळा चोऱ्या करून तेथील पोलिसांना आव्हानच दिले आहे त्याठिकाणी आणखी काही चोऱ्या होण्या अगोदर आता  पोलिसांच्या झटपट कारवाईची जनतेला अपेक्षा आहे

No comments:

Post a Comment