Monday, June 26, 2023

विंग येथील नवविवाहिता आत्महत्या प्रकरणी सासू राणी माने, नवरा अनिकेत मानेवर गुन्हा दाखल ;

वेफह माझा ऑनलाईन। विंग येथील नवविवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासूवर कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे घरून 4 लाख रुपये घेऊन ये असा तगादा लावुन तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्यामुळेच नीलमने आत्महत्या केल्याची तक्रार मीना अरुण कांबळे यांनी पोलिसांत दिली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बीड येथील नीलम यांचा विवाह विंग येथील अनिकेत माने यांच्याशी नऊ मार्च 2023 रोजी झाला होता विवाहानंतर सासू व पतीने नीलमला चांगली वागणूक दिली मात्र काही दिवसानंतर त्यांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला किरकोळ कारणावरून ते निलमला त्रास देत याबाबत निलमने आईला फोन करून सांगितले होते चप्पलचे दुकान घेण्यासाठी माहेरहुन चार लाख रुपये घेऊन ये असे म्हणून सासू राणी माने व पती अनिकेत माने हे दोघेजण नीलमला वारंवार शिवीगाळ करून मारहाण करत होते या त्रासाला कंटाळून नीलम हिने विंग येथील राहत्या घरातील स्वयंपाक घरात गळफास घेऊन आत्महत्या केली अशी फिर्याद मृत विवाहितेची आई मीना कांबळे यांनी दिली आहे यावरून नीलमला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अनिकेत माने व सासू राणी माने या दोघांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास तालुका पोलीस करीत आहेत

No comments:

Post a Comment