वेध माझा ऑनलाइन । कराड तालुक्यातील बनवडी येथील मुस्लिम बांधवांच्या दर्ग्यातील भोंगा मुस्लिम बांधवांच्या राष्ट्रीय सणादिवशीच सुरू ठेवण्यात येणार असल्याचा एक मोठा निर्णय मुस्लिम बांधवांच्या संमतीने बुधवारी झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला. यास सर्वांनी एकमताने मंजुरी देत निर्णयाचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. हि ग्रामसभा शांततेत पार पडली.
यावेळी हजरत खैरत पीर देवस्थानला लागून असलेली दफनभुमी आजपासून बंद करून हजरत पीर दर्गा परीसरातील देवस्थान इमारतीच्या क्षेत्रातील भाग सोडून वक्फ बोर्डाच्या मालकीच्या जागेमध्ये फक्त हजरत पीर दर्गा ट्रस्टिच्या कुटूंबीयांचेच दफन करणेत यावे सदर दोन गुंठे जागा दफन भुमीसाठी हजरत पीर ट्रस्ट व ग्रामपंचायत कार्यकारणी यांचे संगणमताने दोन गुंठे जागा घेऊन त्याला ट्रस्टीकडुन कंपाऊंड करणेचा ऐतिहासिक निर्णय ट्रस्टिच्या उपस्थितीत सर्वानुमते घेण्यात आला
तसेच वार्षिक प्रशासन अहवाल 22-23 ला मंजुरी, प्रधानमंत्री आवास योजना तसेच चोवीस बाय सात नळ पाणी पुरवठा योजनेचे दरात हजारी एक ते दोन रुपये वाढवणेच्या निर्णयासही मंजुरी देण्यात आली, सामाजिक सलोखा राखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या जागेत सार्वजनिक ओपन स्पेसमध्ये कोणत्याही धार्मिक स्थळासाठी मंजुरी न देण्याचा निर्णय घेण्यात आला.
ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रदिप पाटील होते .यावेळी उपसरपंच मोहन जानराव, सदस्य विकास करांडे, शंकरराव खापे, पांडुरंग कोठावळे, अख्तर हुसेन आतार, आलका पाटील, ग्रामविकास अधिकारी दिपक हिनुगले, पोलीस पाटील रोहित पाटील उपस्थित होते.
No comments:
Post a Comment